Netflix कडून युजर्सना मनोरंजनाची मेजवानी; 5 आणि 6 डिसेंबरला विनामुल्य पाहण्यासाठी करा 'हे' काम
नेटफ्लिक्सने युजर्ससाठी खास फेस्टिवलचं आयोजन केलं आहे. येत्या 5 आणि 6 डिसेंबर रोजी नेटफ्लिक्स सर्वांना विनामूल्य पाहता येणार आहे.

मुंबई : ओटीटी प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सने या आठवड्यात 5 आणि 6 डिसेंबर रोजी एका फेस्टिवलचं आयोजन केलं आहे. या दोन्ही दिवशी कोणतीही व्यक्ती नेटफ्लिक्सवर काहीही फ्री पाहू शकते. या दोन्ही दिवशी नेटफ्लिक्स वापरण्यासाठी कोणत्याही व्यक्तीला कोणतंही शुल्क आकारण्यात येणार नाही. म्हणजेच, तुम्ही कोणत्याही सब्स्क्रिप्शनशिवाय नेटफ्लिक्सवर वेब सीरिज, चित्रपट किंवा डॉक्युमेंट्री फ्री पाहू शकता.
नेटफ्लिक्सच्या या फेस्टिवलचा लाभ तुम्ही पाच डिसेंबरच्या दिवशी रात्रीपासून घेऊ शकता. त्यासोबत सहा डिसेंबर रोजी रात्री 12 वाजेपर्यंत हे फेस्टिवल सुरु राहणार आहे. नेटफ्लिक्स इंडियाचे उपाध्यक्षा मोनिका शेरगिल यांनी एका ब्लॉग पोस्टमध्ये सांगितलं की, "पाच डिसेंबर रोजी रात्री 12 वाजल्यापासून ते सहा डिसेंबर रोजी रात्री 12 वाजेपर्यंत नेटफ्लिक्स निशुल्क वापरता येणार आहे. भारतातील कोणतीही व्यक्ती सर्व ब्लॉकबस्टर चित्रपट, सर्वात मोठ्या वेब सीरीज, अवॉर्ड विनिंग डॉक्युमेंट्री आणि दोन दिवसांसाठी एटरटेन्मेट रियालिटी शो पाहू शकतात."
नेटफ्लिक्स पाहण्यासाठी करा हे काम
ज्या व्यक्तींकडे नेटफ्लिक्सचं सब्स्क्रिप्शन नाही त्यांनाही चिंता करण्याची गरज नाही. कारण नेटफ्लिक्सच्या या फेस्टिवलमध्ये कोणतीही व्यक्ती दोन दिवसांसाठी कोणतंही शुल्क न आकारता मोफत नेटफ्लिक्स पाहू शकणार आहे. ज्यांच्याकडे सब्स्क्रिप्शन नाही, त्यांनी आपलं नाव, ईमेल किंवा फोन नंबरच्या मदतीने साइनअप करावं. त्याचसोबत आपला पासवर्ड क्रिएट करा. त्यानंतर साइनअप करा. साइनअप झाल्यानंतर यूजर अगदी मोफत नेटफ्लिक्स वापरू शकणार आहेत.
सब्स्क्रिप्शन जिथून बंद झालं, तिथून स्ट्रिमिंग सुरु
याव्यतिरिक्त जर तुमच्या ईमेल आयडी किंवा नंबरवर आधीपासून नेटफ्लिक्स किंवा मेंबरशिप असेल, तर तुम्हाला स्ट्रीम तेव्हापासूनच मिळेल जेव्हापासून तुम्ही तुमचं सब्स्क्रिप्शन बंद केलं होतं. दरम्यान, नेटफ्लिक्सच्या या फेस्टिवलचं उद्देश नवे ग्राहक जोडण्याचं आहे. दरम्यान, भारतात अॅमेझॉन व्हिडीओ, डिझनी हॉटस्टार आणि जी5 यांसारख्या ओटीटी प्लॅटफॉर्म्ससोबत नेटफ्लिक्सची स्पर्धा सुरु आहे.
महत्त्वाच्या बातम्या :
भारतात आता नेटफ्लिक्सवर चित्रपट, मालिका विनामूल्य पाहू शकता!
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
