एक्स्प्लोर

हाथरसनंतर बलरामपूरमध्ये विद्यार्थीनीसोबत सामूहिक अत्याचार, कंबर, पायही तोडले, पीडितेचा मृत्यू

उत्तरप्रदेशमधील हाथरस (Hathras)येथील अत्याचाराची घटना ताजी असताना पुन्हा एक निर्दयी घटना समोर आली आहे. यूपीतील बलरामपूरमध्ये (Balrampur) 22 वर्षीय विद्यार्थिनीसोबत सामूहिक बलात्कार आणि हत्येची घटना समोर आली आहे.

बलरामपूर: उत्तरप्रदेशमधील हाथरस येथील अत्याचाराची घटना ताजी असताना पुन्हा एक निर्दयी घटना समोर आली आहे. हाथरस प्रकरणाचा देशभरात निषेध होत असताना आता यूपीतील बलरामपूरमध्ये 22 वर्षीय विद्यार्थिनीसोबत सामूहिक बलात्कार आणि हत्येची घटना समोर आली आहे. दवाखान्यात घेऊन जात असताना पीडितेचा मृत्यू झाला. मंगळवारी बलरामपूरच्या कोतवाली गैसडी क्षेत्रात ही घटना घडली. पीडितेच्या आईने आरोप केला आहे की, नराधमांनी तिच्या मुलीची कंबर आणि पाय तोडले होते, ज्यामुळं ती उभे राहू शकत नव्हती.

पीडितेच्या आईनं सांगितलं की, त्यांची मुलगी मंगळवारी दहा वाजताच्या सुमारास कॉलेजमध्ये अॅडमिशनसाठी गेली होती. तेव्हा काही नराधमांनी तिचं अपहरण केलं आणि तिच्यावर सामूहिक अत्याचार केला. सायंकाळपर्यंत ती घरी न आल्याने तिला फोन केला असता तिचा फोन बंद आला.

हाथरस अत्याचार पीडितेच्या मृत्यूनंतर पोलिसांकडून बळजबरीने अंत्यसंस्कार, राहुल गांधींकडून व्हिडीओ पोस्ट

पीडितेला एका रिक्षावाला सात वाजेच्या सुमारास गंभीर अवस्थेत घेऊन आला. तिची अवस्था प्रचंड गंभीर होती. ती काही बोलूही शकत नव्हती. नातेवाईकांनी तिला स्थानिक डॉक्टरांकडे नेलं. मात्र स्थिती गंभीर असल्यानं डॉक्टरांनी लखनौला घेऊन जाण्याचं सांगितलं. मात्र तुलसीपूर हॉस्पिटलला पोहोचण्याच्या आधीच पीडितेचा मृत्यू झाला.

देशात महिलांविरोधात गुन्ह्यांमध्ये गतवर्षीच्या तुलनेत तब्बल 7 टक्के वाढ

उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी ट्वीट करत यावर तात्काळ कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. त्यांनी म्हटलं आहे, "हाथरसनंतर आता बलरामपूर मध्येही एका मुलीसोबक सामूहिक अत्याचार आणि घृणास्पद कृत्य केलं आहे. त्यात तिचा मृत्यू झाला. भाजप सरकारनं हाथरसप्रमाणे दुर्लक्ष आणि थातुरमातुर कारवाई न करता गुन्हेगारांविरोधात कडक कारवाई करावी."

तर काँग्रेस नेते राज बब्बर यांनी म्हटलं आहे की, "आता बलरामपूरमध्येही दलित समाजाच्या मुलीसोबत पाशवी कृत्य करण्यात आलं आहे. अशीच घटना आजमगड आणि बुलंदशहरमध्येही घडली आहे. प्रत्येक घटनांमध्ये पीडितांना न्यायाची अपेक्षा आहे. महिला सुरक्षेच्या गोष्टी करत सत्तेवर आलेल्या भाजप महिला सुरक्षेच्या आश्वासनांना विसरलं आहे. लेकींच्या जीवाच्या बदल्यात केवळ मदत देऊन काय होणार?"

या घटनेबाबत पोलिसांनी म्हटलं आहे की, या प्रकरणात आरोपींना अटक केली आहे. पुढील कारवाई सुरु आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Sunetra Pawar: रेवती-सारंगच्या रिसेप्शनला पार्थ-जयची उपस्थिती, पण सुनेत्रा पवार का नव्हत्या? राष्ट्रवादीच्या नेत्याने कारण सांगितलं
रेवती-सारंगच्या रिसेप्शनला पार्थ-जयची उपस्थिती, पण सुनेत्रा पवार का नव्हत्या? राष्ट्रवादीच्या नेत्याने कारण सांगितलं
PM Modi and Rohit Pawar: PM मोदी स्टेजवर येताच सुप्रिया सुळेंनी रोहित पवारांना हाताला धरुन खेचलं, पुढे काय घडलं?; सगळीकडे चर्चा, पाहा 38 सेकंदाचा VIDEO
PM मोदी स्टेजवर येताच सुप्रिया सुळेंनी रोहित पवारांना हाताला धरुन खेचलं, पुढे काय घडलं?; सगळीकडे चर्चा, पाहा 38 सेकंदाचा VIDEO
काही परकीय शक्तींकडून भारताला थांबवायचा प्रयत्न; तिरंगा रॅलीतून फडणवीसांनी सांगितली देशभक्ती, म्हणाले, तरुणाई थांबणार नाही
काही परकीय शक्तींकडून भारताला थांबवायचा प्रयत्न; तिरंगा रॅलीतून फडणवीसांनी सांगितली देशभक्ती, म्हणाले, तरुणाई थांबणार नाही
Jharkhand Student Protest: झारखंडमध्ये आंदोलक विद्यार्थी थेट विधानसभेच्या गेटवर पोहोचले, बॅरिकेड्स तोडले; पोलिसांचा लाठीचार्ज, अश्रुधुराच्या नळकांड्या फेकल्या
झारखंडमध्ये आंदोलक विद्यार्थी थेट विधानसभेच्या गेटवर पोहोचले, बॅरिकेड्स तोडले; पोलिसांचा लाठीचार्ज, अश्रुधुराच्या नळकांड्या फेकल्या

व्हिडीओ

Sharad Pawar NCP MP Meet PM Modi : मोदींच्या दरबारी कोणती 'तुतारी'? Special Report
Nitesh Rane : जरांगे, राज ठाकरे, फडणवीस-जयंतरावांचा एकत्र प्रवास ते पवारांचे खासदार; राणेंचं भाष्य!
Bajrang Sonawane On PM Modi Meet : पंतप्रधान मोदींची भेट कशासाठी? खासदार बजरंग सोनवणेंचा खुलासा
Shivsena: ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Raj Thackeray Special Report : मुंबई-गोवा महामार्गावरुन राज ठाकरेंचे सरकारला खडेसवाल : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sachin Ahir Shivsena: इकडे सचिन अहिरांनी मुंबईत शिंदेंची शिवसेना बांधायला घेतली तिकडे भावाचीही बैठकांना हजेरी, सुनील अहिरही उद्धव ठाकरेंची साथ सोडणार?
इकडे सचिन अहिरांनी मुंबईत शिंदेंची शिवसेना बांधायला घेतली तिकडे भावाचीही बैठकांना हजेरी, सुनील अहिरही उद्धव ठाकरेंची साथ सोडणार?
Sunetra Pawar: रेवती-सारंगच्या रिसेप्शनला पार्थ-जयची उपस्थिती, पण सुनेत्रा पवार का नव्हत्या? राष्ट्रवादीच्या नेत्याने कारण सांगितलं
रेवती-सारंगच्या रिसेप्शनला पार्थ-जयची उपस्थिती, पण सुनेत्रा पवार का नव्हत्या? राष्ट्रवादीच्या नेत्याने कारण सांगितलं
Tejasvee Ghosalkar Gen Z: भाजपच्या तेजस्वी घोसाळकरांची जेन झी साठी महत्त्वाची मागणी, लोकल ट्रेनमधील तीन डबे आरक्षित करा, थेट रेल्वेमंत्र्यांना धाडलं पत्र
भाजपच्या तेजस्वी घोसाळकरांची जेन झी साठी महत्त्वाची मागणी, लोकल ट्रेनमधील तीन डबे आरक्षित करा, थेट रेल्वेमंत्र्यांना धाडलं पत्र
AR Rahman Son AR Ameen Car Accident: ए. आर. रहमान यांचा मुलगा अमीनच्या गाडीचा भीषण अपघात; गायकाची पोर्शे कार एका कॅबला धडकली, अन्...
ए. आर. रहमान यांचा मुलगा अमीनच्या गाडीचा भीषण अपघात; पोर्शे कार एका कॅबला धडकली, अन्...
Hardik Pandya Trade : हार्दिक पांड्याला घेण्यासाठी संघांची पैशांची जुळवाजुळव, पण मुंबई इंडियन्सने अद्याप पत्तेच उघडले नाहीत! KKR-CSKच्या प्लॅनला ब्रेक, नेमकं काय घडलं?
हार्दिक पांड्याला घेण्यासाठी संघांची पैशांची जुळवाजुळव, पण मुंबई इंडियन्सने अद्याप पत्तेच उघडले नाहीत! KKR-CSKच्या प्लॅनला ब्रेक, नेमकं काय घडलं?
ODI World Cup 2027 : कधीकाळी क्रिकेट विश्वावर राज्य, आता वर्ल्ड कप खेळण्यासाठी संघर्ष! 5 ICC ट्रॉफी जिंकणाऱ्या वेस्ट इंडिजची दाणादाण
कधीकाळी क्रिकेट विश्वावर राज्य, आता वर्ल्ड कप खेळण्यासाठी संघर्ष! 5 ICC ट्रॉफी जिंकणाऱ्या वेस्ट इंडिजची दाणादाण
Maharashtra Live blog updates: नाशिकसह पालघरमध्ये पुन्हा भूकंपाचे धक्के; जव्हार-विक्रमगड परिसर हादरला
Maharashtra Live blog updates: नाशिकसह पालघरमध्ये पुन्हा भूकंपाचे धक्के; जव्हार-विक्रमगड परिसर हादरला
PM Modi and Rohit Pawar: PM मोदी स्टेजवर येताच सुप्रिया सुळेंनी रोहित पवारांना हाताला धरुन खेचलं, पुढे काय घडलं?; सगळीकडे चर्चा, पाहा 38 सेकंदाचा VIDEO
PM मोदी स्टेजवर येताच सुप्रिया सुळेंनी रोहित पवारांना हाताला धरुन खेचलं, पुढे काय घडलं?; सगळीकडे चर्चा, पाहा 38 सेकंदाचा VIDEO
Embed widget