Squid Game Record : Netflix च्या Squid Game नं मोडले सारे रेकॉर्ड; एका महिन्यात 900 मिलियन डॉलर्सची कमाई
या वेब सीरिजने आत्तापर्यंतचे सर्व रेकोर्ड्स तोडले असून 900 मिलियन डॉलरची कमाई केली आहे.
![Squid Game Record : Netflix च्या Squid Game नं मोडले सारे रेकॉर्ड; एका महिन्यात 900 मिलियन डॉलर्सची कमाई netflix web series squid game breaks all the record Squid Game Record : Netflix च्या Squid Game नं मोडले सारे रेकॉर्ड; एका महिन्यात 900 मिलियन डॉलर्सची कमाई](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/10/18/159d9c1d2217b3750f6321892fd3e8f4_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Squid Game: सध्या नेटफ्लिक्सवरच्या विविध वेब सीरिजला लोकांची पसंती मिळते. वेगवेगळ्या विषयांवरील वेब सीरिज लोक आवर्जून पाहतात. काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झालेल्या 'स्क्विड गेम' या वेब सीरिजला प्रेक्षकांची पसंती मिळाली आहे. ब्लूमबर्गमधील इंटरनल रिपोर्ट्सनुसार, या वेब सीरिजने आत्ता पर्यंतचे सर्व रेकोर्ड्स तोडले असून 900 मिलियन डॉलरची कमाई केली आहे. ही वेब सीरिज तयार करण्यासाठी फक्त 21.4 मिलियन डॉलर एवढा खर्च झाला होता.
'स्क्विड गेम' वेब सीरिजने तोडले रेकोर्ड
'स्क्विड गेम' या साउथ कोरियन वेब सीरिजला अनेकांनी पसंती दिली आहे. या सीरिजला ह्वांग डोंग-ह्युक (Hwang Dong-hyuk) यांनी दिग्दर्शित केला आहे. एका महिन्यामध्ये 'स्क्विड गेम' या वेब सीरिजला 132 मिलियन लोकांनी 2 मिनीटांपर्यंत पाहिले. ही वेब सीरिज 17 सप्टेंबर 2021 रोजी प्रदर्शित झाली होती. लोकांची पसंती मिळवणाऱ्या ब्रिजर्टन या वेब सीरिजने आधी हा रेकोर्ड तयार केला होता. या सीरिजला 28 दिवसांमध्ये 82 मिलियन लोकांनी पाहिले होते. ब्लूमबर्गनुसार, 'स्क्विड गेम' पाहण्यास सुरू करणाऱ्या 89% लोकांनी या वेब सीरिजला कमीत कमी 75 मिनटांपर्यंत पाहिले. त्यापैकी 66% प्रेक्षकांनी 23 दिवसांमध्ये सीरिज पाहून संपवली.
साउथ कोरियन सिनेमाची क्रेझ वाढली
सध्या अनेक लोक साउथ कोरियन चित्रपट आवडीने बघत आहेत. या चित्रपटांमधील कथेला आणि कलाकरांच्या अभिनयाला प्रेक्षकांची पसंती मिळत आहे.
Netflix वरील सीरिज Squid Game ने तोडले सगळे रेकॉर्ड, 'या' कारणांमुळे झाली सर्वाधिक लोकप्रिय वेबसीरिज
पहा काय आहे 'स्क्विड गेम'
'स्क्विड गेम' ही 9 एपिसोडची वेब सीरिज आहे. ही गोष्ट अशा लोकांच्या आयुष्यावर अधारित आहे जे कर्जामध्ये अडकले आहेत. या बेव सीरिजमध्ये 456 लोग असे लोक दाखवण्यात आले आहेत, जे कर्जाच्या जाळ्यात अडकले आहेत. या लोकांना पैशाचे आमिश दाखवत खेळात सहभागी करुन घेतले जाते. त्यानंतर त्या सर्व लोकांना मारण्यात येते. हा खेळ जिंकलेल्या व्यक्तीला 38.7 मिलिअन डॉलर मिळतात.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)