नागराज मंजुळे, सिद्धार्थ रॉय कपूरची 'मटका किंग' वेब सीरिज होणार रिलीज; प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला
सिद्धार्थ रॉय कपूर (siddharth roy kapur) आणि नागराज मंजुळे (nagraj manjule) यांची मटका किंग (matka king) ही वेब सीरिज लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.
Matka King : बॉलिवूडमधील प्रसिद्ध चित्रपट निर्माता सिद्धार्थ रॉय कपूर (siddharth roy kapur) आणि नागराज मंजुळे (nagraj manjule) यांची मटका किंग (matka king) ही वेब सीरिज लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. 1960ते 1990 या दशकतील घटलेल्या सत्य घटनांवर या वेब सीरिजचे कथानक आधारित आहे. रतन खत्रीचं जीवन देखील या वेब सीरिजमध्ये दाखवण्यात येणार आहे. अनेक लोक रतन खत्रीला भारतातील मटका म्हणजेच जुगार खेळाचा राजा मानत होते.
निर्माता सिद्धार्थ रॉय कपूरनं या वेब सीरिजबद्दल सांगितलं, 'नागराजचा सैराट हा चित्रपट मला खूप आवडला होता. आता या नव्या प्रोजेक्टमध्ये मी त्याच्यासोबत काम करत आहे याचा मला आनंद वाटत आहे. भारताबरोबरच जगातील प्रेक्षकांच्या ही वेब सीरिज नक्कीच पसंतीस पडेल.'
नागराज मंजुळेनं त्याच्या या आगामी प्रोजेक्टबाबत सांगितलं, 'मी ओटीटी प्लॅटफोर्मवर ही वेगळी गोष्ट सर्वांसमोर मंडायला आणि सिद्धार्थ रॉय कपूरसोबत हा प्रोजेक्ट करायला उत्सुक आहे. मी आशा बाळगतो की जेवढा आनंद आम्हाला हा प्रोजेक्ट करताना झाला तेवढाच प्रेक्षकांना ही वेब सीरिज पाहताना होईल. '
सिध्दार्थ रॉय कपूरच्या रॉय कपूर फिल्म्स या प्रोडक्शन हाऊसची ही नवी वेब सीरिज पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक असतील. रॉय कपूर फिल्म्स प्रोडक्शन हाऊसच्या अरण्यक' या सीरिजला देखील प्रेक्षकांची पसंती मिळाली. या सीरिजमध्ये रवीना टंडन, परमब्रता चटर्जी आणि आशुतोष राणा या कलाकारांनी प्रमुख भूमिका साकारली आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
Deepika Padukone : ...म्हणून शूटिंग सेटवर दीपिका घेऊन जाते रंगीत पेन्सिल बॉक्स!
Ankita Lokhande : डिझायनर मनीष मल्होत्राने डिझाइन केला अंकिताचा रॉयल लेहेंगा; 1600 तास सुरु होतं काम
Bollywood's Richest Actresses in 2022: ऐश्वर्या ते प्रियांका; बॉलिवूडमधील टॉप- 5 श्रीमंत अभिनेत्री
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha