हॅालीवूडमध्ये काम करण्याच्या अनुभवावर व्यक्त झाली प्रियंका चोप्रा, म्हणाली...
प्रियंकाने एका मुलाखतीमध्ये खुलासा केला आहे की, तिला हॅालीवुड मध्ये आपल्याच लोकांकडून भरपूर निगेटिव्हिटीला सामोरे जावे लागत आहे.
![हॅालीवूडमध्ये काम करण्याच्या अनुभवावर व्यक्त झाली प्रियंका चोप्रा, म्हणाली... priyanka chopra shares her experience while working in hollywood in her book हॅालीवूडमध्ये काम करण्याच्या अनुभवावर व्यक्त झाली प्रियंका चोप्रा, म्हणाली...](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2017/11/18222944/priyanka-chopra.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
मुंबई : प्रियंका चोप्रा केवळ बॅालिवूड पर्यंतच मर्यादित नाही तर तिची ओळख जगभर पसरलेली आहे. नुकतेच तिने तिचे पुस्तक 'Unfinished' लॅान्च केले आहे. ज्याला चाहत्यांचा खूप चांगला प्रतिसाद मिळाला आहे. आता प्रियंकाने एका मुलाखतीमध्ये खुलासा केला आहे की, तिला हॅालीवुडमध्ये आपल्याच लोकांकडून भरपूर निगेटिव्हिटीला सामोरे जावे लागले.
![हॅालीवूडमध्ये काम करण्याच्या अनुभवावर व्यक्त झाली प्रियंका चोप्रा, म्हणाली...](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2021/01/13135031/Priyanka-Chopra2-239x300.jpg)
हॅालीवूडमध्ये काम करण्याच्या अनुभवावर प्रियंका चोप्रा व्यक्त झाली आहे. "आपल्याच लोकांकडून नकारात्मक ऊर्जा मिळाली आहे प्रियंका म्हणाली, मी काही महिन्यांपूर्वी मिंडी कॉलिंगसोबत बोलत होते, आपल्याला आपल्याच लोकांना एवढी नकारात्मकता का सहन करावी लागते. हॅालीवुड मध्ये एंटरटेनमेंट बिझनेसमध्ये खूपच कमी सावळे लोकं आहेत. का? आपण त्यांना आपल्या हाताच्या बोटावर मोजू शकतो. तरीही आपल्याला इतका नकारात्मकताेचा सामना का करावा लागतो."
प्रियंका पुढे म्हणाली की, 2015 मध्ये जेव्हा तिने हॅालिवुड मध्ये क्वांटिको ने सुरुवात केली तेव्हा तिला जाणवलं की हॅालीवुडच्या मेनस्ट्रीम शो मध्ये लीड हीरो किंवा अभिनेत्री भारतीय असणं हे काही लोकांना सहन होत नव्हतं. तेव्हा तिने आपल्या बाजुने लोकांचा दृष्टीकोन बघितला. एकीकडे तिला फॅन्सचं प्रेम आणि सपोर्ट मिळत होता. तर दुसऱ्या बाजुने त्या नकारात्मकता पसरवणाऱ्या लोकांमुळे हैराण झाली होती . प्रियंका या दिवसांत लंडन मध्ये 'टेक्स्ट फॅार यू' नावाच्या चित्रपटाची शूटिंग करत आहे.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)