Selena Gomez : अमेरिकन गायिका सेलेना गोमेजचे इंस्टाग्रामवर सर्वाधिक फॉलोअर्स; कायली जेनरलाही टाकलं मागे
Selena Gomez : लोकप्रिय गायिका सेलेना गोमेजचे इंस्टाग्रामवर सर्वाधिक फॉलोअर्स आहेत.
Salena Gomez Instagram Followers : लोकप्रिय अमेरिकन गायिका सेलेना गोमेजचं (Salena Gomez) नाव सध्या जगभरात चर्चेत आहे. सेलेनाचा मोठा चाहतावर्ग असून तिचे इंस्टाग्रामवर सर्वाधिक फॉलोअर्स (Instagram Followers) आहेत. सेलेनाआधी कायली जेनर (Kylie Jenner) या मॉडेलचे इंस्टाग्रामवर सर्वाधिक फॉलोअर्स होते. पण आता सेलेनाने कायलीला मागे टाकलं आहे.
सेलेना गोमेजचे इंस्टाग्रामवर 38,23,61,901 फॉलोअर्स आहेत. तर कायली जेनरचे 38,04,25,729 फॉलोअर्स आहेत. सेलेनाने गेल्या काही दिवसांपूर्वी इंस्टाग्रामला रामराम ठोकला होता. पण आता पुन्हा एकदा तिने जोरदार कमबॅक केलं आहे. जगभरात तिचा मोठा चाहतावर्ग आहे. सेलेना पाठोपाठ कायली जेनरचे सर्वाधिक फॉलोअर्स आहेत.
View this post on Instagram
सेलेना गोमेज 'या' आजाराने ग्रस्त
सेलेना गोमेज 'ल्यूपस' (Lupus) या गंभीर आजाराने ग्रस्त आहे. या आजारामुळे सेलेनाच्या शरीरात अनेक बदल होत आहेत. या गंभीर आजाराबाबत लोकांना माहिती नाही. महत्त्वाची बाब म्हणजे, या आजावर कोणतेही उपाय नाहीत. पुरुषांपेक्षा महिलांमध्ये या आजाराचे प्रमाण जास्त आहे. गायिकेने एका लाईव्ह सेशनदरम्यान या आजाराबाबत माहिती दिली आहे.
सेलेनाने बॉडी शेमिंगवर सोडलं मौन
सेलेना गोमेजला गेल्या काही दिवसांपासून बॉडी शेमिंगचा सामना करावा लागत आहे. आता एक व्हिडीओ शेअर करत तिने बॉडी शेमिंगवर मौन सोडलं आहे. सेलेना म्हणाली, "मी 'ल्यूपस' या आजाराने ग्रस्त आहे. औषधांमुळे माझं वजन वाढत आहे. मी सुंदर आहे आणि सुंदरच राहणार. त्यामुळे वाढत्या वजनामुळे मला ट्रोल करू नये. आजारावर मात करण्यासाठी औषध घेणं खूप गरजेचं आहे. त्यामुळे कृपया ट्रोल करणं बंद करा".
Selena Gomez goes live on TikTok to address comments about her body. She talks about her health, medication for lupus and how they affect her body. pic.twitter.com/JL3hIArShB
— Selena Gomez News 🎬 (@OfficialSGnews) February 16, 2023
सेलेना गोमेजबद्दल जाणून घ्या... (Who Is Selena Gomez)
सेलेना गोमेज अमेरिकन गायिका आहे. गायिका असण्यासोबत ती एक उत्तम अभिनेत्रीदेखील आहे. 'विजार्ड ऑफ वेवर्ली प्लेस' या मालिकेतील रुसो या भूमिकेमुळे सेलेना घराघरांत पोहोचली आहे. तसेच 'सिंड्रेला स्टोरी', 'प्रिंसेस प्रोटेक्शन' या मालिकांमध्येदेखील तिने काम केलं आहे. तसेच 'रमोना अॅन्ड बीजुस' या मालिकेच्या माध्यमातून सेलेनाने रुपेरी पडद्यावर पदार्पण केलं आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :