अलाहाबाद हायकोर्टाच्या लखनौ खंडपीठाकडून हाथरस प्रकरणी सुमोटो दाखल; योगी प्रशासनाला नोटीस
अलाहाबाद हायकोर्टाच्या लखनौ खंडपीठाने हाथरस प्रकरणाची स्वतःहून (सुमोटो) दखल घेतली आहे. अलाहाबाद उच्च न्यायालयाकडून उत्तर प्रदेश सरकारच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना नोटीस
लखनौ : अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या लखनौ खंडपीठाने हाथरस प्रकरणाची स्वतःहून (सुमोटो) दखल घेतली असून उत्तर प्रदेश सरकारच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना नोटीस बजावली आहे. हायकोर्टाने डीजीपी, एडीजी (कायदा व सुव्यवस्था), डीएम हाथरस, एसपी हाथरस यांना समन्स बजावले आहे. पुढील सुनावणी 12 ऑक्टोबर रोजी होईल.
अलाहाबाद उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती राजन रॉय आणि न्यायमूर्ती जसप्रीत सिंग यांनी सुमोटो दाखल करुन घेतली आहे. त्यांनी पीडित मुलीचे घाईघाईत अंत्यसंस्कार करण्यासंदर्भात ही दखल घेतली आहे.
महाराष्ट्राला जाब विचारणारे आज गप्प का? हाथरस घटनेवरुन राज ठाकरे यांचा सवाल
माहितीनुसार यूपीच्या हाथरस जिल्हातील एका गावात 14 सप्टेंबर रोजी 19 वर्षीय मुलीवर अत्याचार केल्याची घटना घडली. घटनेनंतर पीडितेला अलीगडच्या जेएन मेडिकल कॉलेज हॉस्पिटलमध्ये भर्ती करण्यात आलं. सोमवारी तिची प्रकृती गंभीर असल्यानं तिला उपचारासाठी दिल्लीला आणलं. मात्र, मंगळवारी उपचारादरम्यान तिचा दुर्देवी मृत्यू झाला. यूपी सरकारने पीडितेच्या कुटूंबासाठी 10 लाख रुपयांच्या मदतीची घोषणा केली आहे.
Hathras Gang Rape | पीडितेच्या शवविच्छेदन अहवालात बलात्काराचा उल्लेखच नाही!
हाथरसला पायी चालत जाणाऱ्या राहुल गांधींना पोलिसांकडून धक्काबुक्की हाथरसला पायी चालत जाणाऱ्या काँग्रेस खासदार राहुल गांधी यांना उत्तर प्रदेश पोलिसांकडून धक्काबुक्की करण्यात आली. यावेळी राहुल गांधी जमिनीवर पडले. यासोबतच काँग्रेस कार्यकर्त्यांवरही पोलिसांनी लाठीमार केला. मात्र हाथरसला जाऊन पीडितेच्या कुटुंबांची भेट घेण्यावर राहुल गांधी ठाम आहेत.
Priyanka Gandhi's Reaction | "अहंकारी सरकारने केलेला लाठीमार आम्ही थांबवू शकत नाही": प्रियांका गांधी