एक्स्प्लोर

सन 2024 सालाच्या तुलनेत 2025 साली राज्यात बेपत्ता महिला व अल्पवयीन मुलींची संख्या अधिक; राज्य सरकारच्याच आकडेवारीतून धक्कादायक वास्तव

Maharashtra Missing Women and Minor Girls: हरवलेल्या मुला-मुलींचा शोध घेण्यासाठी राबवण्यात आलेल्या 'ऑपरेशन मुस्कान' अंतर्गत आतापर्यंत एकूण 41,193 मुला-मुलींना शोधण्यात यश आल्याची माहिती दिली.

Maharashtra Missing Women and Minor Girls: महाराष्ट्रात महिला आणि अल्पवयीन मुली बेपत्ता होण्याचे प्रमाण 2024 च्या तुलनेत 2025 मध्ये वाढल्याची धक्कादायक माहिती राज्य सरकारनेच विधिमंडळात सादर केली आहे. या गंभीर विषयावरून विरोधकांनी सरकारला धारेवर धरले असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाचा तपास आणि शोधमोहीम अधिक तीव्र करण्याचे आश्वासन दिले आहे.

आकडेवारी काय सांगते? (2024 विरुद्ध 2025)

  • राज्य सरकारने सादर केलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या एका वर्षात बेपत्ता महिला आणि मुलींच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे
  • बेपत्ता महिला: 2024 साली हा आकडा 45,662 इतका होता, जो 2025 मध्ये वाढून 48,278 वर पोहोचला आहे.
  • अल्पवयीन मुली: 2024 मध्ये 11,316 अल्पवयीन मुली बेपत्ता झाल्या होत्या, तर 2005 मध्ये ही संख्या 12,113 झाली आहे.
  • या पार्श्वभूमीवर, हरवलेल्या मुला-मुलींचा शोध घेण्यासाठी राबवण्यात आलेल्या 'ऑपरेशन मुस्कान' अंतर्गत आतापर्यंत एकूण 41,193 मुला-मुलींना शोधण्यात यश आल्याची माहिती 

विरोधकांचा हल्लाबोल 

काँग्रेस नेते भाई जगताप यांनी या मुद्द्यावर आक्रमक पवित्रा घेत सरकारच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. ते म्हणाले, "शहरी भागातून मोठ्या प्रमाणावर मुली गायब होत आहेत. साधारण 12 हजार महिला बेपत्ता असून त्यात 2 हजार अल्पवयीन मुलींचा समावेश आहे. राज्याच्या यंत्रणा राबवूनही जर इतक्या मोठ्या प्रमाणात लेकी-बाळी बेपत्ता होत असतील, तर ही बाब राज्यासाठी भूषणावह नाही. हा मुलींच्या सुरक्षेचा अत्यंत गंभीर प्रश्न आहे."

95-96 टक्क्यांपर्यंत पोहोचण्याचे आमचे लक्ष्य

या गंभीर विषयावर उत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सरकारची भूमिका मांडली. ते म्हणाले, अनुभवानुसार, पहिल्या वर्षभरात साधारण 55 ते 60 टक्के महिलांचा शोध लागतो. अडीच ते तीन वर्षांच्या कालावधीत आपण 90 टक्क्यांपर्यंत पोहोचतो. आमचे उद्दिष्ट 95-96 टक्क्यांपर्यंत पोहोचण्याचे आहे आणि तोपर्यंत आम्ही काम थांबवणार नाही.  अनेकदा वर्षभरानंतर मुलींचे कुटुंबीय किंवा वयस्कर व्यक्तींच्या बाबतीत नातेवाईक पाठपुरावा करणे सोडून देतात, ही एक मोठी अडचण असल्याचे त्यांनी नमूद केले. महिला अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत दर महिन्याला या विषयावर बैठक घेतली जाते. ज्या पोलीस स्थानकांनी किंवा अधिकाऱ्यांनी उत्तम कामगिरी केली आहे, त्यांची दखल घेतली जात असल्याचे त्यांनी सांगितले. बेपत्ता महिलांना शोधण्यासाठी विशेष मोहीम हाती घेतली असून, कोणत्या पोलीस स्थानकाने किती शोध लावला आणि त्यात आणखी काय सुधारणा करता येतील, यावर शासन भर देत आहे.

इतर महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

रोहित पवारांचा प्रफुल पटेलांवर पुन्हा निशाणा, म्हणाले, जय पवारांवरही दबाव; भेटीनंतर राहुल गांधींची पहिली प्रतिक्रिया
रोहित पवारांचा प्रफुल पटेलांवर पुन्हा निशाणा, म्हणाले, जय पवारांवरही दबाव; भेटीनंतर राहुल गांधींची पहिली प्रतिक्रिया
पालकमंत्र्यांना कोंडीत पकडण्यासाठी मोहिते पाटलांनी टाकला डाव! राष्ट्रवादीकडे बहुमत असूनही शिंदेंच्या शिवसेनेला सभापतीपद
पालकमंत्र्यांना कोंडीत पकडण्यासाठी मोहिते पाटलांनी टाकला डाव! राष्ट्रवादीकडे बहुमत असूनही शिंदेंच्या शिवसेनेला सभापतीपद
उन्हाचा कडाका वाढला, शाळेची वेळ बदलली; ZP सीईओंनी काढला आदेश, सकाळच्या सत्रात वाजणार घंटा
उन्हाचा कडाका वाढला, शाळेची वेळ बदलली; ZP सीईओंनी काढला आदेश, सकाळच्या सत्रात वाजणार घंटा
Shivsena : शिवसेना पक्ष आणि चिन्ह कुणाचं? दोन्ही गट अंतिम युक्तिवादासाठी तयार, पण कोर्टाकडून पुन्हा पुढची तारीख
शिवसेना पक्ष आणि चिन्ह कुणाचं? दोन्ही गट अंतिम युक्तिवादासाठी तयार, पण कोर्टाकडून पुन्हा पुढची तारीख
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Nitesh Rane Speech : कोकणात 90 % आंब्याचं नुकसान, शेतकऱ्यांना चांगल Package देणार - नितेश राणे
Vidhan Bhavan Bomb Threat विधान भवनात बॉम्ब ठेवल्याचा धमकीचा ईमेल,बॉम्बशोधक पथक, श्वान पथकाकडून तपास
Iran Israel Effect : गॅसटंचाईचं कारण, भडकलं राजकारण, युद्धावरुन विरोधक-सत्ताधाऱ्यांमध्ये लढाई Special Report
Iran Israel attack Effect On Maharashtra : युद्धाचं फलित, गॅस गेला चुलीत! Special Report
Iran Israel attack Effect On Maharashtra : अफवांचा भडका,भीतीची रांग, बुकिंगसाठी गर्दी Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
India LPG Crisis: इराणने भारतीय जहाजांना परवानगी दिली आहे का? परराष्ट्र मंत्रालयानं म्हटलं, 'आम्ही तीन वेळा बोललो, परंतु आताच बोलणं घाईचं होईल..'
इराणने भारतीय जहाजांना परवानगी दिली आहे का? परराष्ट्र मंत्रालयानं म्हटलं, 'आम्ही तीन वेळा बोललो, परंतु आताच बोलणं घाईचं होईल..'
'नरेंदर भी गायब, सिलेंडर भी गायब..' संसदेच्या प्रांगणात विरोधकांचा हल्लाबोल; राहुल गांधी म्हणाले, गॅस टंचाई ही फक्त सुरुवात, एपस्टीनचं नाव घेताच सभापतींनी बोलण्यापासून पुन्हा रोखलं
'नरेंदर भी गायब, सिलेंडर भी गायब..' संसदेच्या प्रांगणात विरोधकांचा हल्लाबोल; राहुल गांधी म्हणाले, गॅस टंचाई ही फक्त सुरुवात, एपस्टीनचं नाव घेताच सभापतींनी बोलण्यापासून पुन्हा रोखलं
रोहित पवारांचा प्रफुल पटेलांवर पुन्हा निशाणा, म्हणाले, जय पवारांवरही दबाव; भेटीनंतर राहुल गांधींची पहिली प्रतिक्रिया
रोहित पवारांचा प्रफुल पटेलांवर पुन्हा निशाणा, म्हणाले, जय पवारांवरही दबाव; भेटीनंतर राहुल गांधींची पहिली प्रतिक्रिया
Ashneer Grover On LPG: 'टंचाई नक्कीच खरी असली पाहिजे! विरोधाभास बघा, श्री रामाकडेही सिलिंडर नाही' अशनीश ग्रोव्हरची देशातील इंधन टंचाईवर खोचक टिप्पणी
'टंचाई नक्कीच खरी असली पाहिजे! विरोधाभास बघा, श्री रामाकडेही सिलिंडर नाही' अशनीश ग्रोव्हरची देशातील इंधन टंचाईवर खोचक टिप्पणी
OBC Reservation : फक्त पालकांच्या उत्पन्नावरून OBC क्रीमी लेयर ठरवता येणार नाही; सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वाचा निर्णय
फक्त पालकांच्या उत्पन्नावरून OBC क्रीमी लेयर ठरवता येणार नाही; सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वाचा निर्णय
Iran War Live Update: सैन्याची बिनशर्त शरणागती सोडाच, इराणमध्ये नेतृत्व संपवून सत्तापालट सुद्धा शक्य नाही! ट्रम्प युद्ध गुंडाळण्याच्या तयारीत
सैन्याची बिनशर्त शरणागती सोडाच, इराणमध्ये नेतृत्व संपवून सत्तापालट सुद्धा शक्य नाही! ट्रम्प युद्ध गुंडाळण्याच्या तयारीत

Embed widget