एक्स्प्लोर

Raanbaazaar : बिग बजेट ‘रानबाजार’चा ट्रेलर प्रदर्शित; 20 मे ला येणार प्रेक्षकांच्या भेटीला

Raanbaazaar : ‘रानबाजार’ ही वेब सीरिज 20 मे पासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Raanbaazaar : बिग बजेट ‘रानबाजार’ (Raanbaazaar) या वेब सीरिजचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. अभिजित पानसे लिखीत, दिग्दर्शित ‘रानबाजार’ या वेब सीरिजच्या टीझरने सोशल मीडियावर चांगलाच धुमाकूळ घातला होता. या बोल्ड टिझरची सर्वत्र चर्चा रंगल्यानंतर आता ‘रानबाजार’चा जबरदस्त ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. 

‘रानबाजार’च्या टीझरमध्ये तेजस्विनी पंडीत आणि  प्राजक्ता माळीचा बोल्ड अंदाज प्रेक्षकांना पाहायला मिळाला आहे. आता ट्रेलरदेखील प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. या वेबसीरिजमध्ये उर्मिला कोठारे, मोहन आगाशे, मोहन जोशी, मकरंद अनासपुरे, सचिन खेडेकर, वैभव मांगले, अनंत जोग, सुरेखा कुडची, अभिजित पानसे, गिरीष दातार, निलेश दिवेकर, श्रेयस राजे, अतुल काळे, वनिता  खरात आणि माधुरी पवार यांच्या मुख्य भूमिका आहेत. 

पॅलिटिकल क्राईम थ्रिलर असलेल्या या वेबसीरिजची निर्मिती प्लॅनेट मराठी, अ व्हिस्टास मीडिया कॅपिटल कंपनी, रावण फ्युचर प्रॅाडक्शन, अभिजीत पानसे आणि अनिता पालांडे यांनी केली असून ही भव्य वेबसीरिज प्रेक्षकांना 20 मे पासून पाहायला मिळणार आहे. आजवर कधीही न पाहिलेले राजकारण, त्यातील धूर्त डावपेच, हनी ट्रॅप, उत्कंठा, नाट्यमय थरार हे सगळंच ट्रेलरमध्ये दिसत आहे. त्यामुळे ‘रानबाजार’ची उत्सुकता आता अधिकच शिगेला पोहोचली आहे. आजवरच्या वेबविश्वात कदाचित कधीही न पाहिलेली कथा या वेबसीरिजमध्ये पाहायला मिळणार आहे. 

‘रानबाजार’चे दिग्दर्शक अभिजित पानसे म्हणाले, “टिझरने सोशल मीडियावर अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. पहिल्याच दिवशी टिझरने लाखो व्ह्युजचा टप्पा पार केला असून ट्रेलरही प्रदर्शित झाला आहे. त्यामुळे प्रेक्षक आता वेबसीरिज प्रदर्शनाच्या प्रतिक्षेत आहेत. ही वेबसीरिज पाहताना प्रेक्षकांच्या मनात असं काहीसं घडलं होतं,  कदाचित, असा विचार आल्याशिवाय राहणार नाही. राजकारणाभोवती फिरणारी ही कथा असली त्याच्याशी जोडल्या जाणाऱ्या अनेक गोष्टी आहेत, ज्या कल्पनेपलीकडच्या आहेत. हेच गूढ ‘रानबाजार’मध्ये उलगडणार आहे. 

एका दिवसात टीझरला 10 लाखाहून अधिक व्ह्यूज

प्राजक्ता माळी आणि तेजस्विनी पंडित यांनी या टीझरच्या माध्यमातून चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. एका दिवसात या टीझरला 10 लाखाहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. सोशल मीडियावर या टीझरला प्रेक्षकांच्या उस्फुर्त प्रतिक्रिया मिळत आहेत. 20 मे पासून ही वेब सीरिज प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. अभिजित पानसे यांनी या वेब सीरिजचे दिग्दर्शन केले आहे. टीझर प्रदर्शित झाल्यामुळे प्रेक्षक आता वेब सीरिजची आतुरतेने वाट पाहत आहेत. 

संबंधित बातम्या

Prajakta Mali : 'रानबाजार' वेब सीरिजमध्ये प्राजक्ता माळीचा बोल्ड अंदाज, नेटकऱ्यांनी केले ट्रोल

Raan Baazaar : 'रानबाजार'च्या टीझरला एका दिवसांत मिळाले 10 लाखांपेक्षा अधिक व्ह्यूज

महत्त्वाच्या बातम्या

Pravin Tarde and Aadesh Bandekar: 'आदेशजींच्या घरी राहिलोय...'; वारीत प्रवीण तरडे अन् आदेश बांदेकरांची खास भेट, सांगितला संघर्षाच्या काळातील किस्सा
'आदेशजींच्या घरी राहिलोय...'; वारीत प्रवीण तरडे अन् आदेश बांदेकरांची खास भेट, सांगितला संघर्षाच्या काळातील किस्सा
Aaishvary thackeray in YRF Film: राजकारणापासून दूर, सिनेइंडस्ट्रीत ठेवलं पाऊल; यशराज फिल्म्समध्ये झळकणार बाळासाहेब ठाकरेंचा नातू
राजकारणापासून दूर, सिनेइंडस्ट्रीत ठेवलं पाऊल; यशराज फिल्म्समध्ये झळकणार बाळासाहेब ठाकरेंचा नातू
Dia Mirza Questions PM Modi : 'तुम्हाला काहीतरी बोलायला 47 दिवस...' पंतप्रधान मोदींच्या स्टेटमेंटवर दिया मिर्झाचा तिखट शब्दांत सवाल; म्हणाली..
'तुम्हाला काहीतरी बोलायला 47 दिवस...' पंतप्रधान मोदींच्या स्टेटमेंटवर दिया मिर्झाचा तिखट शब्दांत सवाल; म्हणाली..
Jana Nayakan Box Office: मुख्यमंत्र्यांच्या 'जना नायकन'ने दुसऱ्या दिवशी कमावले 'इतके' कोटी; चित्रपटावर पडला पैशांचा पाऊस, लवकरच 100 कोटी गाठणार
मुख्यमंत्र्यांच्या 'जना नायकन'ने दुसऱ्या दिवशी कमावले 'इतके' कोटी; चित्रपटावर पडला पैशांचा पाऊस, लवकरच 100 कोटी गाठणार

व्हिडीओ

Abhijeet Dipke JantarMantar: धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा, दिपके म्हणाले, कॉक्रोचसे पंगा नहीं लेना
Dharmendra Pradhan Resing CJP : झुरळांचा प्रहार, झुकलं सरकार, A to z स्टोरी
Dharmendra Pradhan Resing CJP : झुरळांचा लढा, सरकारला लढा Special Report
Devendra Fadnavis Pandharpur : तरुणाईला दिशा देण्यासाठी PM मोदींना आर्शीवाद द्यावा, विठुरायाकडे साकडं
Amruta Fadnavis Pandharpur : मी देवेंद्रजींना महाराष्ट्रातच ठेवणार, अमृता फडणवीस काय म्हणाल्या?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Weather Update:बंगालच्या उपसागरावर कमी दाबाचा पट्टा सक्रिय; राज्यभरात पुढील 2 दिवस पाऊस झोडपणार, या जिल्ह्यांना हवामान विभागाचे अलर्ट, कुठे काय?
बंगालच्या उपसागरावर कमी दाबाचा पट्टा सक्रिय; राज्यभरात पुढील 2 दिवस पाऊस झोडपणार, या जिल्ह्यांना हवामान विभागाचे अलर्ट, कुठे काय?
Akola Crime: अकोल्यात शिंदे गटाच्या नेत्याचा संशयास्पद मृत्यू, माजी जिल्हाप्रमुखानेच घातपात केल्याचा आरोप, पोलीस ठाण्याबाहेर आंदोलन
अकोल्यात शिंदे गटाच्या नेत्याचा संशयास्पद मृत्यू, माजी जिल्हाप्रमुखानेच घातपात केल्याचा आरोप, पोलीस ठाण्याबाहेर आंदोलन
Asaduddin Owaisi : मोदींना रात्रीच्या अंधारात व्हिडीओ करावा लागला... मी त्यांना सलाम करतो ज्यांनी...; असदुद्दीन ओवैसींचं मोठं वक्तव्य
मोदींना रात्रीच्या अंधारात व्हिडीओ करावा लागला... मी त्यांना सलाम करतो ज्यांनी...; असदुद्दीन ओवैसींचं मोठं वक्तव्य
Maharashtra Live blog updates: राज-उद्धव ठाकरेंचा मुंबईत तिरंगा मोर्चा, विद्यार्थी आंदोलनाच्या यशानंतर मोठ्या गर्दीची शक्यता
Maharashtra Live blog updates: राज-उद्धव ठाकरेंचा मुंबईत तिरंगा मोर्चा, विद्यार्थी आंदोलनाच्या यशानंतर मोठ्या गर्दीची शक्यता
CJP Future Plan : 'आता आम्ही संपूर्ण देशात...'; आंदोलन संपल्यानंतर काय करणार CJP? प्रवक्त्याने सांगितला पुढचा प्लॅन
'आता आम्ही संपूर्ण देशात...'; आंदोलन संपल्यानंतर काय करणार CJP? प्रवक्त्याने सांगितला पुढचा प्लॅन
Delhi Protest : अण्णा हजारेंनंतर आता अभिजीत दीपके; मराठी माणसाने दुसऱ्यांदा हादरवले 'दिल्लीचे तख्त' 
अण्णा हजारेंनंतर आता अभिजीत दीपके; मराठी माणसाने दुसऱ्यांदा हादरवले 'दिल्लीचे तख्त' 
धर्मेंद प्रधानांचा राजीनामा शिक्षणव्यवस्थेची पुनर्बांधणी करण्याच्या दिशेनं पडलेलं पहिलं पाऊल, देशाचे संविधान संपवणाऱ्या, संस्थांवर कब्जा करणाऱ्या राजवटीपासून सुटका मिळवूया; राहुल गांधींचा घणाघात
धर्मेंद प्रधानांचा राजीनामा शिक्षणव्यवस्थेची पुनर्बांधणी करण्याच्या दिशेनं पडलेलं पहिलं पाऊल, देशाचे संविधान संपवणाऱ्या, संस्थांवर कब्जा करणाऱ्या राजवटीपासून सुटका मिळवूया; राहुल गांधींचा घणाघात
Raj Thackeray : 'जेन झी'नी सरकारच्या झिंज्या उपटल्या; राज ठाकरेंची एका वाक्यात प्रतिक्रिया, हा राग आता प्रधानांवरून पंतप्रधानांवर गेल्याचा दावा
'जेन झी'नी सरकारच्या झिंज्या उपटल्या; राज ठाकरेंची एका वाक्यात प्रतिक्रिया, हा राग आता प्रधानांवरून पंतप्रधानांवर गेल्याचा दावा
Embed widget