एक्स्प्लोर

अशा मुली बाजरीच्या शेतात मृतावस्थेत सापडतात : भाजप नेते रणजीत श्रीवास्तव

हाथरस बलात्कार पीडितेची चिता उत्तर प्रदेश पोलिसांनी पेट्रोल ओतून जाळली. आता उत्तर प्रदेशातील भाजप नेते तिच्या चारित्र्यावर चिखलफेक करत आहेत. अशा मुली बाजरी, ऊसाच्या शेतात मृतावस्थेत का सापडतात अशी मुक्ताफळं रणजीत श्रीवास्तव यांनी उधळली आहेत.

लखनौ : उत्तर प्रदेशातील हाथरसमध्ये तरुणीवर झालेल्या गँगरेपनंतर देशभरात संतापाचं वातावरण आहे. एकीकडे लोकांमध्ये रोष आहे तर दुसरीकडे बाराबंकीमधील भाजप नेत्याने वादग्रस्त आणि संतापजनक वक्तव्य करुन मृत तरुणीचं चारित्र्यहनन केलं आहे. सर्व मृत मुली बाजरी, मका, ऊस आणि डाळींच्या शेतातच का सापडतात, असं वक्तव्य बाराबंकी नगरपरिषद नवाबगंजचे चेअरमन आणि भाजपचे नेते रणजीत श्रीवास्तव यांनी केलं आहे..

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये रणजीत श्रीवास्तव म्हणतात की, "प्रेमप्रकरणातून मुलीने मुलाला बाजरीच्या शेतात बोलावलं असेल. तिला नातेवाईकांनी पकडलं असणार, कारण शेतात हेच तर होतं. ज्या मुलींचा अशाप्रकारे मृत्यू होतो त्या डाळीच्या, ऊसाच्या, मक्याच्या, बाजरीच्या किंवा नाल्यात अथवा जंगलात सापजतात. त्या धान किंवा गव्हाच्या शेतात मृतावस्थेत सापडत नाही आणि त्यांना कोणीही ओढत घेऊन जात नाही. अखेर अशा ठिकाणीच या घटना का होतात हा तपासाचा विषय आहे आणि मी चुकीचं बोललेलो नाही."

मुलींवर योग्य संस्कार नसल्यानं बलात्कार, भाजप आमदाराची मुक्ताफळं

रणजीत श्रीवास्तव यांनी याआधीही मुलींबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. मुली ऊस, बाजरी आणि मक्याच्या शेतात गवत कापायला का जातात? या मुलींना एकांतात गवत कापायचं असतं त्यावेळी त्यांना ऊस, मका, बाजरीचचं शेत दिसतं का? दुसरीकडे त्यांना गवत मिळत नाही का? असं वक्तव्य श्रीवास्तव म्हणाले होते.

दरम्यान आम आदमी पक्षाने या भाजप नेत्याचा व्हिडीओ शेअर करुन जोरदार टीका केली आहे. रणजीत श्रीवास्तव यांचा व्हिडीओ शेअर करताना आम आदमी पक्षाच्या ट्विटर हॅण्डलवर लिहिलं आहे की, "या भाजप नेत्याचं वक्तव्य ऐकल्यास तुमचं रक्त खवळेल. अशा मुली ऊस, बाजरीच्या शेतातच सापडतात. जंगल आणि नाल्यात सापडतात. तो दिवस येऊच देऊ नका की जन्म होताच मुलीला मारुन टाकलं जाईल किंवा सती प्रथा सुरु केली जाईल. सीबीआयचा तपास झाला आहे, मुलं निर्दोष आहेत. त्या मुलांचं तारुण्य कोण परत करणार?'

भाजप आमदार सुरेंद्र सिंह यांची मुक्ताफळं चांगले संस्कारच बलात्कार रोखू शकतात असं वक्तव्य भाजपचे बलियाचे आमदार सुरेंद्र सिंह यांनी केलं आहे. "मी फक्त एक आमदार नाही तर एक चांगला शिक्षकही आहे. त्यामुळे मी हे सांगतो आहे की आपल्या मुलींवर चांगले संस्कार घडवा. फक्त सरकार आणि तलवारीनं बलात्कारासारख्या घटना रोखू शकत नाहीत. तर चांगले संस्कार बलात्कार रोखू शकतात. गुन्ह्यांवर वचक ठेवणं हे सरकारचं काम आहे यात शंकाच नाही. मात्र मुलींवर चांगले संस्कार घडवणं त्यांना शालीन राहण्यास शिकवणं हे आई-वडिलांचं कर्तव्य आहे. जिथे सरकारचा धर्म सुरक्षा करण्याचा आहे तसा परिवाराचा धर्म आहे संस्कार देण्याचा. सरकार आणि संस्कार मिळून भारताला सुंदर बनवू शकतात," असं सुरेंद्र सिंह यांनी म्हटलं आहे.

Hathras Case | या मुली नेहमी बाजरीच्या शेतात मेलेल्या अवस्थेत सापडतात; भाजप नेते रंजित सिंह बरळले

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Nana Patole : समाजात तेढ निर्माण करणाऱ्या लोकांना काँग्रेस खपवून घेणार नाही; टी राजाच्या वक्तव्यावरुन नाना पटोलेंची संतप्त प्रतिक्रिया
समाजात तेढ निर्माण करणाऱ्या लोकांना काँग्रेस खपवून घेणार नाही; टी राजाच्या वक्तव्यावरुन नाना पटोलेंची संतप्त प्रतिक्रिया
Ravindra Waikar : हा रडीचा डाव आता बंद करा; मतमोजणी पूर्ण झाली नसताना कसं काय विजयी घोषित केलं? रवींद्र वायकरांचा सवाल
हा रडीचा डाव आता बंद करा; मतमोजणी पूर्ण झाली नसताना कसं काय विजयी घोषित केलं? रवींद्र वायकरांचा सवाल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जून 2024 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जून 2024 | रविवार
खासदार वायकरांचे मेहुणे आणि मुलगी सतत फोनवर संपर्कात, आम्ही त्यांच्या फोनवर आक्षेप घेतला पण..., भरत शाह यांचा गंभीर आरोप
खासदार वायकरांचे मेहुणे आणि मुलगी सतत फोनवर संपर्कात, आम्ही त्यांच्या फोनवर आक्षेप घेतला पण..., भरत शाह यांचा गंभीर आरोप
Advertisement
metaverse

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 06 PM  : 16 June 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सElection Commission PC :  EVM आणि पंडीलकर यांचा काहीही संबंध नाही- निर्णय अधिकारीSangali Vidhan Sabha Election : सांगलीच्या जागेवरून मविआत विधानसभेलाही वाद?BalKavdi Dam : साताऱ्यातील बलकवडी धरणात 24 वर्षांनी शिवकालीन अवशेष दिसले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nana Patole : समाजात तेढ निर्माण करणाऱ्या लोकांना काँग्रेस खपवून घेणार नाही; टी राजाच्या वक्तव्यावरुन नाना पटोलेंची संतप्त प्रतिक्रिया
समाजात तेढ निर्माण करणाऱ्या लोकांना काँग्रेस खपवून घेणार नाही; टी राजाच्या वक्तव्यावरुन नाना पटोलेंची संतप्त प्रतिक्रिया
Ravindra Waikar : हा रडीचा डाव आता बंद करा; मतमोजणी पूर्ण झाली नसताना कसं काय विजयी घोषित केलं? रवींद्र वायकरांचा सवाल
हा रडीचा डाव आता बंद करा; मतमोजणी पूर्ण झाली नसताना कसं काय विजयी घोषित केलं? रवींद्र वायकरांचा सवाल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जून 2024 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जून 2024 | रविवार
खासदार वायकरांचे मेहुणे आणि मुलगी सतत फोनवर संपर्कात, आम्ही त्यांच्या फोनवर आक्षेप घेतला पण..., भरत शाह यांचा गंभीर आरोप
खासदार वायकरांचे मेहुणे आणि मुलगी सतत फोनवर संपर्कात, आम्ही त्यांच्या फोनवर आक्षेप घेतला पण..., भरत शाह यांचा गंभीर आरोप
Lok Sabha Speaker : लोकसभा अध्यक्षपदावरून घमासान सुरु; जेडीयूची तयारी, पण चंद्राबाबूंच्या टीडीपीने टेन्शन वाढवलं!
लोकसभा अध्यक्षपदावरून घमासान सुरु; जेडीयूची तयारी, पण चंद्राबाबूंच्या टीडीपीने टेन्शन वाढवलं!
EVM अन् मोबाईलचा संबंध नाही, तो OTP कशाचा?; निवडणूक अधिकाऱ्यांनी सगळा किस्सा उलगडा
EVM अन् मोबाईलचा संबंध नाही, तो OTP कशाचा?; निवडणूक अधिकाऱ्यांनी सगळा किस्सा उलगडा
चंद्रहार पाटील पराभव विसरुन कामाला लागले, सांगलीत विधानसभेच्या किती जागा लढवणार, थेट मतदारसंघांची नावं सागितली
चंद्रहार पाटील लोकसभेचा पराभव विसरुन पुन्हा मैदानात, सांगलीत विधानसभेच्या किती जागा लढवणार, थेट आकडा सांगितला 
Ravindra Waikar kin Mangesh Pandilkar : ईव्हीएम अनलाॅक करणारा मोबाईल वायकरांच्या मेव्हण्याकडे; महाविकास आघाडीतील नेत्यांचा कडाडून हल्लाबोल!
ईव्हीएम अनलाॅक करणारा मोबाईल वायकरांच्या मेव्हण्याकडे; महाविकास आघाडीतील नेत्यांचा कडाडून हल्लाबोल!
Embed widget