Neha Kakkar Arrested? : नेहा कक्करला मोठ्या घोटाळा प्रकरणात अटक? पोलिसांसोबत ढसाढसा रडत जातानाचा फोटो व्हायरल
Neha Kakkar Arrested In Emarlado Scam: घोटाळा प्रकरणात नेहा कक्करला अटक झाल्याचं सांगितलं जात आहे. तसेच, पोलिसांसोबत ढसाढसा रडत जातानाचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
Neha Kakkar Arrested In Emarlado Scam: प्रसिद्ध गायिका नेहा कक्कर (Neha Kakkar) सध्या एका घोटाळ्यामुळे (Emarlado Scam) चर्चेत आहे. सोशल मीडियावर नेहा कक्करचे असे काही फोटो व्हायरल झाले की, त्यानंतर तिला एका घोटाळ्यात अटक करण्यात आल्याच्या चर्चांनी जोर धरला. तिच्या अटकेचे काही फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. एका घोटाळ्याप्रकरणी नेहा कक्करला अटक करण्यात आली असल्याचं सांगितलं जात आहे. नेहाचे व्हायरल होणारे फोटो पाहून आता नेहाचं करिअर संपलं, तिनं असं करायला नको होतं, यांसारख्या कमेंट नेटकऱ्यांकडून केल्या जात आहेत.
सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या फोटोंसोबत एका लिंकही व्हायरल होत आहे. ज्यामध्ये नेहाच्या नावानं 'एमराल्डो'चा प्रचार करणारी खोटी मुलाखत दाखवण्यात आली आहे. या व्हायरल होणाऱ्या फोटोंमध्ये नेहा ढसाढसा रडताना दिसत आहे. त्यासोबतच एक पोलीस निरीक्षक तिला अटक करुन ओढत नेत असल्याचं पाहायला मिळत आहे.
AI किंवा फोटोशॉप वापरुन एडिट केलेले
फोटो पाहून असं सांगितलं जात होतं की, आता त्यांचं करिअर संपलं. पण, सत्य हे आहे की, सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या सर्व गोष्टी खोट्या आहेत. दरम्यान, नेहा कक्करला अटक झाल्याची बाबच खोटी आहे. फोटो AI आणि फोटोशॉपचा वापर करुन तयार केले आहेत.
नेहाचा आणि घोटाळ्याचा काडीमात्र संबंध नाही
नेहा कक्करला अटक करण्यात आल्याचे फोटो आर्टिफिशियल इंटेलिजेंस (AI) च्या मदतीनं तयार केलेले आहेत आणि तिचा कोणत्याही घोटाळ्याशी काडीमात्र संबंध नाही.
View this post on Instagram
नेहाचा चेहरा मॉर्फ करण्यात आलाय
सत्य हे आहे की, या चित्रांमध्ये दिसणारी महिला दुसरीच कुणीतरी आहे आणि तिचा चेहरा नेहाच्या चेहऱ्याशी बदलण्यात आला आहे. एआयच्या मदतीनं असा घोटाळा होण्याची ही पहिलीच वेळ नाही. एआयमुळे सेलिब्रिटींचं नुकसान होत आहे. यापूर्वी, अमिताभ बच्चन आणि रणवीर सिंह सारख्या सेलिब्रिटींची नावं लोकांना एका घोटाळेबाज वेबसाईटवर आकर्षित करण्यासाठी वापरली जात होती.
महत्त्वाच्या इतर बातम्या :