Ankita Lokhande : डिझायनर मनीष मल्होत्राने डिझाइन केला अंकिताचा रॉयल लेहेंगा; 1600 तास सुरु होतं काम
छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री अंकिता लोखंडे (Ankita Lokhande) आणि विकी जैन (Vicky Jain) यांचा 14 डिसेंबर 2021 रोजी लग्न सोहळा पार पडला.
Ankita Lokhande lehenga which took 1600 hours to make: छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री अंकिता लोखंडे (Ankita Lokhande) आणि विकी जैन (Vicky Jain) यांचा 14 डिसेंबर 2021 रोजी लग्न सोहळा पार पडला. दोघांच्या लग्नाचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. लग्नसोहळ्यामध्ये अंकिताने सोनेरी रंगाचा सुंदर वर्क केलेला लेहेंगा घातला होता. हा लेहेंगा प्रसिद्ध डिझायनर मनीष मल्होत्रा यांनी डिझाइन केला आहे.
मनीष मल्होत्रा यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत या लेहेंग्याबद्दल काही खास गोष्टी सांगितल्या होत्या. त्या पोस्टमध्ये त्यांनी लिहिले होते, 'हा लेहेंगा तयार करण्यासाठी तब्बल 1600 तास लागले. शिल्प कौशल यांनी या लेहेंग्यावर हाताने वर्क केले आहे. क्रिस्टल मोती आणि प्राचीन जरदोरी, लटकन इत्यादी गोष्टींचा वापर करून हा लेहेंगा डिझाइन केला आहे. '
View this post on Instagram
लग्नात विकीने पांढऱ्या रंगाच्या शेरवानी घातली आहे. लग्नसोहळ्यात विकीने विंटेज कारमधून एन्ट्री घेतली होती. अंकिता लोखंडेच्या संगीत कार्यक्रमाला कंगना रणौतने हजेरी लावली होती. अंकिता आणि कंगना दोघीही खूप जवळच्या मैत्रिणी आहेत. दोघांनी मणिकर्णिका या चित्रपटात एकत्र काम केले होते.
संबंधित बातम्या