एक्स्प्लोर

RJ Sumit Suffered From Kidney Disease: 'माझ्या किडन्या शट डाऊन झालेल्या...'; आरजे सुमितची गंभीर आजारावर मात, म्हणाला, 'डॉक्टरांनी सांगितलेलं, अचानक मृत्यू होईल'

RJ Sumit Suffered From Kidney Disease: सुमितनं आरोग्याच्या मोठ्या गंभीर समस्यांवर मोठ्या धैर्यानं मात केलीय.  अशातच आता सुमितनं त्याला नेमकं काय झालेलं, याबद्दल पोस्ट शेअर करत माहिती दिली आहे.

RJ Sumit Suffered From Kidney Disease: सुप्रसिद्ध आरजे आणि सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर सुमित (RJ Sumit) गेल्या काही दिवसांपासून आजारी होता, हे आपल्या सर्वांनाच माहीत आहे. आरजे सुमित स्वतःच आपल्या आजारपणाबाबतचे व्हिडीओ त्याच्या इन्स्टा हँडलवरुन शेअर करत होता. पण, सुमितला नेमकं झालेलं काय? याबाबत त्याच्या फॉलोअर्ससोबतच सर्वांनाच पडलेला. सुमितच्या प्रकृतीत सुधारणा झाली असली तरी, अजूनही त्याला आरामाची गरज आहे. सुमितनं आरोग्याच्या मोठ्या गंभीर समस्यांवर मोठ्या धैर्यानं मात केलीय. अशातच आता सुमितनं त्याला नेमकं काय झालेलं, याबद्दल पोस्ट शेअर करत माहिती दिली आहे. त्यानं व्हिडीओ शेअर केला असून "तुमच्या प्रेमामुळे आज मी जिवंत आहे...", असं कॅप्शन लिहिलंय.  

आरजे सुमितनं त्याच्या इन्स्टा हँडलवरुन एक व्हिडीओ शेअर केलाय. या व्हिडीओमध्ये त्यानं त्याला झालेल्या आजाराबाबत सांगितलं आहे. सुमितची प्रकृती अत्यंत गंभीर झालेली. एकवेळ अशी आलेली की, सुमितच्या जगण्याची गॅरेंटी डॉक्टरांनी दिली नव्हती, असं स्वतः सुमितनं व्हिडीओमध्ये बोलताना सांगितलं आहे. 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by RJ Sumit (@rjsumitt)

इन्स्टावर शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये आरजे सुमित नेमकं काय म्हणालाय? 

सुमित इन्स्टाग्रामवर व्हिडीओ शेअर करत म्हणाला की, "भरपूर लोकांनी मला विचारलं की, तुला काय झालं होत? माझ्या किडन्या शट डाऊन झाल्या होत्या. कारण माझं पोट्याशिअम लेव्हल 6.5 झालं होत, क्रॅटिन्ग लेव्हल 23.5 झालं होत. 1.2 हे नॉर्मल असतं. 5-6 जरी क्रिएटिव्ह लेव्हल असेल तरी पेशन्ट कोमात जातो, असं डॉक्टरांनी सांगितलं होत. आणि माझं तर 23.5 इतकं वर गेलंय त्यामुळे जगण्याची गॅरेंटी दिली नव्हती. त्यामुळे डॉक्टरांनी त्वरित डायलेसिस करण्यास सांगितलं. माझ्या 4 डायलेसिस झाल्या 1 बायोप्सी झाली. त्यानंतर माझे रिपोर्ट्स नॉर्मल आहेत. डिहायड्रेशनमुळे माझी किडनी ड्राय झाली होती. आणि किडनीच्या ट्यूबमध्ये जखम झाली असल्यामुळे ते ब्लॉक झालं होत. युरीन पास होत नव्हतं आणि झालंच तरी त्यातून रक्त जात होतं. किडनी फिल्टर करत नव्हती म्हणून इमर्जन्सीमध्ये डायलेसिस केलं गेलं. 23.5 म्हणजे पेशंट गेल्यात जमा असतो..."

पुढे बोलताना आरजे सुमितनं सांगितलं की, "मला डॉक्टरांनी सांगितलेलं की, आताच्या आता डायलेसिस नाही केलं तर, कोमात जाऊ शकतो, नाहीतर अचानक मृत्यू होईल. पण, देवाची कृपा, आई-वडिलांची पुण्याई आणि तुमच्या सगळ्यांचं प्रेम यामुळे सगळ्यातून बाहेर आलोय.माझं वजन कमी झालंय, पथ्य आहे भरपूर. मला फक्त एवढंच म्हणायचंय की, जेव्हा तुम्हाला त्रास होत असेल तेव्हा फक्त ब्लड टेस्ट न करताना किडनीसुद्धा तपासली पाहिजे. तुमचं हेच प्रेम आणि आशीर्वाद कायम माझ्यासोबत राहूदे.' असं म्हणत सुमितने सर्वांचे आभार मानले आहेत. हा व्हिडिओ शेअर करत सुमितनं, 'तुमच्या प्रेमामुळे आज मी जिवंत आहे...", असं कॅप्शन लिहिलं आहे.

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Girish Oak On Sachin Pilgaonkar: 'ही चेहरा नसलेली माणसं...'; मराठी अभिनेते गिरिश ओक सचिन पिळगावकरांबाबत नेमकं काय म्हणाले?

महत्त्वाच्या बातम्या

Sunita Ahuja on Govinda: 'लेकीच्या वयाच्या मुलीसोबत फिरतोय, लाज वाटली पाहिजे'; गोविंदाचा 'त्या' तरुणीसोबत व्हिडीओ व्हायरल, पत्नीचा संताप, म्हणाली...
'लेकीच्या वयाच्या मुलीसोबत फिरतोय, लाज वाटली पाहिजे'; गोविंदाचा 'त्या' तरुणीसोबत व्हिडीओ व्हायरल, पत्नीचा संताप, म्हणाली...
Dengue vs Typhoid: तुमच्या मुलाला ताप आला? खूप डोकंही दुखतं? डेंग्यू किंवा टायफॉइडची लक्षणं तर नाही ना? कसं ओळखाल?
तुमच्या मुलाला ताप आला? खूप डोकंही दुखतं? डेंग्यू किंवा टायफॉइडची लक्षणं तर नाही ना? कसं ओळखाल?
Vaibhav Mangle Daughter: 'आता तू सज्ञान झाली आहेस'; वैभव मांगलेंची लेकीसाठी खास पोस्ट, 18 व्या वर्षात पदार्पण, अभिनेत्याच्या मुलीला पाहिलंत?
'आता तू सज्ञान झाली आहेस'; वैभव मांगलेंची लेकीसाठी खास पोस्ट, 18 व्या वर्षात पदार्पण, अभिनेत्याच्या मुलीला पाहिलंत?
Samay raina: समय रैनाला सुप्रीम कोर्टाकडून मोठा दिलासा; 'इंडियाज गॉट लेटेंट' मधील वादग्रस्त टिप्पणीप्रकरणी FIR रद्द
समय रैनाला सुप्रीम कोर्टाकडून मोठा दिलासा; 'इंडियाज गॉट लेटेंट' मधील वादग्रस्त टिप्पणीप्रकरणी FIR रद्द

व्हिडीओ

Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Chakan Traffic Jam : पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती; चाकण वाहतूक कोंडीवर सरकारचा मोठा निर्णय
पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती; चाकण वाहतूक कोंडीवर सरकारचा मोठा निर्णय
Share Market : शेअर बाजारात घसरण कायम, निफ्टीत सलग चौथ्या दिवशी घसरण, गुंतवणूकदारांचे 1.97 लाख कोटींचं नुकसान
शेअर बाजारात घसरण कायम, निफ्टीत सलग चौथ्या दिवशी घसरण, गुंतवणूकदारांचे 1.97 लाख कोटींचं नुकसान
Burger King : डॉमिनोजनंतर बर्गर किंगवर 'FDA' ची मोठी कारवाई; पुण्यातील कँप शाखेचा परवाना जागेवरच रद्द!
डॉमिनोजनंतर बर्गर किंगवर 'FDA' ची मोठी कारवाई; पुण्यातील कँप शाखेचा परवाना जागेवरच रद्द!
Surya Kant: 'काॅकरोच' वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावला गेला आणि देशातील तरुणांची दिशाभूल करण्यासाठी त्याचा गैरवापर केला; सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्याकडून पुन्हा खुलासा
'काॅकरोच' वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावला गेला आणि देशातील तरुणांची दिशाभूल करण्यासाठी त्याचा गैरवापर केला; सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्याकडून पुन्हा खुलासा
NCP : पार्थ पवारांकडून झिशान सिद्दिकी यांना पुन्हा मोठी संधी, वरिष्ठांचा विरोध डावलत सिद्दिकींकडे मुंबई अध्यक्षपद? सूत्रांची माहिती
पार्थ पवारांकडून झिशान सिद्दिकी यांना पुन्हा मोठी संधी, वरिष्ठांचा विरोध डावलत सिद्दिकींकडे मुंबई अध्यक्षपद?
पोलीस आणि अग्निशमन दलाच्या 301 जवानांना शौर्य पुरस्कार जाहीर, यापैकी 197 जण नक्षलग्रस्त भागातील, सीबीआयच्या 21 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही राष्ट्रपती पदक
पोलीस आणि अग्निशमन दलाच्या 301 जवानांना शौर्य पुरस्कार जाहीर, यापैकी 197 जण नक्षलग्रस्त भागातील, सीबीआयच्या 21 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही राष्ट्रपती पदक
Sri Lanka vs India, 1st Test: तब्बल 9 वर्षांनी टीम इंडियाची श्रीलंकेविरुद्ध 'कसोटी' लागणार, पण 15 पैकी फक्त या 3 जणांना श्रीलंकन भूमीतील अनुभव
तब्बल 9 वर्षांनी टीम इंडियाची श्रीलंकेविरुद्ध 'कसोटी' लागणार, पण 15 पैकी फक्त या 3 जणांना श्रीलंकन भूमीतील अनुभव
Investment Tips :  राकेश झुनझुनवालांचे गुंतवणुकीचे 10  मंत्र, प्रत्येक गुंतवणूकदारांसाठी ठरतील फायदेशीर, जाणून घ्या 
राकेश झुनझुनवालांचे गुंतवणुकीचे 10  मंत्र, प्रत्येक गुंतवणूकदारांसाठी ठरतील फायदेशीर, जाणून घ्या 
Embed widget