(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Oppenheimer On OTT : ओटीटीवर रिलीज होणार 'ओपनहायमर'; कुठं मोफत पाहता येणार नोलनचा ब्लॉकबस्टर चित्रपट
Oppenheimer On OTT : हॉलिवूड दिग्दर्शक ख्रिस्तोफर नोलनच्या 'ओपेनहायमर' या चित्रपटाची जोरदार चर्चा झाली होती. भारतातही या चित्रपटाची प्रेक्षकांमध्ये कमालीची क्रेझ पाहायला मिळाली. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर प्रचंड कमाई करून अनेक विक्रम मोडले.
Oppenheimer On OTT : जगभरात प्रेक्षक, समीक्षकांनी कौतुक केलेला 'ओपनहायमर' (Oppenheimer) आता ओटीटीवर रिलीज (OTT Release) होण्यास सज्ज झाला आहे. 2023 साली रिलीज झालेल्या हॉलिवूड दिग्दर्शक ख्रिस्तोफर नोलनच्या (Christopher Nolan) 'ओपेनहायमर' या चित्रपटाची जोरदार चर्चा झाली होती. भारतातही या चित्रपटाची प्रेक्षकांमध्ये कमालीची क्रेझ पाहायला मिळाली. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर प्रचंड कमाई करून अनेक विक्रम मोडले. नोलनच्या या ब्लॉकबस्टरला चाहत्यांनी भरभरून प्रेम दिले.
कुठं पाहता येणार मोफत ओपनहायमर ?
थिएटरमध्ये रिलीज झाल्यानंतर काही महिन्यांनंतर, हा चित्रपट OTT प्लॅटफॉर्म प्राइम व्हिडिओ रेंटच्या स्वरूपात प्रदर्शित झाला होता. आता चाहत्यांसाठी एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. आता तुम्ही या ब्लॉकबस्टर चित्रपटाचा मोफत आनंद घेऊ शकता.
View this post on Instagram
ओपनहायमर हा चित्रपट 21 मार्च रोजी OTT प्लॅटफॉर्म जिओ सिनेमावर (Jio Cinema) मोफत स्ट्रीम होणार आहे. आता तुम्ही घरी आरामात बसून या चित्रपटाचा आनंद घेऊ शकता. या आधी प्राइम व्हिडिओवर हा चित्रपट पाहण्यासाठी यूजर्सला 149 रुपये खर्च करावे लागत होते. आता मात्र जिओ सिनेमावर मोफत पाहता येणार आहे.
View this post on Instagram
चित्रपटाची कथा काय?
'ओपनहायमर' या चित्रपटाला जगभरातून चांगला प्रतिसाद मिळाला. हा चित्रपट अमेरिकन अणूशास्त्रज्ञ वैज्ञानिक रॉबर्ट ओपनहायमर यांच्या जीवनप्रवासावर बेतला आहे. सिलियन मर्फी यांनी रॉबर्ट यांची व्यक्तिरेखा साकारली होती.
चित्रपटाने रचला इतिहास...
ओपनहायमरने बॉक्स ऑफिसवर जोरदार कमाई केली होती. हा चित्रपट 2023 साली सर्वाधिक कमाई करणारा हॉलिवूड चित्रपट ठरला. या हॉलिवूड ब्लॉकबस्टर चित्रपटाने भारतात 128.46 कोटींची कमाई केली होती. त्याचवेळी 96 व्या ऑस्कर पुरस्कारांमध्ये 'ओपेनहायमर'चा दबदबा राहिला. या चित्रपटाला 13 वेगवेगळ्या श्रेणींमध्ये नामांकन मिळाले होते.