Bollywood : जंजीरमध्ये काम केल्यानंतर राम चरणने 'या' कारणांमुळे बॉलिवूडमध्ये काम केले नाही; अभिनेत्याचा गौप्यस्फोट
Bollywood : राम चरणला नुकतेच विचारण्यात आले की, जंजीरनंतर त्याने कोणत्याच बॉलिवूड चित्रपटात काम का केले नाही? यावर अभिनेता काय म्हणाला ते वाचा.
Bollywood : एसएस राजामौलीचा 'आरआरआर' (RRR) सिनेमा बॉक्स ऑफिसवर प्रचंड धुमाकूळ घालतोय. या चित्रपटात राम चरण (Ram Charan) महत्त्वाच्या भूमिकेत दिसत आहे. राम चरणच्या व्यतिरिक्त ज्युनियर एनटीआर, आलिया भट्ट यांसारखे स्टार्सदेखील आपल्या अभिनयाच्या जादूने लोकांना वेड लावत आहेत. राम चरणने प्रियांका चोप्रा आणि अमिताभ बच्चन यांच्याबरोबर 2013 मध्ये आलेल्या जंजीर (Zanjeer) चित्रपटात काम केले होते. मात्र, हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगलाच फ्लॉप झाला.
राम चरणला नुकतेच विचारण्यात आले की, जंजीरनंतर त्याने कोणत्याच बॉलिवूड चित्रपटात काम का केले नाही? यावर त्याने मजेशीर उत्तर दिले. राम चरण म्हणाला "हा फक्त एक प्रवृत्तीचा भाग आहे. मला करायचं नाही असं अजिबात नाही. मी अनेक हिंदी चित्रपट पाहतो आणि ते मला खूप आवडतात."
याविषयी पुढे बोलताना राम चरण म्हणाला की, "कुणास ठाऊक, हे फक्त एसएस राजामौलीच्या चित्रपटासोबतच होणार होते. भारतीय हिंदी चित्रपटांमध्ये काम करण्यासाठी आम्ही नेहमीच तयार असतो." 'आरआरआर'बद्दल (RRR) बोलताना राम चरण म्हणाला की, हा जितका तमिळ चित्रपट आहे तितकाच हा हिंदी चित्रपटसुद्धा आहे. हा चित्रपट संपूर्ण देशाचा आहे. आम्ही मर्यादित राहणे थांबवले आहे आणि संपूर्ण देशावर लक्ष केंद्रित करण्यास सुरुवात केली आहे."
'आरआरआरबद्दल बोलायचे झाले तर, हा चित्रपट 25 मार्चला प्रदर्शित झाला आहे. चित्रपटात रामचरण आणि ज्युनियर एनटीआर यांच्या अभिनयाचे सर्वत्र कौतुक होत आहे. या दोघांशिवाय आलिया भट्टनेही चित्रपटात उत्कृष्ट कामगिरी केली आहे. निर्मात्यांनी हा चित्रपट 2D आणि 3D मध्ये रिलीज केला आहे. चित्रपटाला मिळत असलेल्या प्रतिसादामुळे कलाकार खूप खूश आहेत.
महत्वाच्या बातम्या :
- Lock Upp : कंगनाच्या लॉकअपमध्ये आपापसांतचं भिडली ‘टीम ब्लू’, पूनम पांडेशी वादानंतर अंजली अरोराची टास्कमधून माघार!
- Bhagya Dile Tu Mala : नवी मालिका अन् नवी भूमिका, ‘रत्नमाला’ स्वीकारण्याबद्दल निवेदिता सराफ म्हणतात...
- The Kashmir Files : ज्यांना 'द कश्मीर फाइल्स'ची अडचण आहे, त्यांनी स्वतःचा चित्रपट बनवून सत्य दाखवावे : अनुपम खेर
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह | ABP Majha