एक्स्प्लोर

आकाशात क्षेपणास्त्रे अन् माझी मुलगी... कुटुंबासह दुबईत अडकला प्रसिद्ध अभिनेता, शेअर केला भयानक व्हिडीओ

Vishnu Manchu Dubai missile video full details: अमेरिका-इस्त्रायल आणि इराण संघर्षामुळे मध्यपूर्वेत तणाव वाढला आहे.

Vishnu Manchus Viral Video from dubai: पश्चिम आशियात सध्या तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.  शनिवारी (28 फेब्रुवारी) रोजी अमेरिका आणि इस्त्रायलने इराणची राजधानी तेहरानसह अनेक शहरांवर हल्ला केला.  या हल्ल्यानंतर इराणने मध्य पूर्वेतील प्रमुख अमेरिकन लष्करी तळांवर क्षेपणास्त्रे डागून प्रत्युत्तर दिले.  अमेरिका, इस्त्रायल आणि इराणमध्ये सुरु असलेल्या युद्धजन्य परिस्थितीमुळे संपूर्ण मध्य पूर्वेत भीतीचं आणि दहशतीचं वातावरण निर्माण झाले आहे. दुबईमधील काही ठिकाणी हल्ले होत आहेत. जिथे आकाशात क्षेपणास्त्र स्पष्टपणे दिसत आहेत. या हल्ल्याचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल होत आहे. प्रसिद्ध दक्षिण भारतीय अभिनेता आणि निर्माता विष्णू मांचू याने दुबईतील भयानक  दृष्याचा व्हिडिओ सोशल मीडियात शेअर केला आहे.  सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल होत आहे.

दुबईमधील परिस्थिती कशी? अभिनेत्यानं व्हिडिओतून माहिती दिली

अभिनेता विष्णू मांचू सध्या त्याच्या कुटुंबासह दुबईमध्ये आहे. त्यानं दुबईचा एक भयानक व्हिडिओ सोशल मीडियात शेअर केला आहे. व्हिडिओतून दुबईमधील भयानक स्थिती स्पष्टपणे दिसत आहे. क्षेपणास्त्र हल्ले आकाशात स्पष्टपणे दिसत आहे.  त्याने व्हिडिओतून स्पष्ट केलं की, '28 फेब्रुवारी रोजी रात्री आकाशात क्षेपणास्त्रे स्पष्ट दिसत होती.  स्फोटांचे आवाज घराला हादरवून टाकत होते.  स्फोटांच्या आवाजाने माझी धाकटी मुलगी घाबरत होती. मुलीला आणि कुटुंबाला अशा घाबरलेल्या स्थितीत पाहणं खूप कठीण होतं', असं अभिनेत्यानं व्हिडिओतून स्पष्ट केलं. 

अभिनेता विष्णू मांचू  याने त्याच्या एक्स हँडलवर या भयानक दृश्याचा व्हिडिओ सोशल मीडियात शेअर केला आहे. त्यानं व्हिडिओ शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिलं की, 'मी दुबईमध्ये माझ्या कुटुंबाला भेटायला आलो आहे.  मला आकाशात काही क्षेपणास्रे  दिसत आहेत. स्फोटांच्या मोठ्या आवाजाने आमचे घर हादरले. माझी लहान मुलगी आयरा प्रचंड घाबरली. शांतीसाठी  आम्ही प्रार्थना करत आहोत.   कोणत्या लहान मुलावर हे दिवस बघण्याची वेळ येऊ नये. नागरिकांची  सुरक्षा सुनिश्चित केल्याबद्दल यूएई दलांचे आभार.  असे क्षण आपल्याला कायम आठवण करुन देतात, की आपले जीवन किती लहान आहे.  शक्ति आणि शांतीसाठी आम्ही प्रार्थना करत आहोत, हर हर महादेव...', असं कॅप्शन देत त्यानं व्हिडिओ शेअर केला आहे.

अभिनेत्याचा हा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल होत आहे.  चाहत्यांनी हा व्हिडिओ पाहून सुरक्षिततेबाबत चिंता व्यक्त केली आहे. चाहते त्याला कमेंट सेक्शनमधून सुरक्षित राहण्याचा आणि स्वत:ची काळजी घेण्याचा सल्ला देत आहेत. दरम्यान, अभिनेत्री सोनल चौहान देखील  दुबईमध्ये अडकली  आहे.  तिनं एक्सवर पोस्ट करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे मदत मागितली आहे.

ABP माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. पत्रकारितेत 2021 पासून कार्यरत. डिजिटल माध्यमांत जवळपास 3 वर्षे काम करण्याचा अनुभव. साम, सकाळ, दूरदर्शन, लोकमत आणि साम (डिजिटल) याठिकाणी काम करण्याचा अनुभव. मुंबई विद्यापिठातून पत्रकारितेत पदव्युत्तर पदवीचं शिक्षण पूर्ण.

Read More

महत्त्वाच्या बातम्या

पॉपकॉर्न विकून कमावले 2000 कोटी रुपये, चित्रपट हिट असो वा नसो, PVR आयनॉक्सची मात्र जोरदार कमाई
पॉपकॉर्न विकून कमावले 2000 कोटी रुपये, चित्रपट हिट असो वा नसो, PVR आयनॉक्सची मात्र जोरदार कमाई
Marathi Suspense Thriller: 1 तास 46 मिनिटांचा हा मराठी सस्पेन्स थ्रिलर पाहिलात?; सत्ता, सूड अन् विश्वासघाताचा थरार, Imdbवरही दमदार रेटींग
1 तास 46 मिनिटांचा हा मराठी सस्पेन्स थ्रिलर पाहिलात?; सत्ता, सूड अन् विश्वासघाताचा थरार, Imdbवरही दमदार रेटींग
Isha Koppikar On PM Modi: 'मी अंधभक्तच आहे, करा अनफॉलो..' पंतप्रधान मोंदींना शिवीगाळ करणाऱ्यांवर अभिनेत्री संतापली; म्हणाली ..
'मी अंधभक्तच आहे, करा अनफॉलो..' पंतप्रधान मोंदींना शिवीगाळ करणाऱ्यांवर अभिनेत्री संतापली; म्हणाली ..
Viraj Japtap on Maharashtrachi HasyaJatra: महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम अभिनेत्याला सचिन गोस्वामींकडून ओरडा, जुना किस्सा; म्हणाले, 'बॅग घेऊन घरी जायचं, परत यायचं नाही'
महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम अभिनेत्याला सचिन गोस्वामींकडून ओरडा, जुना किस्सा; म्हणाले, 'बॅग घेऊन घरी जायचं, परत यायचं नाही'

व्हिडीओ

Manoj Jarange Mumbai Protest : मनोज जरांगेंची पुन्हा मुंबईकडे कूच? भगवं वादळ मुंबईत घडकणार?
Rahul Gandhi Amit Shah Special Report : संसदेच्या अधिवेशनात विद्यार्थ्यांच्या मुद्यावरुन घमासान
Manoj Jarange Patil Defender Car : 2 कोटींची आलिशान डिफेंडर गाडी कोणाची? मनोज जरांगे काय म्हणाले...
Manoj Jarange Patil Sangli : मराठा आमदार-खासदारांचे फोन; गुपचूप पाठिंबा असल्याचा जरांगेंचा दावा
Manoj Jarange On Maratha Protest: मराठा समाजाचा पुन्हा एकदा मुंबईकडे कूच करण्याचा विचार; मनोज जरांगे काय काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Live blog updates: मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला दांडी मारणाऱ्या भाजप नगरसेवकांना नोटीस
Maharashtra Live blog updates: मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला दांडी मारणाऱ्या भाजप नगरसेवकांना नोटीस
Dombivli Shastrinagar Hospital : पालकांची परवानगी न घेता 17 वर्षीय मुलीच्या गर्भधारणा तपासणीवरून गोंधळ; पालिका रुग्णालयात तीन वेळा रिपोर्ट पॉझिटिव्ह तर खासगीत निगेटिव्ह!
पालकांची परवानगी न घेता 17 वर्षीय मुलीच्या गर्भधारणा तपासणीवरून गोंधळ; पालिका रुग्णालयात तीन वेळा रिपोर्ट पॉझिटिव्ह तर खासगीत निगेटिव्ह!
शासकीय वाहनांसाठी VIP नंबर घेण्यावर अखेर बंदी; अर्थ खात्याचा आदेश जारी, मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांचे कान टोचले
शासकीय वाहनांसाठी VIP नंबर घेण्यावर अखेर बंदी; अर्थ खात्याचा आदेश जारी, मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांचे कान टोचले
Navi Mumbbai : 15 लाखांची लाच मागितली, आठ लाख स्वीकारले; GST उपायुक्तावर गुन्हा दाखल
15 लाखांची लाच मागितली, आठ लाख स्वीकारले; GST उपायुक्तावर गुन्हा दाखल
Gatari Amavasya News : 'जास्त गटार-बिटारात लोळू नका'; गटारीच्या शुभेच्छा देत शिंदेंच्या मंत्र्यांचा कार्यकर्त्यांना अजब सल्ला
'जास्त गटार-बिटारात लोळू नका'; गटारीच्या शुभेच्छा देत शिंदेंच्या मंत्र्यांचा कार्यकर्त्यांना अजब सल्ला
तब्बल 98 लाख रुपयांच्या बनावट नोटांचा साठा जप्त; एकाला अटक, 30 लाखांच्या बदल्यात 1 कोटींचा भाव
तब्बल 98 लाख रुपयांच्या बनावट नोटांचा साठा जप्त; एकाला अटक, 30 लाखांच्या बदल्यात 1 कोटींचा भाव
Bharat Gogawale : रायगडच्या पालकमंत्रिपदी भरत गोगावलेंची बाजी? आजच नाव जाहीर होणार, गोगावलेंचा मोठा दावा
रायगडच्या पालकमंत्रिपदी भरत गोगावलेंची बाजी? आजच नाव जाहीर होणार, गोगावलेंचा मोठा दावा
तुकाराम मुंढेंचा मोर्चा बस स्थानकांकडे; संभाजीनगर जिल्ह्यात FDA ची कारवाई, सिल्लोडमधील कँटीन सील
तुकाराम मुंढेंचा मोर्चा बस स्थानकांकडे; संभाजीनगर जिल्ह्यात FDA ची कारवाई, सिल्लोडमधील कँटीन सील
Embed widget