एक्स्प्लोर

हाथरस घटना 'भयंकर', साक्षीदारांच्या संरक्षणासंबंधी काय उपाययोजना केली त्याची माहिती द्या, सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश

हाथरस पीडितेच्या कुटुंबीयाना वकील मिळाला का याची खातरजमा करा आणि साक्षीदारांच्या सुरक्षेसंबंधी केलेल्या उपाययोजनांची माहिती द्या असे सर्वोच्च न्यायालयाने उत्तर प्रदेश सरकारला निर्देश दिले आहेत.

नवी दिल्ली: हाथरसच्या घटना एक भयंकर घटना असल्याचे मत व्यक्त करत सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणातील साक्षीदारांच्या सुरक्षेची उपाययोजना काय केली आहे याची माहिती 8 ऑक्टोबरपर्यंत सर्वोच्च न्यायालयाला द्यावी असे निर्देश उत्तर प्रदेश सरकारला दिले आहेत. हाथरसमध्ये एका दलित मुलीवर बलात्कार करून तिच्यावर निर्दयपणे अत्य़ाचार करण्य़ात आला होता. त्यातच तिचा मृत्यू झाला. सर्वोच्य न्यायालयाने याबाबत योगी आदित्यनाथ सरकारला प्रतिज्ञापत्र सादर करायला सांगितले आहे आणि पीडितेच्या कुटुंबीयानी त्यांचा वकील निवडला आहे का यासंदर्भात खातरजमा करण्यास सांगितली आहे. उत्तर प्रदेश सरकारने हाथरस प्रकरणात राजकीय हेतूने प्रेरित अफवा पसरत आहेत त्यामुळे या खटल्यात सीबीआयने तपास करावा अशी इच्छा व्यक्त केली होती. त्यावेळी जनहित याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने वरील मत व्यक्त केले. सरन्यायाधीश एस.ए.बोबडे, न्या. ए.एस बोपान्ना आणि व्ही. रामसुब्रमन्यम यांच्या खंडपीठाने असे म्हंटले आहे की याप्रकरणी तपास सुरळीत होईल याची निश्चिती सर्वोच्च न्यायालय करेल. आलाहाबाद उच्च न्यायालयासमोर चालणाऱ्या कामकाजाची व्याप्ती आणि सर्वोच्च न्यायालय त्याला कसे प्रासंगिक बनवू शकेल याबाबत सूचना देण्यासाठी सर्व पक्षकारांनी सर्वोच्य न्यायालयासमोर उपस्थित रहावे असेही म्हंटले आहे. सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी उत्तर प्रदेश सरकारची बाजू मांडताना असे म्हंटले आहे की या प्रकरणात कथांवर कथा रचण्यात आल्या असुन त्यांना कुठेतरी प्रतिबंध घातला पाहिजे. सीबीआयने हा तपास आपल्या हातात घेतला तर राजकीय हेतूने प्रेरित खोट्या वृत्तांना आळा बसेल. सीबीआयने हा तपास सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शनाखाली करावा असेही ते म्हणाले. मेहता असेही म्हणाले की या प्रकरणात सीबीआय किंवा विशेष तपास टीमने तपास करावा अशी जर याचिका आली तर राज्य सरकार त्याला विरोध करणार नाही. एका तरुण मुलीने तिचा जीव गमावला आहे. या घटनेचे कुणीही भांडवल करू नये. यासंबंधी तपास हा निष्पक्ष असायला हवा आणि निष्पक्ष दिसायला हवा. जेष्ठ वकिल इंदिरा जयसिंग यांनी पीडितेच्या कुटुंबीयाना संरक्षण पुरवावे अशी मागणी न्यायालयासमोर केली. सीबीआयने हा खटला हाती घ्यावा या मागणीवर पीडितेच्या कुटूंबिय समाधानी नाहीत असे सांगून जयसिंह म्हणाल्या की सर्वोच्च न्यायालायाच्या मार्गदर्शनाखाली एसआयटीने हा तपास करावा. यावेळी सरन्यायाधीश म्हणाले की हा खटला खूप महत्वाचा आहे. ही घटना अत्यंत भयंकर आहे म्हणून आम्ही तुमचे ऐकून घेत आहोत. यासंबंधी प्रत्येक पक्षकाराकडून तेच ते मत न्यायालय ऐकून घेत आहे. पण याची गरज नाही. हाथरसमध्ये ही घटना 14 सप्टेंबर रोजी घडली होती. पीडितेचा मृत्यू 29 सप्टेंबर रोजी झाला होता. तिचे अंत्यसंस्कार पोलिसांनी परस्पर घाईघाईने उरकले होते.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Jalgaon Crime: शालेय सहलीत मुलींना धार्मिक स्थळात स्कार्फ बांधून प्रवेश; मुख्याध्यापकांसह आठ शिक्षकांविरोधात गुन्हा नोंदवल्याने भुसावळमध्ये खळबळ
शालेय सहलीत मुलींना धार्मिक स्थळात स्कार्फ बांधून प्रवेश; मुख्याध्यापकांसह आठ शिक्षकांविरोधात गुन्हा नोंदवल्याने भुसावळमध्ये खळबळ
तुकाराम मुंढेंच्या नावाने धमकी, भाजप आमदार कृष्णा खोपडेंची पोलिसांत धाव, विधानसभा अध्यक्षांनाही पत्र
तुकाराम मुंढेंच्या नावाने धमकी, भाजप आमदार कृष्णा खोपडेंची पोलिसांत धाव, विधानसभा अध्यक्षांनाही पत्र
धक्कादायक! शेततळ्यात बुडून पती-पत्नीसह मुलाचा मृत्यू, पंढरपूर तालुक्यातील कोर्टी गावात घटना
धक्कादायक! शेततळ्यात बुडून पती-पत्नीसह मुलाचा मृत्यू, पंढरपूर तालुक्यातील कोर्टी गावात घटना
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 08 डिसेंबर 2025 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 08 डिसेंबर 2025 | सोमवार

व्हिडीओ

Chandrashekhar Bawankule Majha Vision : महायुतीमधील वाद-विवादावर बावनकुळेंसोबत बेधडक चर्चा
Bhaskar Jadhav : आदित्य ठाकरेंसाठी एका क्षणात विरोधी पक्षनेतेपदाचा त्याग करणार: भास्कर जाधव नेमकं काय म्हणाले?
Majha Vision vijay Wadettiwar : जेलमध्ये जाईन पण भाजपमध्ये जाणार नाही, वडेट्टीवारांची स्फोटक मुलाखत
Nilesh Rane-Ravindra Chavan : रवींद्र चव्हाण आणि निलेश राणे समोरा-समोर, विधानभवनात काय घडलं?
Nana Patole vs Devendra Fadnavis : पहिल्याचं दिवशी पटोले भिडले, फडणवीसांचं चोख प्रत्युत्तर

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Jalgaon Crime: शालेय सहलीत मुलींना धार्मिक स्थळात स्कार्फ बांधून प्रवेश; मुख्याध्यापकांसह आठ शिक्षकांविरोधात गुन्हा नोंदवल्याने भुसावळमध्ये खळबळ
शालेय सहलीत मुलींना धार्मिक स्थळात स्कार्फ बांधून प्रवेश; मुख्याध्यापकांसह आठ शिक्षकांविरोधात गुन्हा नोंदवल्याने भुसावळमध्ये खळबळ
तुकाराम मुंढेंच्या नावाने धमकी, भाजप आमदार कृष्णा खोपडेंची पोलिसांत धाव, विधानसभा अध्यक्षांनाही पत्र
तुकाराम मुंढेंच्या नावाने धमकी, भाजप आमदार कृष्णा खोपडेंची पोलिसांत धाव, विधानसभा अध्यक्षांनाही पत्र
धक्कादायक! शेततळ्यात बुडून पती-पत्नीसह मुलाचा मृत्यू, पंढरपूर तालुक्यातील कोर्टी गावात घटना
धक्कादायक! शेततळ्यात बुडून पती-पत्नीसह मुलाचा मृत्यू, पंढरपूर तालुक्यातील कोर्टी गावात घटना
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 08 डिसेंबर 2025 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 08 डिसेंबर 2025 | सोमवार
किरीट सोमय्या विनापोस्ट काम करतात; किरीट सोमय्यांच्या नाराजीबाबत चंद्रशेखर बावनकुळेंनी स्पष्टच सांगितलं
किरीट सोमय्या विनापोस्ट काम करतात; किरीट सोमय्यांच्या नाराजीबाबत चंद्रशेखर बावनकुळेंनी स्पष्टच सांगितलं
Priyanka Gandhi: मोदी तुम्ही 12 वर्ष पीएम आहात, तेवढी वर्ष नेहरू जेलमध्ये होते; त्यांच्या चुकांची यादी करा, चर्चा करू, सरकार देशाचं वास्तव लपवतंय, प्रियंका गांधींचा सडकून प्रहार
मोदी तुम्ही 12 वर्ष पीएम आहात, तेवढी वर्ष नेहरू जेलमध्ये होते; त्यांच्या चुकांची यादी करा, चर्चा करू, सरकार देशाचं वास्तव लपवतंय, प्रियंका गांधींचा सडकून प्रहार
दिव्यांगांनी भूमी अभिलेख कार्यालयास ठोकले टाळे; शेतकऱ्यांसाठी आंदोलन, संयम तुटला, स्वत:लाच कोंडून घेतले
दिव्यांगांनी भूमी अभिलेख कार्यालयास ठोकले टाळे; शेतकऱ्यांसाठी आंदोलन, संयम तुटला, स्वत:लाच कोंडून घेतले
ज्यांच्या 'पितृ संघटने'ने 50 वर्षात कधीच राष्ट्रगीत गायलं नाही, तिरंगा फडकवला नाही तेच आज वंदे मातरमचे कौतुक करत आहेत; खासदार अरविंद सावतांनी वाभाडे काढले
ज्यांच्या 'पितृ संघटने'ने 50 वर्षात कधीच राष्ट्रगीत गायलं नाही, तिरंगा फडकवला नाही तेच आज वंदे मातरमचे कौतुक करत आहेत; खासदार अरविंद सावतांनी वाभाडे काढले
Embed widget