Sikandar Teaser : सलमान खानच्या 'सिकंदर'चे टिझर रिलीज लांबणीवर, आता नेमकं कधी प्रदर्शित होणार?
Salman Khan Sikandar Film Teaser : डॉ. मनमोहन सिंग यांच्या निधनामुळे सलमान खानच्या सिकंदर या चित्रपटाच्या टिझरबाबत मोठा निर्णय घेण्यात आला आहे.
मुंबई : गेल्या अनेक दिवसांपासून अभिनेता सलमान खानच्या (Salman Khan) सिंकदर या चित्रपटाच्या टिझरची अनेकांना प्रतीक्षा होती. मात्र आता या टिझरच्या रिलजची तारीख पुढे ढकलण्यात आली आहे. माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग (Manmohan Singh Passed Away) यांच्या निधनामुळे चित्रपटाच्या निर्मात्यांनी हा निर्णय घेतला आहे.
नेमका निर्णय काय घेतला? आता कधी टिझर रिलिज होणार?
माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचे वयाच्या 92 व्या वर्षी निधन झाले आहे. त्यांच्या जाण्याने संपूर्ण देसभरात हळहळ व्यक्त केली जात आहे. शनिवारी त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. त्यांच्या जाण्यामुळे देशात एकूण सात दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर करण्यात आला आहे. हीच बाब लक्षात घेता सिंकदर या चित्रपटाचे टिझर लॉन्च पुढे ढकलण्यात आले आहे. आज सकाळी 11.06 वाजता हे टिझर लॉन्च होणार होते. आज (27 डिसेंबर) सलमान खानचा 59 वा वाढदिवस आहे. या निमित्ताने टिझर लॉन्च केले जाणार होते. मात्र आता हेच टिझर शनिवारी सकाळी 11.07 वाजता लॉन्च केले जाईल. तशी माहिती चित्रपटाचे निर्माते साजिद नाडियाडवाला यांनी दिली आहे.
See u again kal subah theek 11.07 baje… #SikandarTeaserTomorrowhttps://t.co/3odhAvSVgR #SajidNadiadwala’s #Sikandar
— Salman Khan (@BeingSalmanKhan) December 26, 2024
Directed by @ARMurugadoss@iamRashmika @DOP_Tirru@NGEMovies @WardaNadiadwala #SikandarEid2025 pic.twitter.com/ik7Vgi2w7f
सलमान खानने पोस्ट केले होते चित्रपटाचे पोस्टर
याआधी सलमान खानने आपल्या इन्स्टाग्रामच्या खात्यावर या चित्रपटाचे पोस्टर लॉन्च केले होते. तसेच आज (27 डिसेंबर) या चित्रपटाचे टिझर लॉन्च होईल असेही सांगितले होते. मात्र टिझरची लॉन्चिंग डेट एका दिवसाने वाढवण्यात आली आहे.
2025 सालाच्या ईदला होणार चित्रपट प्रदर्शित
दरम्यान, या चित्रपटात सलमान खानसोबत नायिका म्हणून रश्मिका मंदाना दिसणार आहे. रश्मिकाचा पुष्पा-2 हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई केली आहे. विशेष म्हणजे या चित्रपटाने इतर चित्रपटांचे अनेक रेकॉर्ड ब्रेक केले आहेत. रश्मिका मंदानाची सिकंदर या चित्रपटातही जादू चालणार का? याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. 2025 सालाच्या ईदला सिकंदर हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.
हेही वाचा :