एक्स्प्लोर

Sanjay Raut: दिल्लीतील काँग्रेस नेत्यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंशी चर्चा, तो निर्णय...; संजय राऊतांनी मविआच्या राज्यसभेतील एका जागेवर केलं स्पष्टपणे भाष्य

Sanjay Raut: तीन पक्ष एकत्रित येऊन त्यासंदर्भात अंतिम निर्णय होईल आणि मग तो निर्णय जाहीर होईल, अशी माहिती संजय राऊत यांनी दिली आहे.

मुंबई : राज्यसभेची (Rajyasabha) निवडणूक जाहीर झाली असून याच महिन्यातील 16 तारखेला मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. महाराष्ट्रातील 7 जागांसाठी ही निवडणूक होत असून महायुतीकडे 6 आणि महाविकास आघाडीला 1 जागा मिळणार आहे. त्यामध्ये, भाजपला 4 आणि शिंदेंच्या शिवसेनेला 1 तर राष्ट्रवादी काँग्रेसला 1 जागा मिळणार आहे. त्यामध्ये, राष्ट्रवादीकडून पार्थ पवार यांचं नाव निश्चित झालं आहे. तर, भाजप आणि शिंदेंच्या शिवसेना उमेदवारांची प्रतिक्षा आहे. दुसरीकडे महाविकास आघाडीकडून तिन्ही पक्ष आग्रही असल्याचे पाहायला मिळालं. त्यात, संख्याबळ अधिक असल्याने शिवसेना आणि काँग्रेसच जास्त आग्रही होती. मात्र, महाविकास आघाडीकडून (MVA) राज्यसभेसाठी पुन्हा एकदा शरद पवार (Sharad Pawar) यांचे नाव जवळपास निश्चित झाल्याची चर्चा होती, मात्र अद्यापही महाविकास आघाडी कडून कोणत्याही नावांची अधिकृत घोषणा झालेली नाही, अशातच ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी मोठं भाष्य केलं आहे. 

संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलताना म्हटलं की, निर्णय जाहीर करणं कोणत्याही एका पक्षाच्या हातात नाही. तीन पक्ष एकत्रित येऊन  त्यासंदर्भात अंतिम निर्णय होईल आणि मग तो निर्णय जाहीर होईल. दिल्लीतील काँग्रेस नेत्यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंशी चर्चा केली आहे. त्यांच्याशी वारंवार चर्चा होत आहे. काल राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन नेत्यांनी शिवसेना पक्षप्रमुखांशी चर्चा केली. तिनही पक्षांमध्ये चर्चा, संवाद सुरू आहे, तो संपलेला नाही, चिंतेचं कारण नाही. जे काही होईल ते एकमतानेच होईल. तीन पक्ष तर स्वतंत्र पक्ष उभारू शकत नाहीत. एकच उमेदवार उभा राहिलं. तो उमेदवार तीन पक्षाच्या संमतीने दिला जाईल, सातवी जागा ही महाविकास आघाडी म्हणूनच जिंकली जाईल, आणि आम्हाला त्यामध्ये कोणतीही अडचण दिसत नाही, अशी माहिती राऊत यांनी दिली आहे.

सातवी जागा महाविकास आघाडी म्हणूनच जिंकेल आणि ती जागा एकत्र असेल तर निवडून येईल. शिवसेना मोठा पक्ष आहे, आता एकत्र राहणं गरजेचं आहे. उद्या महत्त्वाचा दिवस आहे. काल जयंत पाटील आणि सुप्रिया सुळे यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेतली आहे. आज संध्याकाळपर्यंत निर्णय होईल. चर्चा झाली आहे. दिल्लीतील काँग्रेस नेत्यांची उद्धव ठाकरेंशी चर्चा होत आहे. एकच उमेदवार उभा राहिल आणि तो एकत्र चर्चा करून उभा राहिलं, असंही पुढे ठाकरेंच्या पक्षाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

भाजप शरद पवारांच्या उमेदवारीसाठी पडद्यामागून आग्रही??

* शरद पवारांना महाविकास आघाडीकडून उमेदवारी मिळाल्यास महाविकास आघाडीमध्ये पक्षांच्या काही नेत्यांमध्ये नाराजी उफाळू शकते आणि आघाडीमध्ये बिघाडी होऊ शकते. 
* शरद पवारांना उमेदवारी दिल्यास ठाकरेंच्या शिवसेनेचे महाविकास आघाडी मध्ये संख्याबळ जास्त असताना सुद्धा उमेदवारी पासून दूर ठेवण्यास भाजपला यश मिळेल.
* काँग्रेसला राज्यसभेत विरोधी पक्षनेते पदासाठी राज्यसभेची उमेदवारी आवश्यक असताना शरद पवारांना उमेदवारी दिल्यास काँग्रेसला यामुळे फटका बसू शकतो, हे भाजपला राज्यसभेसाठी महत्त्वाचा असेल.
* विलीनीकरणाची चर्चा राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही पक्षांची सुरू असताना शरद पवारांना उमेदवारी दिल्यानंतर सुद्धा संभ्रम कायम राहू शकतो आणि हे महायुतीसाठी फायद्याचा ठरू शकतो.
* महाविकास आघाडी कडून शरद पवारांना उमेदवारी न दिल्यास महायुतीकडून सुद्धा सातवा उमेदवार दिला जाऊ शकतो... त्यामुळे उमेदवारी महायुतीने सुद्धा जाहीर करण्यासंदर्भात वेट अँड  वॉच ची भूमिका ठेवली आहे.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

लवकर या, लवकर जा.. सुनेत्रा पवारांची महिलांसाठी मोठी घोषणा; विधिमंडळातील पहिल्याचं भाषणात सगळ्यांचं लक्ष वेधलं, VIDEO
लवकर या, लवकर जा.. सुनेत्रा पवारांची महिलांसाठी मोठी घोषणा; विधिमंडळातील पहिल्याचं भाषणात सगळ्यांचं लक्ष वेधलं, VIDEO
Rohini Khadse : गॅस टंचाईचा विषय तात्काळ सोडवा, अन्यथा वेळ आली तर विद्यार्थ्यांसह रस्त्यावर उतरू; रोहिणी खडसे यांचा सरकारला गंभीर इशारा
गॅस टंचाईचा विषय तात्काळ सोडवा, अन्यथा वेळ आली तर विद्यार्थ्यांसह रस्त्यावर उतरू; रोहिणी खडसे यांचा सरकारला गंभीर इशारा
Gas Shortage ECA Act: इराण-इस्रायलच्या युद्धामुळे अखेर निर्णय घ्यावाच लागला; मोदी सरकारने 1955 चं ब्रह्मास्त्र बाहेर काढलं, भारतात ECA कायदा लागू, नेमकं काय काय घडतंय?
इराण-इस्रायलच्या युद्धामुळे अखेर निर्णय घ्यावाच लागला; मोदी सरकारने 1955 चं ब्रह्मास्त्र बाहेर काढलं, भारतात ECA कायदा लागू, नेमकं काय काय घडतंय?
Ajit Pawar Plane Crash: व्हीएसआर विमान कंपनीच्या मालकाचं अंडरवर्ल्डशी कनेक्शन, पिंकी माळीच्या कुटुंबाला धमक्या, अमोल मिटकरींचा खळबळजनक आरोप
व्हीएसआर विमान कंपनीच्या मालकाचं अंडरवर्ल्डशी कनेक्शन, पिंकी माळीच्या कुटुंबाला धमक्या, अमोल मिटकरींचा खळबळजनक आरोप
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Pune Khanawal Gas Shortage : पुण्यात गॅस तुटवड्यांमुळे अनेक खानावळी बंद;बॅचलर,विद्यार्थ्यांचे हाल
Vishakha Subhedar Son Return to Mumbai : कुवेतमधून सुखरुप परतला विशाखा सुभेदार यांचा मुलगा
BJP MLA vs BJP Minister : अर्थसंकल्पीय अधिवेशनात भाजप नेत्यांमध्ये जुगलबंदी Special Report
Iran Israel War : इराण-इस्त्रायल युद्धाच्या झळा, खिशाला कळा Special Report
Uddhav Thackeray Vidhan Parishad : उद्धव ठाकरे विधान परिषदेत पुन्हा येणार? Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mhada House : धूळ खात पडलेली घरे विक्रीला; म्हाडाच्या कोकण गृहनिर्माण मंडळाच्या तिजोरीत तब्बल 800 कोटींची भर
धूळ खात पडलेली घरे विक्रीला; म्हाडाच्या कोकण गृहनिर्माण मंडळाच्या तिजोरीत तब्बल 800 कोटींची भर
युद्धामुळे गॅस महागला आता सोन्याच्या भावातही मोठी उसळी, 1 तोळं सोनं किती रुपयांनी महागलं? जाणून घ्या लेटेस्ट दर
युद्धामुळे गॅस महागला आता सोन्याच्या भावातही मोठी उसळी, 1 तोळं सोनं किती रुपयांनी महागलं? जाणून घ्या लेटेस्ट दर
लवकर या, लवकर जा.. सुनेत्रा पवारांची महिलांसाठी मोठी घोषणा; विधिमंडळातील पहिल्याचं भाषणात सगळ्यांचं लक्ष वेधलं, VIDEO
लवकर या, लवकर जा.. सुनेत्रा पवारांची महिलांसाठी मोठी घोषणा; विधिमंडळातील पहिल्याचं भाषणात सगळ्यांचं लक्ष वेधलं, VIDEO
Maharashtra Weather Update: मुंबई तापणार! 3 जिल्ह्यांना उष्णतेच्या लाटेचा ऑरेंज अलर्ट; हवामान विभागाचा महाराष्ट्राला सावधानतेचा इशारा
मुंबई तापणार! 3 जिल्ह्यांना उष्णतेच्या लाटेचा ऑरेंज अलर्ट; हवामान विभागाचा महाराष्ट्राला सावधानतेचा इशारा
Rohini Khadse : गॅस टंचाईचा विषय तात्काळ सोडवा, अन्यथा वेळ आली तर विद्यार्थ्यांसह रस्त्यावर उतरू; रोहिणी खडसे यांचा सरकारला गंभीर इशारा
गॅस टंचाईचा विषय तात्काळ सोडवा, अन्यथा वेळ आली तर विद्यार्थ्यांसह रस्त्यावर उतरू; रोहिणी खडसे यांचा सरकारला गंभीर इशारा
BCCI Give Team India Prize Money T20 World Cup 2026 मोठी बातमी: विश्वविजेत्या टीम इंडियासाठी BCCI ने पेटारा उघडला; आयसीसीपेक्षा चौपट आणि 2024 च्या तुलनेपेक्षाही अधिक बक्षीस जाहीर, किती कोटी मिळाले?
टीम इंडियासाठी BCCI ने पेटारा उघडला; ICC पेक्षा चौपट आणि 2024 च्या तुलनेपेक्षाही अधिक बक्षीस जाहीर, किती कोटी मिळाले?
Buldhana Crime: तीनवेळा जेवणातून विष दिलं तरीही पत्नी वाचली, अखेर थंड डोक्याने शेवटचा प्लॅन आखला, बुलढाण्यातली वृषाली गावंडे हत्याकांडाची इनसाईड स्टोरी
तीनवेळा जेवणातून विष दिलं तरीही पत्नी वाचली, अखेर थंड डोक्याने शेवटचा प्लॅन आखला, बुलढाण्यातली वृषाली गावंडे हत्याकांडाची इनसाईड स्टोरी
Sangola News: दहावीचा पेपर संपल्यानंतर विद्यार्थी अन् शिक्षकांवर मधमाशांचा हल्ला; जवळपास 100 जण जखमी, नेमकं काय घडलं?
दहावीचा पेपर संपल्यानंतर विद्यार्थी अन् शिक्षकांवर मधमाशांचा हल्ला; जवळपास 100 जण जखमी, नेमकं काय घडलं?
Embed widget