Oscars 2022 Live : ऑस्कर गोज टू... ऑस्कर पुरस्कार सोहळ्याला सुरूवात; पाहा विजेत्यांची संपूर्ण यादी
Oscars 2022 : कॅलिफोर्नियामधील लॉस एंजेलिस येथील डॉल्बी थिएटरमध्ये 94 वा अकादमी पुरस्कार म्हणजेच ऑस्कर अवॉर्ड्सचा सोहळा पार पडत आहे. जाणून घेऊयात ऑस्कर विजेत्यांची संपूर्ण यादी
LIVE
Background
Oscars Awards 2022 : चित्रपटसृष्टीतील सर्वोच्च पुरस्कार म्हणून गौरवला जाणारा 'ऑस्कर पुरस्कार' (Oscars Awards) सोहळ्याकडे मनोरंजनसृष्टीसह सिनेप्रेक्षकांचे लक्ष लागले आहे. 94 व्या अॅकॅडमी अवॉर्डची सुरूवात रविवारी (27 मार्च) झाली आहे. डॉल्बी थिएटरमध्ये हा सोहळा पार पडला आहे. भारतामध्ये या सोहळ्याच्या ब्रॉडकास्टिंगला सुरूवात झाली आहे. ऑस्कर पुरस्कार सोहळ्याचे यंदा तीन सेलिब्रिटी होस्ट असणार आहेत. लेखिका आणि कॉमेडियन वांडा सायक्स, स्टँड-अप कॉमेडियन एमी शूमर आणि अभिनेत्री रेजिना हॉल यंदाचा पुरस्कार सोहळा होस्ट करणार आहेत.
पहिला पुरस्कार हा बेस्ट साऊंड या कॅटेगिरीमध्ये देण्यात आली आहे. डेनिस विलेन्यूव्ह यांच्या सायन्स फिक्शन चित्रपटाला हा पुरस्कार मिळाला. या चित्रपटाला सिनेमॅटोगद्राफी आणि व्हिजुअल इफेक्ट्स कॅटेगिरीमधील पुरस्कार देऊ गौरवण्यात आले.
भारतीय प्रेक्षकांना सोमवारी (28 मार्च) पहाटे साडे पाच वाजल्यापासून हा पुरस्कार सोहळा पाहता येणार आहे. हा सोहळा प्रेक्षक डिस्ने प्लस हॉटस्टार Disney + Hotstar वर लाइव्ह पाहू शकतात. तसेच स्टार वर्ल्ड आणि स्टार मुव्हीजवरदेखील या सोहळ्याचे प्रसारण होणार आहे. ऑस्करच्या अधिकृत अकाऊंटवरून देखील हा सोहळा तुम्ही लाइव्ह पाहू शकता. विजेता आणि नॉमिनेटेड चित्रपटांची यादीची लाइव्ह अपडेट्स या ब्लॉगच्या माध्यमामधून घेऊयात....
... आणि विल स्मिथच्या डोळ्यांत अश्रू आले!
... आणि विल स्मिथच्या डोळ्यांत अश्रू आले!
Best Actor in a Leading Role goes to Will Smith for his incredible performance in 'King Richard' Congratulations! #Oscars pic.twitter.com/y0UTX48214
— The Academy (@TheAcademy) March 28, 2022
Oscars 2022 : 'सर्वोत्कृष्ट सिनेमॅटोग्राफी' ऑस्कर विजेता ठरला 'ड्युन'
94 व्या अकादमी पुरस्कारांमध्ये ‘बेस्ट सिनेमॅटोग्राफी’साठी देखील फिल्म ‘ड्युन’ला पुरस्कार देण्यात आला आहे. हा चित्रपट एक विज्ञान कथा आणि थ्रील ड्रामा चित्रपट होता, ज्यामध्ये परस्पर संघर्षाची कथा दाखवली गेली होती.
At 5:37 PT, the Oscar for this year’s Best Cinematography went to Greig Fraser Dune. #Oscars#Perpetual Oscar moments sponsored by @Rolex. Rolex and cinema - more than just a vision: https://t.co/S21rw4cNQA pic.twitter.com/01WRfUFkli
— The Academy (@TheAcademy) March 28, 2022
Oscars 2022 : सर्वोत्कृष्ट मेकअप आणि हेअरस्टाइलसाठी ऑस्कर पुरस्कार
लिंडा डोड्स, स्टेफनी इंग्राम आणि जस्टिन रॅलेने 'द आयज ऑफ टॅमी फे'साठी सर्वोत्कृष्ट मेकअप आणि हेअरस्टाइल ऑस्कर पटकावला आहे.
Linda Dowds, Stephanie Ingram, and Justin
— The Academy (@TheAcademy) March 28, 2022
Raleigh win the Best Makeup and Hairstyling Oscar for their outstanding work on 'The Eyes of Tammy Faye.' Congratulations #Oscars pic.twitter.com/21ntke6QNV
बिली आयलिशच्या 'नो टाईम टू डाय' गाण्याला सर्वोत्कृष्ट गाण्याचा पुरस्कार
Oscars 2022 : गायिका बिली आयलिशच्या 'नो टाईम टू डाय' गाण्याला सर्वोत्कृष्ट गाण्याचा पुरस्कार मिळाला आहे.
The Oscar for Best Original Song goes to... #Oscars pic.twitter.com/GviJzb3XZo
— The Academy (@TheAcademy) March 28, 2022
Oscars 2022 : Jane Champion सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक; 'द पॉवर ऑफ द डॉग' चित्रपटासाठी मिळाला ऑस्कर
Jane Champion सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक; 'द पॉवर ऑफ द डॉग' चित्रपटासाठी मिळाला ऑस्कर
The Oscar for Best Directing goes to... #Oscars pic.twitter.com/sDJjv6DYOf
— The Academy (@TheAcademy) March 28, 2022