Rang Majha Vegla : होळीच्या सणात रंगांची उधळण होणार, दीपा-कार्तिकच्या आयुष्यात नियती प्रेमाचे रंग भरणार!
Rang Majha Vegla : रंगपंचमीच्या दिवशी दीपा आणि कार्तिक दोघेही एकमेकांवरील प्रेमाची कबुली देणार आहेत.
Rang Majha Vegla : स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘रंग माझा वेगळा’ (Rang Majha Vegla) ही मालिका सध्या टीआरपीच्या शर्यतीत देखील अव्वल आहे. या मालिकेतील सतत बदलते ट्रक आणि कथेतील ट्विस्ट मालिकेची रंगत वाढवत आहेत. शिवाय यातील कलाकारांच्या अभिनयाने देखील प्रेक्षकांना भुरळ घातली आहे. छोट्याशा कार्तिकी आणि दीपिकाच्या अभिनयाला देखील प्रेक्षकांकडून कौतुकाची थाप मिळत आहे. सध्या मालिकेत होळीचा माहोल आहे. होळीच्या सणात रंगांसोबतच प्रेमाची उधळण देखील पाहायला मिळणार आहे.
मालिकेत सध्या बरेच ट्विस्ट आणि कथेतील वळणं पाहायला मिळत आहेत. दीपा घरात आली असली तरी श्वेता आणि आयेशा दोघी मिळून तिला घराबाहेर काढण्यासाठी नव नवे डाव रचत आहेत. आधी त्यांनी कार्तिकी-दीपाचा अपमान करण्याचा प्रयत्न केला. मात्र, सौंदर्याने श्वेताला दीपाची माफी मागण्यास भाग पाडले. यानंतर आता दोघींनी मिळून होळीच्या दिवशी दीपाला त्रास देण्यासाठी नवे डाव आखले आहेत. यामध्ये त्यांचा ‘बॉम्ब’चा डाव उध्वस्त झाल्यानंतर त्या आता आणखी नवे कारनामे करणार आहेत.
भांगेच्या नशेत दीपा-कार्तिक देणार प्रेमाची कबुली!
सगळीकडे रंगपंचमी सुरु असताना इनामदारांच्या घरात देखील रंगांची उधळण होणार आहे. दरम्यान, दीपा आणि कार्तिक थंडाई पितात. या थंडाईमध्ये भांग मिसळलेली आहे, याची त्यांना कल्पनाच नसते. भांगयुक्त थंडाई प्यायल्याने दोघेही बेभान होऊन नाचतात. यावेळी कार्तिक दीपाला एकटक पाहत उभा राहतो आणि म्हणतो दीपा तू किती छान नाचतेस... यावर दीपा कार्तिकला म्हणते, खरंच तुला माझा डान्स आवडला का? तिच्या प्रश्नाला उत्तर देताना कार्तिक म्हणतो, मला तुझा डान्सच नाही तर, तू पण आवडतेस, माझं तुझ्यावर प्रेम आहे. कार्तिकच बोलणं ऐकून दीपा देखील आपल्या प्रेमाची कबुली देते.
आता हे दोघेही भांगेच्या नशेत असल्याने एकमेकांवरील प्रेमाची कबुली देतात. मात्र, जेव्हाही हे दोघे शुद्धीत येतील तेव्हा त्यांना घडून गेलेली गोष्ट लक्षात येईल का? त्यांचं नातं पुन्हा पहिल्यासारखं होईल का? याकडे प्रेक्षकांचं लक्ष लागलं आहे.
हेही वाचा :
- The Kashmir Files Box Office Collection Day 4: आठवड्याच्या पहिल्या दिवशीही बॉक्स ऑफिसवर दिसली ‘द काश्मीर फाईल्स’ची जादू!
- Alia Bhatt : ‘शेरशाह’साठी कियारा नव्हे आलियाला होती पहिली पसंती!
- Kapil Sharma : खरंच कपिल शर्माने ‘द काश्मीर फाईल्स’चं प्रमोशन करणं टाळलं? पाहा काय म्हणाले अनुपम खेर...
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha