Aamir Khan Old Video: '25 शिव्या देऊन...', इकडं रणवीर अलाहाबादियाचं प्रकरण तापलं, तिकडं आमिर खानचा Video ठरतोय चर्चेचा विषय
Aamir Khan Old Video: सोशल मीडियापासून ते टीव्ही आणि यूट्यूबपर्यंत सर्वत्र याच प्रकरणाची चर्चा सुरू आहे. रणवीर अलाहाबादिया आणि समय रैना यांच्याविरोधात लोक संताप व्यक्त करत आहेत.

Ranveer Allahbadia Controversy On India's Got Latent : प्रसिद्ध यूट्यूबर रणवीर अलाहाबादिया सध्या चांगलाच वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. इंडियाज गॉट लेटेन्ट या कार्यक्रमात त्याने पालकांवर केलेल्या आक्षेपार्ह विधानानंतर देशभरातून संताप व्यक्त केला जात आहे. विशेष म्हणजे रणवीरने या विधानाबाबत माफी मागितली आहे. पण तरीही हा वाद संपताना दिसत नाहीये. असे असतानाच आता इंडियाज गॉट लेटेन्ट या कार्यक्रमावरच बंदी घालावी, अशी मागणी केली जात आहे. समय रैना, रणवीर आणि अपूर्व माखिजा यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोशल मीडियापासून ते टीव्ही आणि यूट्यूबपर्यंत सर्वत्र याच प्रकरणाची चर्चा सुरू आहे. रणवीर अलाहाबादिया आणि समय रैना यांच्याविरोधात लोक संताप व्यक्त करत आहेत. या शोवर बंदी घालण्याचीही मागणी होत आहे. दुसरीकडे, काही लोक म्हणत आहेत, चूक झाली आहे, एकदा माफ करा. यादरम्यान, अभिनेता आमिर खानचा एक जुना व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
या व्हिडीओमध्ये आमिर खान म्हणतो, की तो लहान मूल नाही आणि कॉमेडी करताना वापरल्या जाणाऱ्या शिव्या ऐकून आनंद व्हायला. मात्र, हा व्हिडिओ समय रैना आणि रणवीर अलाहाबादियाच्या एपिसोडशी आणि सुरू असलेल्या वादाशी जोडला जात आहे. पण ते खरे नाही. व्हिडिओ खूप जुना आहे.
आमिर खानचा जुना व्हिडिओ व्हायरल
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये आमिर खान म्हणतो, “मला हे मजेदार वाटलं नाही. 25 वेळा शिव्या देऊन तुम्हाला वाटते की मी इम्प्रेस होईन. मी शिव्यांमुळे इम्प्रेस होण्याचे वय ओलांडलं आहे. मी 14 वर्षाचा नाही, शिव्या ऐकून हाहाहा करत हसायला. मी खराब बोलण्याने प्रभावित होत नाही, जर तुम्हाला मला हसवायचे असेल, तर कोणालाही न दुखावता मला हसवा, मग मलाही मजा येईल.” आमिर पुढे म्हणतो- “एखाद्याच्या रंगावर बोलून आणि त्याबद्दल विनोद कराल आणि मी तुमच्याबरोबर हसेन. भाऊ, मला यावर हसू येत नाही. या गोष्टी मला आवडत नाहीत. यामुळे मी शो पाहत नाही. हा शो मला माझ्या आवडीचा वाटत नाही, म्हणून मला तो पाहायचा नाही."
Aamir khan on vulgar comedy-#RanveerAllahbadiaControversy #RanveerAllahbadi pic.twitter.com/sxlZLqt036
— The mood doctor (@Chulbulpanda420) February 11, 2025
व्हिडिओ किती जुना आहे?
हा व्हिडिओ सोशल मिडिया एक्स X वरती एका युजरने शेअर केला आहे. आमिर खानने वल्गर कॉमेडीबाबत आपले मत व्यक्त केले आहे. त्याला हा कॉमेडी शो का आवडत नाही हे तो सांगत आहे. मात्र, हा व्हिडिओ 2015 चा आहे. एआयबीच्या रोस्ट शो नॉक आउटनंतरचा हा व्हिडिओ आहे. त्या शोवरही बराच गदारोळ झाला होता. त्या शोबद्दल जेव्हा आमिर खानला विचारण्यात आले तेव्हा त्याने हे उत्तर दिले होते.























