![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Panchayat Season 2 : प्रेक्षकांसाठी सरप्राईज! ठरलेल्या वेळेच्या दोन दिवस आधीच रिलीज झाली ‘पंचायत 2’
Panchayat Season 2 : अभिनेता जितेंद्र कुमार याने त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवर एक फोटो शेअर केला आहे, ज्यामध्ये त्याने वेब सीरीजच्या रिलीजची माहिती दिली आहे.
![Panchayat Season 2 : प्रेक्षकांसाठी सरप्राईज! ठरलेल्या वेळेच्या दोन दिवस आधीच रिलीज झाली ‘पंचायत 2’ Panchayat Season 2 Released 2 days early on Amazon Prime Video know the reason Panchayat Season 2 : प्रेक्षकांसाठी सरप्राईज! ठरलेल्या वेळेच्या दोन दिवस आधीच रिलीज झाली ‘पंचायत 2’](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/05/19/b8d4acccdc0e287fe3fef0a8a4c7f435_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Panchayat Season 2 : अॅमेझॉन प्राईमच्या ‘पंचायत’ (Panchayat Season 2) या वेब सीरीजचा दुसरा सीझन 20 मे रोजी रिलीज होणार होता. मात्र, निर्मात्यांनी तो दोन दिवसांपूर्वीच रिलीज केला आहे. पंचायत 2’ ही वेब सीरीज Amazon Prime Video या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज झाली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, दुसरा सीझन अनेक सोशल मीडिया साईट्स आणि टेलिग्रामवर लीक झाला होता. त्यानंतर निर्मात्यांनी वेब सीरीज लवकर प्रदर्शित करण्याचा निर्णय घेतला आहे. 'पंचायत' सीरीजमधील मुख्य अभिनेता जितेंद्र कुमारने सोशल मीडियावर एक फोटो शेअर करत याची माहिती दिली आहे.
अभिनेता जितेंद्र कुमार याने त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवर एक फोटो शेअर केला आहे, ज्यामध्ये त्याने वेब सीरीजच्या रिलीजची माहिती दिली आहे. अभिनेत्याच्या घरात असलेल्या टीव्ही स्क्रीनवर 'पंचायत 2' सुरू असल्याचे या फोटोत दिसत आहे. टीव्ही स्क्रीनवर वेब सीरीजचे नाव मोठ्या अक्षरात दिसत आहे. सोबत अभिनेत्याने कॅप्शनमध्ये देखील सीरीज रिलीज केल्याचे म्हटले आहे.
... म्हणून दोन दिवस आधीच रिलीज!
‘पंचायत’ या वेब सीरीजच्या दुसऱ्या सीझनमध्ये एकूण आठ भाग आहेत. टेलिग्रामवर या सीरीजचा दुसरा सीझन नुकताच लीक झाला होता. याशिवाय सीरीजचे पायरेटेड व्हर्जनही अनेक वेबसाईटवर लीक झाले होते. त्यामुळेच संभाव्य परिस्थितीत लक्षात घेत निर्मात्यांनी दोन दिवसांपूर्वी अॅमेझॉन प्राईम व्हिडीओवर ही सीरीज अधिकृत रिलीज केली आहे. ठरलेल्या वेळेच्या दोन दिवस आधीच सीरीज रिलीज झाल्याने प्रेक्षक देखील खुश झाले आहेत.
‘पंचायत 2’साठी प्रेक्षकही उत्सुक!
गेल्या वर्षी म्हणजेच 2020 मध्ये 'पंचायत’ या सीरीजचा पहिला सीझन रिलीज झाला होता. लॉकडाऊन दरम्यान या वेब सीरीजने लोकांचे भरपूर मनोरंजन केले होते. या वेब सीरीजची कथा आणि आशय लोकांना खूप आवडला होता. पहिल्या सीझनमध्ये इंजिनीअरिंग केलेला अभिषेक त्रिपाठी ‘पंचायत सचिव’ म्हणून फुलेरा गावात येतो, पण इथली परिस्थिती पाहून पहिल्याच दिवशी नोकरी सोडण्याचा निर्णय घेतो. अशा परिस्थितीत, तो एमबीए करण्यासाठी कॅट परीक्षा देण्याचा विचार करतो आणि त्यात यशस्वी होऊ शकत नाही. पुढे काय घडते, ते प्रेक्षकांना या नव्या सीझनमध्ये पाहायला मिळणार आहे.
हेही वाचा :
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)