एक्स्प्लोर

Upcoming Marathi Movie Gulkand: आगामी 'गुलकंद' चित्रपटाचा टीझर प्रदर्शित; समीर चौघुले, सई ताम्हणकरची हटके जोडी पहिल्यांदाच एकत्र...

Upcoming Marathi Movie Gulkand: पहिल्यांदाच सई ताम्हणकर आणि समीर चौघुले ही हटके जोडी चित्रपटात एकत्र झळकणार असल्यानं प्रेक्षकांमध्ये कमालीची उत्सुकता निर्माण झाली आहे.

Samir Choughule and Sai Tamhankar Upcoming Gulkand Movie: नुकताच 'गुलकंद' (Gulkand Movie) चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला आहे. या टीझरमध्ये सई आणि समीर यांच्यातील गोड संवाद आणि त्यांचं प्रेमळ नातं पाहायला मिळालं, ज्यामुळे प्रेक्षकांच्या अपेक्षा अधिक वाढल्या आहेत. दोघांचं पहिल्यांदाच एकत्र काम करणं, हे मराठी चित्रपटसृष्टीसाठी खास ठरणार आहे. 

पहिल्यांदाच सई ताम्हणकर आणि समीर चौघुले ही हटके जोडी चित्रपटात एकत्र झळकणार असल्यानं प्रेक्षकांमध्ये कमालीची उत्सुकता निर्माण झाली आहे. समीर चौघुलेच्या भन्नाट विनोदी अंदाजासोबतच सई ताम्हणकरच्या अभिनयातील सहजता आणि वैविध्यता यांचा उत्तम मिलाप पाहायला मिळेल. सचिन गोस्वामी दिग्दर्शित आणि सचिन मोटे लिखित गुलकंद या चित्रपटात दोन भिन्न जोडप्यांच्या नात्यांचा प्रवास हलक्याफुलक्या पद्धतीनं मांडला आहे.

एव्हरेस्ट एंटरटेनमेंट आणि वेलक्लाऊड प्रॉडक्शन्स निर्मित 'गुलकंद' हा फॅमकॉम चित्रपटात ढवळे आणि माने या दोन जोडप्यांच्या नात्यातील गंमतीदार क्षण, विनोदी संवाद, नोकझोक अशी मनोरंजनाची उत्तम मेजवानी पाहायला मिळेल. चित्रपटात सई ताम्हणकर आणि समीर चौघुले यांच्यासह प्रसाद ओक आणि ईशा डे या जोडीचा ही अप्रतिम अभिनय पाहायला मिळणार आहे.

समीर चौघुले यासंदर्भात बोलताना म्हणाले की, "सई आणि माझी ओळख 'फू बाई फू' पासूनची आहे, त्यावेळी ती अँकर होती आणि मी स्पर्धक. त्यानंतर आम्ही वरचेवर भेटायचो, परंतु कधीच एकत्र काम केलं नव्हतं. हास्यजत्रेत हास्यरसिक म्हणून ती आमचे स्किट्स बघते, त्यावर प्रतिक्रिया देते. जवळ जवळ 900 एपिसोड्स तिनं पाहिले आहेत. आता 'गुलकंद'च्या निमित्तानं तिच्यासोबत काम करण्याचा योग आला आणि मी यासाठी खूप उत्सुक होतो. कामाच्याबाबतीत ती खूप मेहनती, अभ्यासू आहे. तिच्यासोबत काम करताना तिनेच मला खूप कम्फर्टेबल केलं. सईकडून खूप काही शिकण्यासारखं आहे. ती एक चांगली सह-कलाकार आणि चांगली मैत्रीण आहे."

सई ताम्हणकर आगामी चित्रपटाबाबत बोलताना म्हणाली की, "हास्यजत्रेत समीरला समोर परफॉर्म करताना पाहाणं आणि त्याच्यावर टिप्पणी करणं नेहमीच आव्हानात्मक राहिलं आहे, कारण त्याला कोणत्याही मान्यतेची गरज नाही. तो एक अप्रतिम अभिनेता आहेच आणि माणूस म्हणूनही तो तितकाच उत्कृष्ट आहे. त्याच्या कॅरॅक्टरसारखाच तो खूप भोळा आणि विनम्र असल्यामुळे आमचं खूप जमतं. सहकलाकार म्हणूनही त्याच्याबरोबर काम करायला खूप मजा आली. तो खरा जेंटलमॅन आहे आणि मला त्याच्यासोबत पुन्हा काम करायला नक्कीच आवडेल."

पाहा टीझर : 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

महेश लांडगे म्हणाले अजित पवार महाराष्ट्राचे आका, अजितदादांनी चारच शब्दात विषय संपवला, नेमकं काय म्हणाले? 
महेश लांडगे म्हणाले अजित पवार महाराष्ट्राचे आका, अजितदादांनी चारच शब्दात विषय संपवला, नेमकं काय म्हणाले? 
भाजप नेते अन् अजित पवारांची एकमेकांवर टीका, जयंत पाटलांनी सांगितलं राजकारण; पवार कुटुंब एकत्रावरही बोलले
भाजप नेते अन् अजित पवारांची एकमेकांवर टीका, जयंत पाटलांनी सांगितलं राजकारण; पवार कुटुंब एकत्रावरही बोलले
Silver Rate : उच्चांक गाठल्यानंतर चांदीचे दर 8000 रुपयांनी घसरले, सोन्याच्या दरात तेजी की घसरण?
Silver Rate : उच्चांक गाठल्यानंतर चांदीचे दर 8000 रुपयांनी घसरले, सोन्याच्या दरात तेजी की घसरण?
तारीख ठरली! शिवाजी पार्कवरुन मुंबईसाठी गर्जना, ठाकरे बंधूंची अन् युतीच्या शिंदे-फडणवीसांची
तारीख ठरली! शिवाजी पार्कवरुन मुंबईसाठी गर्जना, ठाकरे बंधूंची अन् युतीच्या शिंदे-फडणवीसांची

व्हिडीओ

Imtiyaz Jaleel Chhatrapati Sambhajinagar राडा, कारवर हल्ला, मारहाणीनंतर जलीलांची पहिली प्रतिक्रिया
Imtiyaj Jaleel Sambhajinagar काळ्या थारवर तुटून पडले, इम्तियाज जलील यांचा हात ओढला; नेमकं काय घडलं?
Imtiyaz Jaleel Sambhajinagar : संजय शिरसाट आणि अतुल सावे यांच्या गुंडांनी हल्ला केला, जलीलांचा आरोप
Imtiyaj Jaleel Sambhajinagar: काळ्या थारवर तुटून पडले, इम्तियाज जलील यांचा हात ओढला; नेमकं काय घडलं?
Santosh Dhuri on Bala Nandgaonkar : Sandeep Deshpande जावे यासाठी नांदगावकरांचे प्रयत्न

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
महेश लांडगे म्हणाले अजित पवार महाराष्ट्राचे आका, अजितदादांनी चारच शब्दात विषय संपवला, नेमकं काय म्हणाले? 
महेश लांडगे म्हणाले अजित पवार महाराष्ट्राचे आका, अजितदादांनी चारच शब्दात विषय संपवला, नेमकं काय म्हणाले? 
भाजप नेते अन् अजित पवारांची एकमेकांवर टीका, जयंत पाटलांनी सांगितलं राजकारण; पवार कुटुंब एकत्रावरही बोलले
भाजप नेते अन् अजित पवारांची एकमेकांवर टीका, जयंत पाटलांनी सांगितलं राजकारण; पवार कुटुंब एकत्रावरही बोलले
Silver Rate : उच्चांक गाठल्यानंतर चांदीचे दर 8000 रुपयांनी घसरले, सोन्याच्या दरात तेजी की घसरण?
Silver Rate : उच्चांक गाठल्यानंतर चांदीचे दर 8000 रुपयांनी घसरले, सोन्याच्या दरात तेजी की घसरण?
तारीख ठरली! शिवाजी पार्कवरुन मुंबईसाठी गर्जना, ठाकरे बंधूंची अन् युतीच्या शिंदे-फडणवीसांची
तारीख ठरली! शिवाजी पार्कवरुन मुंबईसाठी गर्जना, ठाकरे बंधूंची अन् युतीच्या शिंदे-फडणवीसांची
12 राज्यांच्या SIR-ड्राफ्ट यादीत 13 टक्के मतदारांची घट; उत्तर प्रदेशात सर्वाधिक 2.89 कोटी नावांवर फुली, राजस्थानमधील प्रत्येक 13 वी व्यक्ती मतदार यादीतून गायब
12 राज्यांच्या SIR-ड्राफ्ट यादीत 13 टक्के मतदारांची घट; उत्तर प्रदेशात सर्वाधिक 2.89 कोटी नावांवर फुली, राजस्थानमधील प्रत्येक 13 वी व्यक्ती मतदार यादीतून गायब
फडणवीसांच्या इशाऱ्यानंतर भाजप-एमआयएम युती तुटली; आमदाराला नोटीस, 5 MIM नगरसेवकांनीही काढला पाठिंबा
फडणवीसांच्या इशाऱ्यानंतर भाजप-एमआयएम युती तुटली; आमदाराला नोटीस, 5 MIM नगरसेवकांनीही काढला पाठिंबा
IND vs NZ : टीम इंडियासाठी मोठी गुड न्यूज, उपकॅप्टन श्रेयस अय्यर फिट, न्यूझीलंड विरुद्ध धमाकेदार कमबॅक करणार
टीम इंडियासाठी मोठी गुड न्यूज, उपकॅप्टन श्रेयस अय्यर फिट, न्यूझीलंड विरुद्ध धमाकेदार कमबॅक करणार
काँग्रेससोबत युती, देवेंद्र फडणवीसांचा इशारा; अंबरनाथमधील भाजप नेत्यानं स्पष्टीकरण, ही युती नाहीच
काँग्रेससोबत युती, देवेंद्र फडणवीसांचा इशारा; अंबरनाथमधील भाजप नेत्यानं स्पष्टीकरण, ही युती नाहीच
Embed widget