एक्स्प्लोर
Advertisement
असं असेल तर माझे सिनेमे बघू नका, मल्लिका शेरावतचं ट्रोलर्सना उत्तर
हाथरस घटनेनं संपूर्ण देश हादरला. त्यानंतर त्याबद्दल अनेक उलट सुटल चर्चा झडल्या. अनेक बॉलिवूड सेलिब्रेटींनी या घटनेचा निषेध केलाय. काही राजकीय नेत्यांनी या घटनेचं खापर मृत मुलीवर फोडलं. यावरही अनेक स्तरातून टीका झाली. आता या वादात मल्लिका शेरावतही पडली आहे.
मुंबई : हाथरस घटनेनं संपूर्ण देश हादरला. त्यानंतर त्याबद्दल अनेक उलट सुटल चर्चा झडल्या. अनेक बॉलिवूड सेलिब्रेटींनी या घटनेचा निषेध केला. तर काही राजकीय नेत्यांनी या घटनेचं खापर मृत मुलीवर फोडलं. ती मुलगी आपल्यावर बलात्कार झाल्याचं सांगत असताना, तिच्या शवविच्छेदन अहवालात मात्र त्याचा उल्लेखही नव्हता. यावरही अनेक स्तरातून टीका झाली. आता या वादात मल्लिका शेरावतही पडली आहे.
हाथरस घटनेचा निषेध नोंदवतानाच, भारतीयांना तिने मानसिकता बदलण्याचा सल्ला दिला आहे. आपल्याला अशा घटना थांबवायच्या असतील तर महिलांकडे पाहण्याचा पुरुषी दृष्टिकोन बदलण्याची गरज तिने बोलून दाखवली होती. त्यावर अनेकांनी तिला तिच्या चित्रपटांची आठवण करून दिली. यातल्या काहींनी मल्लिकाच्या चित्रपटांमुळेच भारतात बलात्कार होत असल्याचा जावईशोधही लावला आहे. एरवी कमेंट्स ना फारसं प्रत्युत्तर न देणारी मल्लिका मात्र या कमेंटने उखडली आहे. त्यावर ती म्हणते, 'लोकांच्या कमेंट्सपुढे हसावं की रडावं तेच कळत नाही. माझ्या सिनेमांमुळे जर बलात्काराच्या घटना वाढतायत असं काहीचं म्हणणं असेल तर त्यांनी माझे सिनेमेच पाहू नयेत.'
तिची ही कमेटं वाऱ्यासारखी व्हायरलं होते आहे. मल्लिकाने केलेल्या चित्रपटांमध्ये प्रामुख्याने प्यार के साईड इफेक्ट्स, मर्डर, ख्वाईश आदी चित्रपटांचा समावेश होतो. तिने केलेल्या अंगप्रदर्शनामुळेच भारतीय पुरुषांच्या मनात वासना निर्माण होते असं काहींनी म्हटलं आहे. हाथरस घटनेनंतर महिलांच्या वर्तणुकीवरही अनेक राजकीय नेत्यांनी मुक्ताफळं उधळली आहेत. त्यावरूनही सध्या अनेक वाद झडताना दिसतायत.
महत्त्वाच्या बातम्या :
- हाथरस घटना 'भयंकर', साक्षीदारांच्या संरक्षणासंबंधी काय उपाययोजना केली त्याची माहिती द्या, सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
- Hathras case | हाथरस प्रकरणात योगी सरकारकडून सीबीआय चौकशीचे आदेश
- Hathras : 'डीएम म्हणाले, मुलीचा कोरोनानं मृत्यू झाला असता तर मदतही मिळाली नसती', पीडित परिवाराचा गंभीर आरोप
- अलाहाबाद हायकोर्टाच्या लखनौ खंडपीठाकडून हाथरस प्रकरणी सुमोटो दाखल; योगी प्रशासनाला नोटीस
- Hathras Case : हाथरस प्रकरणावरुन महाराष्ट्रातलं राजकारण तापलं, आरोप प्रत्यारोपांच्या फैरी
- हाथरस अत्याचार पीडितेच्या मृत्यूनंतर पोलिसांकडून बळजबरीने अंत्यसंस्कार, राहुल गांधींकडून व्हिडीओ पोस्ट
- हाथरसनंतर बलरामपूरमध्ये विद्यार्थीनीसोबत सामूहिक अत्याचार, कंबर, पायही तोडले, पीडितेचा मृत्यू
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement