एक्स्प्लोर

TOP 10 Entertainment News : दिवसभरातील दहा महत्त्वाच्या मनोरंजनविषयक बातम्या

Entertainment News : दिवसभरातील दहा महत्त्वाच्या मनोरंजनविषयक बातम्यांचा घेतलेला आढावा.

TOP 10 Entertainment News : दिवसभरातील दहा महत्त्वाच्या मनोरंजनविषयक बातम्या -

अखेर हृताचंही मन उडू उडू झालं... प्रतीक शाहसोबत अडकली लग्नबंधनात

फुलपाखरू फेम हृता दुर्गुळे नुकतीच लग्नाच्या बेडीत अडकली आहे. सध्या हृता 'मन उडू उडू झालं' या मालिकेच्या माध्यमातून घराघरांत पोहचत आहे. हृताला फुलपाखरू मालिकेमुळे प्रचंड लोकप्रियता मिळाली आहे. हृता 18 मे 2022 रोजी प्रतीक शाहसोबत 
लग्नबंधनात अडकली आहे. 

‘रानबाजार’चा ट्रेलर प्रदर्शित

बिग बजेट ‘रानबाजार’ या वेब सीरिजचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. अभिजित पानसे लिखीत, दिग्दर्शित ‘रानबाजार’ या वेब सीरिजच्या टीझरने सोशल मीडियावर चांगलाच धुमाकूळ घातला होता. या बोल्ड टिझरची सर्वत्र चर्चा रंगल्यानंतर आता ‘रानबाजार’चा जबरदस्त ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.

'धर्मवीर' सिनेमात प्रसाद ओक नव्हे 'हा' अभिनेता साकारणार होता आनंद दिघेंची भूमिका

धर्मवीर आनंद दिघे यांच्या आयुष्यावर आधारित ‘धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे’ हा सिनेमा सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालतो आहे. या सिनेमात अभिनेता प्रसाद ओकने आनंद दिघे यांची भूमिका साकारली आहे. या सिनेमाचे दिग्दर्शन प्रविण तरडेंनी केले आहे. परंतु 'धर्मवीर' सिनेमासाठी प्रविण तरडेंची पहिली पसंती प्रसाद ओक नव्हती. तर विजू माने यांना या भूमिकेसाठी विचारणा झाली होती. 

बालगंधर्व पाडण्यापेक्षा कलाकारांना उत्तम सुविधा दिल्या तर बरं होईल; गायक मंगेश बोरगावकर भडकला

पुण्याचं वैभव अशी ओळख असलेलं आणि अनेक कालाकाराचं हक्काचं दुसरं घर असलेलं बालगंधर्व रंगमंदिराच्या पुनर्विकासाच्या निर्णयावर शिक्कामोर्तब झाला. त्यानंतर अनेक कलाकारांनी नाराजी व्यक्त केली. गायक मंगेश बोरगावरनेसुद्धा यासंदर्भात फेसबुक पोस्ट करत नाराजी दर्शवली. बालगंधर्व पाडण्याची खरंच गरज आहे का? त्यापेक्षा कलाकारांना नाट्यगृहात वेगगेगळ्या सुविधा कशा पुरवता येईल?, याकडे लक्ष द्या, असा प्रश्नही त्याने उपस्थित केला आहे. 

'रानबाजार' वेब सीरिजमध्ये प्राजक्ता माळीचा बोल्ड अंदाज, नेटकऱ्यांनी केले ट्रोल

'रानबाजार' ही वेब सीरिज लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकताच या वेब सीरिजचा टीझर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. पॉलिटिकल क्राईम थ्रिलर असलेल्या या वेब सिरीजमध्ये अभिनेत्री तेजस्विनी पंडित आणि प्राजक्ता माळी यांच्या प्रमुख भूमिका आहेत. या बोल्ड वेब सीरिजमध्ये प्राजक्ताने काम केल्याने तिला प्रचंड ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे. 

अभिनेत्री केतकी चितळेला न्यायालयीन कोठडी

राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्या प्रकरणी अभिनेत्री केतकी चितळेला  Chitale) न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. मागील सुनावणीवेळी केतकीनं स्वतः कोर्टात युक्तिवाद केला होता. केतकीला सुट्टीच्या न्यायालयात हजर केल्यानंतर तिनं केलेल्या आक्षेपार्ह्य पोस्टबाबत अधिक तपास करण्यासाठी कोठडीची आवश्यकता असल्याची माहिती पोलिसांनी न्यायालयात दिली होती. ठाणे गुन्हे शाखेने 5 दिवसांची पोलीस कोठडी न्यायालयाकडे मागितली होती. न्यायालयानं केतकीला 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती. 

व्लादिमीर झेलेन्स्कींची चित्रपटसृष्टीला साद, म्हणाले, 'नव्या चॅप्लिन गरज '

चित्रपट विश्वातील सर्वात महत्त्वाच्या महोत्सवांपैकी एक असलेल्या कान्स फिल्म फेस्टिव्हलच्या 75व्या पर्वाला मंगळवारी (17 मे) सुरुवात झाली. हा सोहळा 28 मे पर्यंत चालणार आहे.  कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये युक्रेनचे राष्ट्रपती व्लादिमीर झेलेन्स्की यांनी  व्हिडीओ कॉलद्वारे एक खास मेसेज दिला.  

जंगलात पेटला वणवा, पण आग विझवायची सोडून बयानं टिक-टॉक व्हिडीओ केला, नेटकऱ्यांचा संताप

सध्या पाकिस्तान हा देश हिटवेवचा सामना करत आहे. यावर्षी पाकिस्ताननं उष्णतेचा 61 वर्षाचा रेकॉर्ड तोडला आहे. पाकिस्तानमध्ये अनेक ठिकाणी 48 डिग्री तापमान झाले आहे.  त्यामुळे पाकिस्तानमधील एबटाबाद जंगलामध्ये भीषण आग लागली होती. आता हुमैरा असगर या पाकिस्तानी  टिक-टॉक स्टारचा जंगलामधील एक व्हिडीओ व्हायरल झाला. हा व्हिडीओ पाहून अनेक नेटकरी हुमैरावर भडकले आहेत. अनेक लोक तिला या व्हिडीओमुळे ट्रोल करत आहेत. 

 48 व्या वर्षी मलायका चढणार बोहल्यावर; अर्जुन मलायकाच्या विवाह सोहळ्याचा मुहूर्त ठरला?

सध्या बॉलिवूडमधील सेलिब्रिटी हे लग्न बंधनात अडकत आहेत. काही दिवसांपूर्वी अभिनेता रणबीर कपूर आणि अभिनेत्री आलिया भट यांचा विवाह सोहळा पार पडला. तसेच विकी कौशल  आणि कतरिना कैफ यांनी देखील लग्नगाठ बांधली. आता मलायाका आरोरा आणि अभिनेता अर्जुन कपूर  हे कधी लग्न करणार आहेत? असा प्रश्न त्यांच्या चाहत्यांना पडला होता. लवकरच हे दोघे लग्न बंधनात अडकणार आहेत. 

शिवांगी जोशीनं नाकारल्या अनेक रिअॅलिटी शोच्या ऑफर्स; पण खतरों के खिलाडी 12 मध्ये सामील होण्याचं कारण काय?

छोट्या पडद्यावरील ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ या मालिकेमुळे विशेष लोकप्रियता मिळवणारी अभिनेत्री शिवांगी जोशीचा आज  27 वा वाढदिवस आहे. शिवांगीचे चाहते तिच्या वाढदिवसानिमित्त सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन तिला शुभेच्छा देत आहेत. लवकरच आता शिवांगी ही  ‘खतरों के खिलाडी 12’ या शोमधून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या आधी शिवांगीला अनेक रिअॅलिटी शोच्या ऑफर्स आल्या पण त्या तिनं नाकारल्या होत्या . आता ‘खतरों के खिलाडी 12’ मध्ये सहभागी होण्यासाठी शिवांगी का तयार झाली? असा प्रश्न तिला एका मुलाखतीमध्ये विचारण्यात आला. आता या प्रश्नाचं उत्तर शिवांगीनं उत्तर दिलं आहे. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Raj Thackeray : राज ठाकरेंनी नाशकात पाय ठेवताच भाजपच्या महिला आमदार भेटीसाठी दाखल; नेमकं कारण काय?
राज ठाकरेंनी नाशकात पाय ठेवताच भाजपच्या महिला आमदार भेटीसाठी दाखल; नेमकं कारण काय?
शिवसेनेचं ऑपरेशन शिवधनुष्य अन् टायगर; ठाकरेंना दे धक्का, मंत्री उदय सामंतांचा गौप्यस्फोट
शिवसेनेचं ऑपरेशन शिवधनुष्य अन् टायगर; ठाकरेंना दे धक्का, मंत्री उदय सामंतांचा गौप्यस्फोट
IPhone अन् अँड्रॉईड युजर्संसाठी वेगवेगळं भाडं; ओला, उबर कंपनीला केंद्राची नोटीस, हे काय लावलंय?
IPhone अन् अँड्रॉईड युजर्संसाठी वेगवेगळं भाडं; ओला, उबर कंपनीला केंद्राची नोटीस, हे काय लावलंय?
Parli : आर्थिक घोटाळ्याचे परळी कनेक्शन; पंढरपुरातील 30 ठेवीदारांना एक कोटीचा गंडा 
आर्थिक घोटाळ्याचे परळी कनेक्शन; पंढरपुरातील 30 ठेवीदारांना एक कोटीचा गंडा 
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Nanded  : नांदेडच्या परांडात अंधश्रद्धेच्या कारणावरून 7 वर्षीय चिमुरडीचं अपहरणShivsena Melava : दोन्ही शिवसेनेच्या मेळाव्याची तयारी, बाळासाहेब ठाकरेंच्या जयंतीनिमित्त आयोजनWalmik karad Audio Clip : कराडसंबंधीत सनी आठवले नावाच्या तरुणानं प्रसिद्ध केली धक्कादायक ऑडिओ क्लिपEknath Shinde Shivsena : शिंदेंच्या शिवसेनेत नव नियुक्तीसाठी मुलाखती होणार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Raj Thackeray : राज ठाकरेंनी नाशकात पाय ठेवताच भाजपच्या महिला आमदार भेटीसाठी दाखल; नेमकं कारण काय?
राज ठाकरेंनी नाशकात पाय ठेवताच भाजपच्या महिला आमदार भेटीसाठी दाखल; नेमकं कारण काय?
शिवसेनेचं ऑपरेशन शिवधनुष्य अन् टायगर; ठाकरेंना दे धक्का, मंत्री उदय सामंतांचा गौप्यस्फोट
शिवसेनेचं ऑपरेशन शिवधनुष्य अन् टायगर; ठाकरेंना दे धक्का, मंत्री उदय सामंतांचा गौप्यस्फोट
IPhone अन् अँड्रॉईड युजर्संसाठी वेगवेगळं भाडं; ओला, उबर कंपनीला केंद्राची नोटीस, हे काय लावलंय?
IPhone अन् अँड्रॉईड युजर्संसाठी वेगवेगळं भाडं; ओला, उबर कंपनीला केंद्राची नोटीस, हे काय लावलंय?
Parli : आर्थिक घोटाळ्याचे परळी कनेक्शन; पंढरपुरातील 30 ठेवीदारांना एक कोटीचा गंडा 
आर्थिक घोटाळ्याचे परळी कनेक्शन; पंढरपुरातील 30 ठेवीदारांना एक कोटीचा गंडा 
Video: व्हॉलीबॉल टोलवताना क्रीडामंत्री भरणेमामा कोसळले, थोडक्यात बचावले; व्हिडिओ व्हायरल
Video: व्हॉलीबॉल टोलवताना क्रीडामंत्री भरणेमामा कोसळले, थोडक्यात बचावले; व्हिडिओ व्हायरल
Rohit Pawar : पोटदुखी सांगून सहानुभूती...; रोहित पवारांचा वाल्मिक कराडबाबत खळबळजनक दावा; नेमकं काय म्हणाले?
पोटदुखी सांगून सहानुभूती...; रोहित पवारांचा वाल्मिक कराडबाबत खळबळजनक दावा; नेमकं काय म्हणाले?
मोठी बातमी! रामगोपाल वर्माला अटक करा, 3 महिन्यांचा तुरुंगवास; 7 वर्षांपूर्वीच्या खटल्यात न्यायालयाचा निकाल
मोठी बातमी! रामगोपाल वर्माला अटक करा, 3 महिन्यांचा तुरुंगवास; 7 वर्षांपूर्वीच्या खटल्यात न्यायालयाचा निकाल
वाल्मिक कराड रात्री रुग्णालयात दाखल; आज अचानक जामीन अर्ज मागे घेतला, एका दिवसांत नेमकं काय घडलं?
वाल्मिक कराड रात्री रुग्णालयात दाखल; आज अचानक जामीन अर्ज मागे घेतला, एका दिवसांत नेमकं काय घडलं?
Embed widget