एक्स्प्लोर

बसायला करोडोची गाडी, टॉपच्या सुविधा, पण मारुती 800 कडे पाहात राहायचे, मनमोहन सिंग यांची अशी गोष्ट जिचा अख्ख्या देशाला अभिमान वाटेल!

मनमोहन सिंग यांचे निधन झाले आहे. त्यांच्या अनेक जुन्या आठवणींना उजाळा दिला जात आहे. पंतप्रधानपदी असताना त्यांनी अनेक मोठे आणि महत्त्वाचे निर्णय घेतलेले आहेत.

मुंबई : माजी पंतप्रधान मनमोहन सिंग (Manmohan Singh Passed Away) यांचे वयाच्या 92 व्या वर्षी निधन झाले. त्यांच्यावर शनिवारी (28 डिसेंबर) अंत्यसंस्कार होणार आहेत. आपल्या पंतप्रधानपदाच्या कारकि‍र्दीत त्यांनी भारताला एका नव्या उंचीवर नेऊन ठेवले. वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून त्यांनी देशातील गोरगरीब, दीनदुबळ्यांची स्थिती सुधारण्यासाठी प्रयत्न केले. दरम्यान, मनमोहन यांच्या निधनानंतर त्यांच्या अनेक आठवणींना उजाळा दिला जात आहे. मनमोहन सिंग पतंप्रधान असताना त्यांच्या सुरक्षेची जबाबदारी असणारे माजी आयपीएस अधिकारी असीम अरूण यांनी त्यांची एक खास आठवण सांगितली आहे. देशातील प्रत्येक नागरिकाला मनमोहन सिंग यांचा अभिमान वाटेल अशीच ही आठवण आहे.

असीम अरुण यांनी सांगितली आठवण

असीम अरूण हे माजी आयपीएस अधिकारी आहेत. सध्या ते उत्तर प्रदेशच्या समाजकल्याण विभागाचे राज्यमंत्री आहेत. आयपीएस अधिकार असताना 2004 साली ते तीन वर्षे मनमोहन सिंग यांचे अंगरक्षक होते. विशेष म्हणजे ते मनमोहन सिंग यांच्या सर्वाधिक जवळ असायचे. त्यांनीच एक्स या समाजमाध्यमावर एक पोस्ट करून मनमोहन सिंग यांची एक जुनी आठवण सांगितली आहे. सोबत त्यांनी मनमोहन सिंग यांचा एक फोटोदेकील शेअर केला आहे. 

असीम अरुण यांच्या पोस्टमध्ये नेमकं काय आहे.

"मी 2004 साली साधारण तीन वर्षे मनमोहन सिंग यांचा अंगरक्षक होतो. पंतप्रधानांच्या एसपीजी सुरक्षा व्यवस्थेत क्लोज प्रोटेक्शन टीम असते. ही टीम पंतप्रधानांच्या सर्वात जवळ असते. याच टीमचे नेतृत्त्व करण्याची संधी मला मळाली होती. या टीममध्ये एआयजी सीपीटी अशी एक व्यक्ती असते जी पंतप्रधानांच्या नेहमी सोबत असते. ही व्यक्ती पंतप्रधानांपासून कधीच दूर जाऊ शकत नाही. जेव्हा-जेव्हा पंतप्रधानांसोबत एकच अंगरक्षक असतो, तेव्हा याच व्यक्तीला त्यांच्यासोबत जाता येते. ही जबाबदारी माझ्यावर होती," अशी माहिती असीम अरुण यांनी दिली. 

असीम मला या बीएमडबल्यूमधून जाणं आवडत नाही

तसेच,"डॉ. मनमोहन सिंग यांना मारुती 800 ही एक कार होती. ते पंतप्रधान असताना चमचम करणाऱ्या बीएमडब्ल्यूच्या मागे ही कार उभी केली जायची. ही कार पाहून मनमोहन सिंग मला नेहमी सांगायचे की, असीम मला या बीएमडबल्यूमधून जाणं आवडत नाही. माझी गाडी तर मारूती- 800 आहे. त्यांच्या या बोलण्यानंतर तुमच्या सुरक्षेसाठी ही काळ्या रंगाची बीएमडब्ल्यू कार आहे. या कारमध्ये सुरक्षेच्या वेगवेगळ्या सुविधा आहेत, असे मी त्यांना सांगायचे," अशी आठवण असीम यांनी सांगितली. 

माझी कार तर मारूती-800 आहे

"मात्र मनमोहन सिंग यांचा ताफा जेव्हा त्यांच्या मारूती कारच्या समोरून निघायचा तेव्हा ते नेहमीच त्यांच्या कारकडे डोळे भरून पाहायचे. जणूनकाही मी मध्यमवर्गीय आहे. सामान्य लोकांची चिंता करणे हे माझे काम आहे. करोडो रुपयांची गाडी तर पंतप्रधानपदाची आहे. माझी कार तर मारूती-800 आहे, असं जणू ते स्वत:ला सांगायचे," अशी आठवण ससीम अरूण यांनी सांगितली. 

मनमोहन सिंग यांच्या विचारांचा अदृश्य पैलू समोर आल्यानंतर अनेकांच्या मनात त्यांच्याप्रतीचा आदर वाढला आहे. अनेकांनी मनमोहन सिंग यांच्या जाण्याने दु:ख व्यक्त केलं आहे.  

हेही वाचा :

Video : संसदेत टोकाची टीका, टोकाचा विरोध, पण मनमोहन सिंग यांचा असा 'शायराना' अंदाज ज्यानं नवा आदर्श घालून दिला!

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Video : संसदेत टोकाची टीका, टोकाचा विरोध, पण मनमोहन सिंग यांचा असा 'शायराना' अंदाज ज्यानं नवा आदर्श घालून दिला!
Video : संसदेत टोकाची टीका, टोकाचा विरोध, पण मनमोहन सिंग यांचा असा 'शायराना' अंदाज ज्यानं नवा आदर्श घालून दिला!
Ind vs Aus 4th Test : मेलबर्नमध्ये चाहत्यांची घुसखोरी; कोहलीच्या गळ्यात टाकला हात अन्... मैदानात नेमकं काय घडलं? पाहा Video
मेलबर्नमध्ये चाहत्यांची घुसखोरी; कोहलीच्या गळ्यात टाकला हात अन्... मैदानात नेमकं काय घडलं? पाहा Video
Manmohan Singh : सोनं गहाण ठेवलं, टीका सहन केली पण भारताला संकटातून वाचवलं, मनमोहन सिंह यांच्याकडून आर्थिक सुधारणांची पायाभरणी 
कर्जाची परतफेड करण्यासाठीही परकीय चलन नव्हतं, मनमोहन सिंह यांनी सोनं गहाण ठेवण्याचा मार्ग स्वीकरला अन् चित्र बदललं   
Numerology : 'या' जन्मतारखेच्या मुली वडिलांसाठी ठरतात लक्ष्मी, पतीच्या घरी होते धनसंपत्तीची भरभराट
'या' जन्मतारखेच्या मुली वडिलांसाठी ठरतात लक्ष्मी, पतीच्या घरी होते धनसंपत्तीची भरभराट
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Tuljapur Sarpanch Attack : कारवर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न, तुळजापुरात सरपंचावर जीवघेणा हल्लाTOP 90 : सकाळच्या 9 च्या 90 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 90 न्यूज :27 डिसेंबर 2024: ABP MajhaSambhajinagar News : बेरोजगार तरुणांची फसवणूक,  महाराष्ट्र कमांडो फोर्स जवान बनवण्याचं प्रलोभनManmohan Singh's Demise : मनमोहन सिंग यांच्या निधनानंतर देशात ७ दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Video : संसदेत टोकाची टीका, टोकाचा विरोध, पण मनमोहन सिंग यांचा असा 'शायराना' अंदाज ज्यानं नवा आदर्श घालून दिला!
Video : संसदेत टोकाची टीका, टोकाचा विरोध, पण मनमोहन सिंग यांचा असा 'शायराना' अंदाज ज्यानं नवा आदर्श घालून दिला!
Ind vs Aus 4th Test : मेलबर्नमध्ये चाहत्यांची घुसखोरी; कोहलीच्या गळ्यात टाकला हात अन्... मैदानात नेमकं काय घडलं? पाहा Video
मेलबर्नमध्ये चाहत्यांची घुसखोरी; कोहलीच्या गळ्यात टाकला हात अन्... मैदानात नेमकं काय घडलं? पाहा Video
Manmohan Singh : सोनं गहाण ठेवलं, टीका सहन केली पण भारताला संकटातून वाचवलं, मनमोहन सिंह यांच्याकडून आर्थिक सुधारणांची पायाभरणी 
कर्जाची परतफेड करण्यासाठीही परकीय चलन नव्हतं, मनमोहन सिंह यांनी सोनं गहाण ठेवण्याचा मार्ग स्वीकरला अन् चित्र बदललं   
Numerology : 'या' जन्मतारखेच्या मुली वडिलांसाठी ठरतात लक्ष्मी, पतीच्या घरी होते धनसंपत्तीची भरभराट
'या' जन्मतारखेच्या मुली वडिलांसाठी ठरतात लक्ष्मी, पतीच्या घरी होते धनसंपत्तीची भरभराट
Dharashiv Crime: मस्साजोगनंतर आता तुळजापूरच्या सरपंचावर जीवघेणा हल्ला, गुंडांकडून पेट्रोल टाकून गाडी जाळण्याचा प्रयत्न
मस्साजोगनंतर तुळजापूरमध्ये सरपंचावर हल्ला; काचा फोडून गाडीत पेट्रोलचे फुगे फेकले, गाडीसकट जिवंत जाळण्याचा प्रयत्न
Ind vs Aus 4th Test : आधी स्मिथचे शतक, त्यानंतर जडेजाची कमाल! ऑस्ट्रेलिया पहिल्या डावात 474 धावांवर ऑलआऊट
आधी स्मिथचे शतक, त्यानंतर जडेजाची कमाल! ऑस्ट्रेलिया पहिल्या डावात 474 धावांवर ऑलआऊट
Health: रेडिमेड सँडविच खात असाल तर सावधान! एका कारखान्याचा धक्कादायक व्हिडीओ समोर, आश्चर्यचकित व्हाल
रेडिमेड सँडविच खात असाल तर सावधान! एका कारखान्याचा धक्कादायक व्हिडीओ समोर, आश्चर्यचकित व्हाल
Manmohan Singh Death : डॉ. मनमोहन सिंह यांच्या निधनानंतर देशात 7 दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर
Manmohan Singh Death : डॉ. मनमोहन सिंह यांच्या निधनानंतर देशात 7 दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर
Embed widget