एक्स्प्लोर

आरआरआर चित्रपट अमेरिकेतील 200 हून अधिक चित्रपटगृहात पुन्हा होणार रिलीज; 'या' दिवशी येणार प्रेक्षकांच्या भेटीस

आरआरआर (RRR) हा चित्रपट अमेरिकेतील 200  हून अधिक चित्रपटगृहांमध्ये पुन्हा प्रदर्शित केला जाणार आहे.

RRR: दिग्दर्शक एस.एस. राजामौली (SS Rajamouli) यांच्या आरआरआर (RRR) या चित्रपटानं भारतीय चित्रपटसृष्टीचं नाव सातासमुद्रापार पोहोचवलं आहे.  गोल्डन ग्लोब पुरस्कार सोहळ्यातील बेस्ट ओरिजिनल साँग मोशन पिक्चर कॅटगिरीमधील पुरस्कार 'आरआरआर' मधील नाटू नाटू (Naatu Naatu) या गाण्यानं पटकावला. तसेच स्टीव्हन स्पीलबर्ग, जेम्स कॅमेरून आणि एडगर राइट यांसारख्या हॉलिवूडमधील दिग्गजांनी आरआरआर या चित्रपटाचं कौतुक केलं. आता हा चित्रपट अमेरिकेतील 200  हून अधिक चित्रपटगृहांमध्ये पुन्हा प्रदर्शित करण्याचा निर्णय अमेरिकन डिस्ट्रीब्यूटर कंपनी वेरिएंस फिल्म्स (Variance Films) नं घेतला आहे. वेरिएंस फिल्म्सनं एक ट्वीट शेअर करुन ही माहिती दिली आहे. 

वेरिएंस फिल्म्सनं (Variance Films) शेअर केलं ट्वीट 
वेरिएंस फिल्म्सनं  आरआरआर या चित्रपटाचा ट्रेलर त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरुन शेअर केला आहे. या व्हिडीओला त्यांनी कॅप्शन दिलं, 'आरआरआर फायनल ट्रेलर, सेलिब्रेशनला सुरुवात करुयात. एस. एस. राजामौली यांचा मास्टरपीस असलेला आरआरआर हा  3 मार्च रोजी चित्रपट 200 पेक्षा जास्त चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. तिकीट आणि थिएटर्सची लिस्ट पाहा.' या ट्वीटमध्ये त्यांनी वेरिएंस फिल्म्सच्या वेब साइटची देखील लिंक दिली आहे. 

पाहा ट्रेलर 

आरआरआर या चित्रपटामधील नाटू नाटू या गाण्याला बेस्ट ओरिजनल साँग कॅटेगिरीमधील ऑस्कर पुरस्काराचं नामांकन मिळालं आहे. ऑस्कर पुरस्कार सोहळा 13 मार्च रोजी पार पडणार आहे. या पुरस्कार सोहळ्याला आरआरआर चित्रपटाची संपूर्ण टीम हजेरी लावणार आहे. आता आरआरआर हा चित्रपट पुन्हा रिलीज होणार असल्यानं अमेरिकेतील नागरिकांना हा चित्रपट पाहता येणार आहे. 

2022 मधील हिट आणि लोकप्रिय ठरलेल्या चित्रपटांच्या यादीत आरआरआर या पॅन इंडिया फिल्मच्या नावाचा समावेश होतो. एसएस राजामौली यांच्या या चित्रपटात ज्युनिअर एनटीआर, राम चरण, आलिया भट्ट आणि अजय देवगण यांनी प्रमुख भूमिका साकारली. या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला. आरआरआर चित्रपटामधील नाटू नाटू या गाण्यामधील ज्युनियर एनटीआर, राम चरणच्या एनर्जीनं आणि डान्सनं अनेकांचे लक्ष वधले, अनेक लोकांनी या गाण्याचं कौतुक केलं. या गाण्याचे संगीत एमएम किरवाणी यांनी दिले असून चंद्रबोस यांनी लिहिले.

वाचा इतर महत्वाच्या बातम्या: 

Ram Charan : राम चरणने आनंद महिंद्रा यांना शिकवली 'नाटू नाटू'ची हूकस्टेप; व्हिडीओ होतोय व्हायरल

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Kalyan : एकटी असल्याचं पाहून अंगावर ज्वलनशील पदार्थ टाकला अन् लॅपटॉप घेऊन चोरटे पसार; UPSC ची तयारी करणारी विद्यार्थिनी थोडक्यात वाचली
एकटी असल्याचं पाहून अंगावर ज्वलनशील पदार्थ टाकला अन् लॅपटॉप घेऊन चोरटे पसार; UPSC ची तयारी करणारी विद्यार्थिनी थोडक्यात वाचली
पोलीस जनतेसाठी आहेत की भाजपसाठी?; पुण्यातील आमदार रवींद्र धंगेकरांचं थेट पोलीस आयुक्तांना पत्र
पोलीस जनतेसाठी आहेत की भाजपसाठी?; पुण्यातील आमदार रवींद्र धंगेकरांचं थेट पोलीस आयुक्तांना पत्र
मोठा दिलासा... UPSC परीक्षार्थींना दररोज 3000 रुपये द्या; न्यायालयाचे सर्वोच्च आदेश
मोठा दिलासा... UPSC परीक्षार्थींना दररोज 3000 रुपये द्या; न्यायालयाचे सर्वोच्च आदेश
अरुंद पुलावर तांदळाने भरलेली ट्रक पलटी, कारमधील 4 जण दबले; स्थानिकांची घटनास्थळी धाव
अरुंद पुलावर तांदळाने भरलेली ट्रक पलटी, कारमधील 4 जण दबले; स्थानिकांची घटनास्थळी धाव
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Amit Shaha Amethi Road Show : अमेठीतून स्मृती इराणी पुन्हा संसदेत जाणार : अमित शाहNaresh Mhaske Thane : ठाण्याचे प्रश्न ते गद्दारी कुणी केली? प्रचार थंडावल्यावर म्हस्केंशी बातचीतSpecial Report JP Nadda On RSS : संघावाचून आता अडत नाही, भाजप स्वत:च निर्णय घेतोNashik Lok Sabha : भाजपसह सर्व हिंदुत्ववादी संघटनांचा आम्हालाच पाठिंबा, महाराजांचा मोठा दावा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kalyan : एकटी असल्याचं पाहून अंगावर ज्वलनशील पदार्थ टाकला अन् लॅपटॉप घेऊन चोरटे पसार; UPSC ची तयारी करणारी विद्यार्थिनी थोडक्यात वाचली
एकटी असल्याचं पाहून अंगावर ज्वलनशील पदार्थ टाकला अन् लॅपटॉप घेऊन चोरटे पसार; UPSC ची तयारी करणारी विद्यार्थिनी थोडक्यात वाचली
पोलीस जनतेसाठी आहेत की भाजपसाठी?; पुण्यातील आमदार रवींद्र धंगेकरांचं थेट पोलीस आयुक्तांना पत्र
पोलीस जनतेसाठी आहेत की भाजपसाठी?; पुण्यातील आमदार रवींद्र धंगेकरांचं थेट पोलीस आयुक्तांना पत्र
मोठा दिलासा... UPSC परीक्षार्थींना दररोज 3000 रुपये द्या; न्यायालयाचे सर्वोच्च आदेश
मोठा दिलासा... UPSC परीक्षार्थींना दररोज 3000 रुपये द्या; न्यायालयाचे सर्वोच्च आदेश
अरुंद पुलावर तांदळाने भरलेली ट्रक पलटी, कारमधील 4 जण दबले; स्थानिकांची घटनास्थळी धाव
अरुंद पुलावर तांदळाने भरलेली ट्रक पलटी, कारमधील 4 जण दबले; स्थानिकांची घटनास्थळी धाव
पुण्यात पुन्हा होर्डींग कोसळलं, नवरदेवाचा घोडा अडकला; कोकणातही मुसळधारा, विदर्भात केळी बागांचं नुकसान
पुण्यात पुन्हा होर्डींग कोसळलं, नवरदेवाचा घोडा अडकला; कोकणातही मुसळधारा, विदर्भात केळी बागांचं नुकसान
Tirumala Group : बीडच्या तिरुमला उद्योगसमूहाचे प्रमुख सुरेश कुटेंच्या अडचणी वाढल्या; अखेर गुन्हा नोंद
बीडच्या तिरुमला उद्योगसमूहाचे प्रमुख सुरेश कुटेंच्या अडचणी वाढल्या; अखेर गुन्हा नोंद
निवडणूक निकालानंतर शरद पवार अन् उद्धव ठाकरे भाजपासोबत जातील, कारण..; आंबेडकरांचा मोठा दावा
निवडणूक निकालानंतर शरद पवार अन् उद्धव ठाकरे भाजपासोबत जातील, कारण..; आंबेडकरांचा मोठा दावा
Arvind Kejriwal : उद्या 12 वाजता माझ्या नेत्यांसह भाजप मुख्यालयात येतोय, कोणाला जेलमध्ये टाकायचं ते टाका; सीएम केजरीवालांचे मोदींना जाहीर आव्हान
उद्या 12 वाजता माझ्या नेत्यांसह भाजप मुख्यालयात येतोय, कोणाला जेलमध्ये टाकायचं ते टाका; सीएम केजरीवालांचे मोदींना जाहीर आव्हान
Embed widget