Malayalam actor Arrested: अभिनेता श्रीजीत रवीला पोक्सो अॅक्ट अंतर्गत अटक; दोन अल्पवयीन मुलींनं केली होती तक्रार
अभिनेता श्रीजीत रवी (Sreejith Ravi) पोक्सो या (POCSO) कमलाअंतर्गत अटक करण्यात आली आहे.
Sreejith Ravi Arrested : मल्याळम चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता श्रीजीत रवी (Sreejith Ravi) याला दोन अल्पवयीन मुलींसोबत अश्लील चाळे केल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. पोक्सो या (POCSO) कमलाअंतर्गत त्याला अटक करण्यात आली आहे.
काय आहे प्रकरण?
रिपोर्टनुसार, एका काळ्या गाडीमध्ये एका व्यक्तीनं अश्लील चाळे केले, अशी तक्रार 4 जुलै रोजी 14 आणि 9 वर्षांच्या दोन अल्पवयीन मुलींनी पोलिसांकडे केली. मुलींनी केलेल्या तक्रारीनंतर त्रिशूर पश्चिम पोलिसांनी कारवाई करत सीसीटीव्ही फुटेज तपासले. पोलिस जेव्हा आरोपीच्या घरी पोहोचले तेव्हा कळले की, तो अभिनेता श्रीजीत आहे. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन या प्रकरणाची चौकशी करण्यास सुरुवात केली.
2016 मध्ये देखील श्रीजीत रवीवर काही मुलींनी अश्लील चाळे केल्याचा आरोप केला होता. त्यावेळी त्याला अटक करण्यात आली. पण नंतर श्रीजीत रवीला जामीन मिळाला होता.
कोण आहे श्रीजीत रवी?
श्रीजीत हा ज्येष्ठ अभिनेते टी.जी. रवी यांचा मुलगा आहे. 46 वर्षाच्या श्रीजीत हा मेकॅनिकल इंजिनियर आहे. तसेच त्याच्याकडे मॅनेजमेंटची डिग्री देखील आहे. 2005 मध्ये मल्याळम चित्रपटसृष्टीमध्ये श्रीजीत रवीनं मायोखम या चित्रपटामधून पदार्पण केलं. त्यानंतर त्याचा चंथुपोट्टू हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस आला होता. श्रीजीत रवीनं 70 पेक्षा जास्त चित्रपटांमध्ये काम केलं आहे. पुण्यलन अगरबत्तीस या चित्रपटातील अभिनयासाठी त्यांना 2013 मध्ये सर्वोत्कृष्ट विनोदी कलाकाराचा SIIMA पुरस्कार मिळाला. मिशन 90 डेज आणि पुण्यलन प्रायव्हेट लिमिटेड या चित्रपटांमध्ये देखील अभिनेता श्रीजीत रवीनं काम केलं आहे. श्रीजीत रवी हा सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असतो. वेगवेगळे फोटो आणि व्हिडीओ तो सोशल मीडियावर शेअर करतो.
हेही वाचा: