एक्स्प्लोर

Rashtraguru Samarth Ramdas: 'राष्ट्रगुरु समर्थ रामदास'; समर्थ रामदास स्वामींच्या जीवनावर आधारित चित्रपटाचा टीझर प्रदर्शित

Rashtraguru Samarth Ramdas: नुकताच या चित्रपटाचा टिझर प्रदर्शित करण्यात आला आहे. टीझरला उत्तम प्रतिसाद मिळत आहे.

Rashtraguru Samarth Ramdas: मराठी सिनेसृष्टीत ऐतिहासिक आणि आध्यात्मिक चित्रपटांचं वेगळंच स्थान आहे आणि आता या यादीत आणखी एक जबरदस्त चित्रपटाची भर पडतेय, ती म्हणजे, 'राष्ट्रगुरु समर्थ रामदास'. नुकताच या चित्रपटाचा टिझर प्रदर्शित करण्यात आला आहे. टीझरला उत्तम प्रतिसाद मिळत आहे. हा केवळ ऐतिहासिक चित्रपट नसून, समर्थ रामदास स्वामींच्या विचारांचा आधुनिक काळात जागर करणारा आहे.

10 वर्षांच्या मेहनतीचा प्रवास...

'राष्ट्रगुरु समर्थ रामदास' या चित्रपटाचं दिग्दर्शन सुप्रसिद्ध व्हिएफक्स डिझायनर अनिकेत साने यांनी केलं आहे. तर कल्पना फिल्म्स अँड व्हिएफएक्स स्टुडिओनं सिनेमाची निर्मिती केली आहे. 'जंगलबुक' या हॉलिवूडपटासारखा मराठीतही एक सिनेमा व्हावा, असा अनिकेत यांनी यावेळी प्रयत्न केला आहे. तब्बल 10 वर्षांच्या रिसर्च आणि मेहनतीनंतर हा प्रोजेक्ट उभा राहिला आहे. रामदास स्वामींच्या चरित्रावर भरपूर संशोधन करून आणि 'दासबोध'चा सखोल अभ्यास करून या चित्रपटाची कथा तयार करण्यात आली आहे.

साने यांनी या प्रोजेक्टसाठी मराठी सिनेसृष्टीतील अनेक लोकांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, पण अपेक्षित सहकार्य मिळालं नाही. त्यामुळे त्यांनी स्वतःच पुढाकार घेत, हा चित्रपट पूर्ण करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांना या प्रवासात अनेक अडचणी आल्या, पण त्यांचा निर्धार अढळ राहिला.

व्हिज्युअल ट्रीट... व्हिएफक्स स्पेशालिस्टचा ऐतिहासिक चित्रपट

अनिकेत साने हे नाव व्हिएफक्स डिझायनिंगमध्ये मोठं आहे. त्यांनी 'सनी', 'झिम्मा 2', 'नवरा माझा नवसाचा 2' यांसारख्या सुपरहिट मराठी सिनेमांसाठी व्हिएफक्स केलं आहे. तसंच 'गांधी टॉक्स', 'सनक', 'केरला स्टोरी' यांसारख्या हिंदी सिनेमांसोबतच, 'दिल बेकरार', 'सनफ्लॉवर 1' या वेबसीरिजमध्येही त्यांनी योगदान दिलं आहे. या अनुभवाचा पुरेपूर वापर करून, त्यांनी 'राष्ट्रगुरु समर्थ रामदास'मध्ये जबरदस्त व्हिएफक्स आणि ऐतिहासिक दृश्यं निर्माण केली आहेत. चित्रपटाच्या टिझरमध्ये सज्जनगड, काळाराम मंदिर,जांब समर्थ आणि इतर ऐतिहासिक स्थळं व्हिएफक्सद्वारे अगदी हुबेहुब साकारण्यात आली आहेत. यामुळे प्रेक्षकांना 16 व्या शतकात गेल्याची अनुभूती नक्की होते.

रामदास स्वामींच्या शिकवणींचा आधुनिक काळात जागर

'राष्ट्रगुरु समर्थ रामदास' हा चित्रपट केवळ इतिहास सांगणारा नाही, तर समाजाला दिशा देणारा आहे. समर्थ रामदास स्वामींची शिकवण आणि श्रवण भक्तीचे फायदे, त्यांचा कर्मयोग आणि भक्तीची संकल्पना हे सगळं प्रभावीपणे दाखवण्यात आलं आहे. सिनेमाबद्दल बोलताना अनिकेत साने म्हणतात की, "राष्ट्रगुरु समर्थ रामदास' हा केवळ एक चित्रपट नाही, तर समर्थ रामदास स्वामींच्या विचारांचा आधुनिक जागर आहे. त्यांनी समाजासाठी दिलेलं योगदान आणि त्यांची शिकवण आजच्या तरुणाईपर्यंत पोहोचवणं हा माझा मुख्य उद्देश आहे." 

दरम्यान, समर्थ रामदास स्वामींच्या विचारांना नव्या पिढीपर्यंत पोहोचवणारा हा चित्रपट लवकरच मोठ्या पडद्यावर येणार आहे. प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली असून, हा ऐतिहासिक प्रवास अनुभवण्यासाठी सगळेच उत्सुक आहेत. 

पाहा टीझर :

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

"केसाला धक्का, कपाळाला बुक्का"; डायलॉग शिवाचा पण स्वॅग पुष्पाभाऊचा, पूर्वा कौशिकनं सांगितलं बॅक स्टेज किस्सा

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Nashik Crime News: भंडाऱ्याच्या प्रसादावरून खटके उडाले, धाकट्या भावानेच थोरल्या भावाला संपवलं; नाशिकमध्ये रक्तरंजित थरार
भंडाऱ्याच्या प्रसादावरून खटके उडाले, धाकट्या भावानेच थोरल्या भावाला संपवलं; नाशिकमध्ये रक्तरंजित थरार
ठाकरेंच्या निशाण्यावरील अण्णामलाईची मुंबईतील भाजप आमदाराकडून पाठराखण; म्हणाले, ते IPS अधिकारी होते
ठाकरेंच्या निशाण्यावरील अण्णामलाईची मुंबईतील भाजप आमदाराकडून पाठराखण; म्हणाले, ते IPS अधिकारी होते
Gold Rate : सोने चांदीचे दर उच्चांकावर, सोनं 2883 रुपयांनी महागलं, चांदीच्या दरात 14475 रुपयांची वाढ, 22 आणि 24 कॅरेट सोन्याचे दर जाणून घ्या
सोनं 2883 रुपयांनी महागलं, चांदीच्या दरात 14475 रुपयांची वाढ, 22 आणि 24 कॅरेट सोन्याचे दर जाणून घ्या
अकोल्यात भाजप-एमआयएम युतीचा दुसरा अंक; भाजपचे जितेन बरेठिया MIM च्या पाठिंब्यांवर स्वीकृत नगरसेवक
अकोल्यात भाजप-एमआयएम युतीचा दुसरा अंक; भाजपचे जितेन बरेठिया MIM च्या पाठिंब्यांवर स्वीकृत नगरसेवक

व्हिडीओ

Shrikant Shinde Majha Katta : पळवापळवी, राजकीय कलह ते युती, श्रीकांत शिंदेंसोबत माझा कट्टावर चर्चा
Uddhav Thackeray Full Speech : मुंबईचा घास भाजपला गिळू देणार नाही, 20 वर्षानंतर भावासमोर तुफान भाषण
Aaditya Thackeray Speech ShivajiPark: भरसभेत फडणवीसांची मिमिक्री, कोस्टल रोडवरून हल्लाबोल
Praniti Shinde on BJP :  काँग्रेस खासदार प्रणिती शिंदेची देवेंद्र फडणवीस यांच्यावर सडकून टीका
Prakash Mahajan On Sanjay Raut Thane : संजय राऊत यांच्यावर टीका करताना प्रकाश महाजन यांची जीभ घसरली

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nashik Crime News: भंडाऱ्याच्या प्रसादावरून खटके उडाले, धाकट्या भावानेच थोरल्या भावाला संपवलं; नाशिकमध्ये रक्तरंजित थरार
भंडाऱ्याच्या प्रसादावरून खटके उडाले, धाकट्या भावानेच थोरल्या भावाला संपवलं; नाशिकमध्ये रक्तरंजित थरार
ठाकरेंच्या निशाण्यावरील अण्णामलाईची मुंबईतील भाजप आमदाराकडून पाठराखण; म्हणाले, ते IPS अधिकारी होते
ठाकरेंच्या निशाण्यावरील अण्णामलाईची मुंबईतील भाजप आमदाराकडून पाठराखण; म्हणाले, ते IPS अधिकारी होते
Gold Rate : सोने चांदीचे दर उच्चांकावर, सोनं 2883 रुपयांनी महागलं, चांदीच्या दरात 14475 रुपयांची वाढ, 22 आणि 24 कॅरेट सोन्याचे दर जाणून घ्या
सोनं 2883 रुपयांनी महागलं, चांदीच्या दरात 14475 रुपयांची वाढ, 22 आणि 24 कॅरेट सोन्याचे दर जाणून घ्या
अकोल्यात भाजप-एमआयएम युतीचा दुसरा अंक; भाजपचे जितेन बरेठिया MIM च्या पाठिंब्यांवर स्वीकृत नगरसेवक
अकोल्यात भाजप-एमआयएम युतीचा दुसरा अंक; भाजपचे जितेन बरेठिया MIM च्या पाठिंब्यांवर स्वीकृत नगरसेवक
मोठी बातमी! शिवाजी पार्कवरुन आदित्य ठाकरेंनी फोटो दाखवला, फडणवीसांनी कोस्टल रोडचा किस्साच सांगितला
मोठी बातमी! शिवाजी पार्कवरुन आदित्य ठाकरेंनी फोटो दाखवला, फडणवीसांनी कोस्टल रोडचा किस्साच सांगितला
Nashik Bribe: नाशिकमध्ये खाकी वर्दीला डाग लागला, अटकपूर्व जामिनासाठी दोघांनी मागितली दोन लाखांची लाच, गुन्हा दाखल होताच पोलीस पसार
नाशिकमध्ये खाकी वर्दीला डाग लागला, अटकपूर्व जामिनासाठी दोघांनी मागितली दोन लाखांची लाच, गुन्हा दाखल होताच पोलीस पसार
मोठी बातमी! राज्यातील जिल्हा परिषदांच्या निवडणुका पुढे ढकलल्या; सुप्रीम कोर्टाची निवडणूक आयोगाला परवानगी
मोठी बातमी! राज्यातील जिल्हा परिषदांच्या निवडणुका पुढे ढकलल्या; सुप्रीम कोर्टाची निवडणूक आयोगाला परवानगी
Pramod Jadhav Satara: पत्नीच्या डिलिव्हरीसाठी सुट्टीवर आला, अपघातात मृत्यू झाला; एकीकडे लेकीचा जन्म झाला, दुसरीकडे बापाचा देह उठला, सातारामधील घटनेनं महाराष्ट्र रडला!
पत्नीच्या डिलिव्हरीसाठी सुट्टीवर आला, अपघातात मृत्यू झाला; एकीकडे लेकीचा जन्म झाला, दुसरीकडे बापाचा देह उठला, सातारामधील घटनेनं महाराष्ट्र रडला!
Embed widget