Baba Siddique Murder Case Update: बाबा सिद्दिकींची हत्या, सलमान खानच्या घरावरील हल्ल्याचा मास्टरमाईंड सापडला? अनमोल बिश्नोई कॅनडातून अटकेत?
Baba Siddique Murder Case Update: अनमोल बिश्नोईच्या अटकेच्या कारवाईवर मात्र, मुंबई पोलिसांकडून कुठलंही स्पष्टीकरण किंवा दुजोरा देण्यात आलेला नाही.

Baba Siddique Murder Case Update: राष्ट्रवादीचे (NCP) नेते बाबा सिद्दिकी (Baba Siddique) यांच्या हत्येनंतर बॉलिवूड (Bollywood) अभिनेता सलमान खानच्या (Salman Khan) घरावरही हल्ला करण्यात आलेला. या दोन्ही घटनांमागे बिश्नोई गँग (Bishnoi Gang) असल्याचं समोर आलेलं. तसेच, त्यानंतर बाबा सिद्दिकी हत्याकांडमध्ये (Baba Siddique Murder Case) दाखल करण्यात आलेल्या चार्जशीटमध्ये मुंबई क्राईम ब्रांचनं (Mumbai Crime Branch) खुलासा केलेला की, बाबा सिद्दिकींच्या हत्येचा मास्टरमाईंड गुजरात साबरमती जेलमध्ये कैद असलेला गँगस्टर लॉरेंस बिश्नोईचा (Lawrence Bishnoi) भाऊ अनमोल बिश्नोई (Anmol Bishnoi) आहे. तसेच, सलमान खानच्या (Salman Khan) घराबाहेरील गोळीबाराच्या घटनेचा मास्टरमाईंडही अनमोलंच असल्याचं समोर आलेलं. अशातच आता अनमोल बिश्नोईला कॅनडातून अटक (Is Anmol Bishnoi Arrested From Canada) करण्यात आल्याचं बोललं जातंय. दरम्यान, अनमोल बिश्नोईच्या अटकेच्या कारवाईवर मात्र, मुंबई पोलिसांकडून (Mumbai Police) कुठलंही स्पष्टीकरण किंवा दुजोरा देण्यात आलेला नाही.
माजी आमदार बाबा सिद्धीकी आणि अभिनेता सलमान खान याच्या घरावर हल्ला करणाऱ्या गुन्ह्यातील मास्टर माईंड अनमोल बिष्णोई याला कॅनडातमध्ये अटक करण्यात आल्याचं बोललं जात आहे. या अटकेच्या कारवाईवर मात्र मुंबई पोलिसांकडून कुठलंही स्पष्टीकरण किंवा दुजोरा देण्यात आलेला नाही. भारतीय तपास यंत्रणा सध्या कॅनडा अधिकाऱ्यांकडून अटकेत असलेल्या व्यक्तीची ओळख पटवण्याचं काम करत आहेत.
रशियन पासपोर्टवर प्रवास करणाऱ्या एका व्यक्तीला कॅनडा पोलिसांनी अटक केली आहे, अटकेत असलेल्या व्यक्तीकडे रशियन पासपोर्ट आढळला असून तो बनावट असल्याचा संशय आल्यामुळे त्याला अटक करण्यात आली आहे. त्याचा फोटो भारतीय अधिकाऱ्यांना पाठवण्यात आला असून, चेहऱ्याची मिळतीजुळती वैशिष्ट्य लक्षात घेता, तो अनमोल बिश्नोई असण्याची शक्यता बळावली आहे.
अनमोलवर 32 हून अधिक गुन्हे नोंद (More Than 32 Crimes Registered Against Anmol)
अनमोलवर 32 हून अधिक गुन्हे नोंद आहेत. त्यात खून, खंडणी, अपहरण यांसारख्या गंभीर गुन्ह्यांचा समावेश आहे. फक्त राजस्थानमध्येच त्याच्याविरुद्ध 20 प्रकरणांची नोंद करण्यात आली आहे.
सलमान खानच्या घरावर गोळीबार
मुंबईतील सलमान खानच्या घराबाहेर 14 एप्रिल 2024 रोजी झालेल्या गोळीबारानंतर तो चर्चेत आला होता. तसेच, माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांच्या खूनाच्या प्रकरणातही त्याचा सहभाग असल्याचं समोर आलं आहे.
मागील वर्षी अनमोलला अमेरिकेतील कॅलिफोर्नियामध्ये थोड्या काळासाठी अटक झाली होती, मात्र नंतर त्याती जामीनावर मुक्तता झाली. राष्ट्रीय तपास संस्थेनं (NIA) अनमोलबाबत माहिती देणाऱ्यासाठी 10 लाखांचे इनाम जाहीर केलं होतं. तसेच, बिश्नोई टोळीच्या परदेशी कारवायांशी संबंधित दोन प्रकरणांमध्ये त्याच्याविरुद्ध चार्जशीट दाखल करण्यात आली आहे. नुकतीच मुंबई क्राईम ब्रांचनं विशेष मकोका न्यायालयाला सांगितलंय की, त्याला भारतात आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
इंटरपोलकडून ओळख पडताळणी
इंटरपोलनं मुंबई क्राईम ब्रांचसह काही भारतीय पोलीस यंत्रणांशी संपर्क साधला असून, कॅनडामध्ये पकडलेल्या संशयिताची ओळख निश्चित करण्यास सांगितलं आहे. ओळख निश्चित झाल्यास बिश्नोई टोळीच्या जागतिक कारवायांवर मोठा अंकुश नक्कीच बसेल.























