"केसाला धक्का, कपाळाला बुक्का"; डायलॉग शिवाचा पण स्वॅग पुष्पाभाऊचा, पूर्वा कौशिकनं सांगितलं बॅक स्टेज किस्सा
Zee Chitra Gauarav 2025: पुरस्कार सोहळ्यातील एका खास परफॉर्मेंसचा किस्सा आपल्या शिवानं म्हणजेच, पूर्वा कौशिकनं सांगितला. या सोहळ्याला अनेक मान्यवरांनी उपस्थिती लावली होती.

Zee Chitra Gauarav 2025: 'झी चित्र गौरव' (Zee Chitra Gauarav) पुरस्काराचं यंदाचं 25 वं वर्ष आहे. तेव्हा यावर्षी प्रेक्षकांसाठी या पुरस्कार सोहोळ्यात अनेक सरप्रायझिंग एलेमेंट्स असणार आहेत. याच पुरस्कार सोहळ्यातील एका खास परफॉर्मेंसचा किस्सा आपल्या शिवानं (Marathi Serial Shiva) म्हणजेच पूर्वा कौशिक (Purva Kaushik) ने सांगितला. या सोहळ्याला अनेक मान्यवरांनी उपस्थिती लावली होती.
"झी चित्र गौरव पुरस्कार आपलं 25 वं वर्ष साजरं करत आहे. मला त्यात सहभागी होण्याची संधी मिळाली खूप भारी वाटलं. या सोहळ्यात शिवा म्हणून मला डांस करण्याची संधी मिळाली आणि ते ही श्रेयस तळपदेसोबत. मी लहान असताना त्यांचा इकबाल सिनेमा पहिला होता आणि त्यासोबत बरेच सिनेमे आणि मालिकाही पहिल्या आहेत. माझ्यासाठी तो मोठा सेलेब्रिटी आहे, उत्तम कलाकार आहे. आम्ही 2 वेळा टेक्निकल केली आणि मग वन टेक परफॉर्म केलं."
View this post on Instagram
"एक किस्सा मला सांगायला आवडेल, हे तर सर्वांना माहिती आहे की, श्रेयसनं पुष्पा फिल्मच्या हिंदी व्हर्जनमध्ये आपला आवाज दिला आहे, जेव्हा मी बॅक स्टेज श्रेयसला भेटले तेव्हा मी त्याला शिवा म्हणून एक विनंती केली की, शिवाचा एक डायलॉग बोलशील का? "केसाला धक्का, कपाळाला बुक्का" आणि त्यानं पुष्पाच्या आवाजात तो डायलॉग म्हणून दाखवला. जे मला इतकं भारी वाटलं...", असं शिवा फेम अभिनेत्री पूर्वा कौशिक म्हणाली.
दरम्यान, झी मराठीचा (Zee Marathi) 'झी चित्र गौरव पुरस्कार 2025' (Zee Chitra Gauarav Award 2025) येत्या 8 मार्चला प्रसारित केला जाणार आहे. या भव्य सोहळ्याचे प्रोमो सध्या सोशल मीडियावर (Social Media) धुमाकूळ घालत आहेत. झी मराठीच्या झी गौरव पुरस्कारांचं यंदाचं 25वं वर्ष आहे. मनोरंजनाचा हा सोहळा खूप जुन्या आठवणींना उजाळा देणारा असणार आहे. त्यासोबतच नव्या आठवणींचा साठाही होणार आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
श्रेयस तळपदेसोबत 'पारू'नं शेअर केला स्टेज; म्हणाली, "हा माझ्यासाठी..."























