Mithila Palkar : मिथिला पालकरची भावनिक पोस्ट; म्हणाली, 'भाऊ आम्हाला सोडून गेले'
मिथिला पालकर (Mithila Palkar) च्या आजोबांचे 26 मार्च रोजी निधन झाले. ते 94 वर्षाचे होते.
Mithila Palkar : सोशल मीडिया क्वीन अशी ओळख असणारी अभिनेत्री मिथिला पालकर (Mithila Palkar) सोशल मीडियावर वेगवेगळ्या पोस्ट शेअर करत असते. तिच्या आजोबांचे 26 मार्च रोजी निधन झाले. ते 94 वर्षाचे होते. मिथिलानं नुकतीच एक भावनिक पोस्ट शेअर केली आहे. तिनं तिच्या आजोबांचे काही फोटो शेअर करून कॅप्शनमध्ये तिच्या भावना व्यक्त केल्या आहेत.
मिथिलाची पोस्ट
मिथिलानं पोस्टमध्ये लिहिले, 'माझा विश्वाचा केंद्र, माझे भाऊ काही दिवसांपूर्वी आम्हाला सोडून गेले. मला त्यांच्या शिवाय कसं जगायचं हे माहित नाही. ते माझ्यासाठी खूप स्पेशल होते. तसेच ते माझ्यासाठी नेहमीच नंबर एकवर राहितील. स्वर्ग आता तुमच्या हसण्यानं आनंदी होईल. '
स्पृहा जोशी, श्रिया पिलगावकर, रेणूका शहाणे आणि अमृता खानविलकर या कलाकारांनी मिथिलाच्या पोस्टला कमेंट करून तिच्या आजोबांना श्रद्धांजली वाहिली.
View this post on Instagram
काही दिवसांपूर्वी मिथिलानं तिच्या आजोबांच्या वाढदिवसानिमित्त एक खास पोस्ट शेअर केली होती. या पोस्टमध्ये तिनं लिहिले होते, 'माझं आयुष्य, माझं ह्रदय आणि माझ्या आयुष्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा. '
हेही वाचा :
- Bollywood : जंजीरमध्ये काम केल्यानंतर राम चरणने 'या' कारणांमुळे बॉलिवूडमध्ये काम केले नाही; अभिनेत्याचा गौप्यस्फोट
- RRR Box Office Collection Day 6 : 'आरआरआर' ची बॉक्स ऑफिसवर घोडदौड सुरूच; सहाव्या दिवशी कोट्यवधींची कमाई
- RRR : 65 दिवस एकाच सिनचं शूटिंग; 'भीम' भूमिकेसाठी ज्युनियर एनटीआरची मेहनत
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha