Paparazzi | सेलिब्रेटींच्या खासगी आयुष्यात डोकावणारे हे पॅपराजी नेमके कोण असतात?
सेलिब्रेटींच्या खासगी आयुष्यात डोकावून त्यांचे नाजूक क्षण सार्वजनिक करण्याचे काम हे पॅपराजी (Paparazzi) करत असतात. याच्या पाठलागापासून सुटका मिळवण्याच्या प्रयत्नात प्रिन्सेस डायनाचा (Diana, Princess of Wales) दुर्दैवी मृत्यू झाला होता.
Paparazzi: विराट कोहली आणि अनुष्का शर्माला मुलगी झाल्यानंतर तिचा पहिला फोटो काढण्यासाठी अनेक पॅपराजी आतुर आहेत. त्यांना कंटाळून विराटने आणि अनुष्काने पॅपराजींनी आपल्या खासगी आयुष्यात डोकावू नये असे ठणकावले आहे. त्यामुळे हे पॅपराजी पुन्हा चर्चेत आले आहेत.
पॅपराजी हे फोटाग्राफीच्या क्षेत्रातील बदनाम झालेले लोक असतात असं म्हटलं जातं. कारण या पूर्वी पॅपराजींनी सेलिब्रेटींच्या आयुष्यातील नाजूक आणि खासगी क्षणही सार्वजनिक केले आहेत. त्यामुळे सेलिब्रेटीची बदनामी तर होतेच पण त्यांना नाहक मनस्ताप होतो. मेनस्ट्रीम मीडियाशी संबंधित असले तरीपॅपराजी हे स्वतंत्र फोटोग्राफर असतात. महत्वाच्या सेलिब्रेटींचे महत्वाचे फोटो ते माध्यमांना विकतात.
हे एक स्वतंत्र्य प्रकारचे फोटोग्राफर असतात जे सेलिब्रेटी, राजकारणी, खेळाडू किंवा इतर महत्वाच्या लोकांचे त्याच्या नियमीत जीवनातील फोटो काढतात आणि माध्यमांना विकतात. कोणताही सेलिब्रेटी असो वा इतर महत्वाचा व्यक्ती असो, त्यांनाही व्यक्तिगत आयुष्य असतं. त्यांच्या व्यक्तिगत आयुष्यात हे पॅपराजी डोकावतात आणि त्यांचे फोटो काढून ते सार्वजनिक करण्याचे काम करतात. खासकरुन सेलिब्रेटी लोकांच्यावर आधारित माध्यमांना किंवा त्यांच्याविषयी चर्चा करण्यात येणाऱ्या माध्यमांना हे पॅपराजी त्यांच्याकडील फोटो विकतात.
पॅपराजी (Paparazzi) हा एक इटालीयन शब्द असून त्याचा उच्चार इटालियन भाषेत हा पापारास्ती असा होतो.
पॅपराजी हा शब्द पहिल्यांदा वापरात आला होता तो 1950 च्या दशकात. त्यावेळी रोमच्या काही फोटोग्राफरनी इजिप्तचा शाह फारुख याचे काही खासगी फोटो काढले होते आणि ते सार्वजनिक केले होते. पण या शब्दाचा त्यावेळी जास्त वापर करण्यात आला नाही. अशा फोटोग्राफरना त्यावेळी अपमानजनक भाषेत स्ट्रीट फोटोग्राफर म्हटलं जायचं.
पॅपराजींवर चित्रपट प्रसिध्द इटालियन चित्रपट निर्माता फेड्रिक फ्लेनीने इजिप्तच्या शाह फारुखचे खासगी फोटो काढणाऱ्या एका तरुण फोटोग्राफरच्या जीवनावर आधारित 'La Dolce Vita' या चित्रपटाची निर्मिती करण्याचं ठरवलं. इजिप्तचा शाह फारुखचे एका हॉटेलमध्ये असताना असे काही फोटो काढण्यात आले होते की ज्यात तो खूप रागावलेला दिसत आहे. एक फोटो असा काढलेला होता ज्यात शाह फारुखने समोरचा टेबल उलटून टाकला. या चित्रपटातील फोटोग्राफरचे नाव हे कोरिओलानो पापारास्ती असे होते. त्यानंतर हे नाव लोकांमध्ये चर्चेत आले. चित्रपट निर्माण करताना त्यांच्या ध्यानीमनीही नव्हते की आपण इंग्रजी भाषेला एक नवा शब्द देतोय.
PHOTO : तैमुर करतोय गोसेवा! घराबाहेर गाईला चारा देतानाचे फोटो व्हायरल
प्रिन्सेस डायनाचा अपघाती मृत्यू प्रिन्सेस डायनाचा अपघाती मृत्यू झाल्यानंतर हा शब्द मोठ्या प्रमाणावर चर्चेत आला. प्रिन्सेस डायना आणि तिचा प्रियकर दोदी फायद 1997 साली पॅरिसमध्ये असताना या पॅपराजींच्या पाठलागापासून सुटका मिळावी म्हणून ड्रायव्हरने गाडीचा वेग वाढवला आणि त्यातच ड्रायव्हरचा गाडीवरील ताबा सुटला. या अपघातात प्रिन्सेस डायना आणि तिचा प्रियकर या दोघांचाही मृत्यू झाला. न्यायालयात या अपघातासाठी दोषी असलेल्या पॅपराजींवर खटला चालवण्यात आला, पण कोणीही दोषी सापडले नाही. शेवटी गाडीच्या ड्रायव्हरने दारु पिलेली आणि त्यानंतर गाडी अती वेगाने चालवल्याने प्रिन्सेस डायनाचा अपघाती मृत्यू झाल्याचं जाहीर करण्यात आलं.
प्रिन्सेस डायनाची कथा 2022 मध्ये रुपेरी पडद्यावर येणार
काय करतात हे पॅपराजी? आपल्या आवडती सेलिब्रिटी, मग ती कोणत्याही क्षेत्रातली असो, ती काय करते, कुठे जाते किंवा काय खाते अशा अनेक गोष्टींबद्दल आपल्याला उत्सुकता असते. त्यांच्या खासगी जीवनात काय सुरु आहे या गोष्टींबद्दल चाहत्यांना खूप उत्सुकता असते. सामान्य लोकांना तर याबद्दल काही माहिती काढता येऊ शकत नाही. पण अशा सेलिब्रेटींच्या खासगी आयुष्यात डोकावून त्यांच्याशी संबंधीत रंजक फोटो अनेक माध्यमांमध्ये छापले जातात. हे अशा प्रकारे सेलिब्रेटींचे खासगी आयुष्यात फोटोंच्या माध्यमातून सार्वजनिक करणाऱ्यांना पॅपराजी म्हणतात.
PHOTO | स्किनफिट योगा आउटफिट्समध्ये मलायकाचा जलवा
जगातील सर्व प्रमुख शहरांमध्ये या पॅपराजींची सख्या काही कमी नाही. भारतात मुंबईसारख्या ठिकाणी पैपराजींची संख्या मोठी असते. हे लोक खासकरुन फिल्मस्टार्सच्या मागे हात धुवून लागलेले असतात. फिल्मस्टार्संची लाईफस्टाइल, त्यांचे जीम मधील फोटो, चित्रपट थिएटरमध्ये त्यांचा पाठलाग करुन काढलेले फोटो, एअरपोर्टवरचे फोटो असे फोटो अनेक माध्यमांत छापले जातात. हे पॅपराजींच्या मुळेच शक्य होते. फिल्मस्टार्स काय खातात त्यापासून ते कोणते कपडे वापरतात इथपर्यंत सर्व प्रकारची माहिती या पॅपराजींच्यामुळे उघडकीस येते.
सेलिब्रेटींचे Oops Moment कॅमेरात कैद महत्वाचे म्हणजे यांच्या काही फोटोंमुळे काही वेळा सुमार दर्जाचे अभिनेता वा अभिनेत्रीही अनेकवेळा चर्चेत असतात. पण मोठ्या स्टार्सना मात्र हे पैपराजी वैतागून सोडतात. सेलिब्रिटी लोकांची प्रायव्हसी या पॅपराजींमुळे अनेक वेळा धोक्यात येते. पूर्वी लोक सेलिब्रेटींना मॅगेजीनच्या कव्हर पेजवर पाहायचे. आता या पॅपराजींमुळे त्यांना पार्टी लूक, एअरपोर्ट वा जीम लूकमध्येही पाहता येते. इतकेच नव्हे चोरुन सेलिब्रेटिंचे Oops Moment क्लिक करण्यात येतात आणि ते सार्वजनिक करण्यात येतात.
या क्षेत्रात सध्या स्पर्धा खूप वाढली आहे. महत्वाचे फोटो घेण्यासाठी यांना 24 तास अलर्ट रहावं लागतं. त्यातच सोशल मीडियाने आता यांचे काम खूप अवघड केलं आहे. त्यामुळे आता सेलिब्रेटींचा फोटो क्लिक करुन भागत नाही तर त्यांच्याशी संबंधित स्टोरीदेखील करावी लागते. सेलिब्रेटींचे व्हिडीओ करावे लागतात.