एक्स्प्लोर

Mumbai Crime News: उंदीर फळे खातात म्हणून चक्क फळांना 'रॅट किलर' औषध; मुंबईकरांच्या जीवाशी खेळणाऱ्या दोघांना बेड्या; फॉरेन्सिक पथकाकडून तपास सुरु

Malad Fruit Seller : फळांवर चक्क 'रॅट किलर' औषध लावणाऱ्या दोघांना अटक केली आहे. मनोजकुमार केसरवाणी, बिपीन केसरवाणी अशी या आरोपींची नावे आहेत.

Mumbai News : मुंबई शहरात जर तुम्ही रस्त्यावर फळ (Fruit) घेत असाल तर सावधान! कारण मालाड (Malad) परिसरात फळ विक्रेताचा एक अतिशय धक्कादायक आणि संतापजनक प्रकार समोर आला आहे. यात मालाडमध्ये एका परप्रांतीय फळ विक्रेताचा बेजबाबदारपणा लोकांच्या जीवावर बेतू शकतो अशीच एक घटना समोर आली आहे. यात फळ विक्रेत्याकडून फळांवर चक्क उंदीर मारण्याचं औषध (Ratol) सारखी क्रीम लावून थेट मुंबईकरांच्या जीवाशी खेळ केला जातोय. या संदर्भातील एक व्हिडिओ व्हायरल  (Viral Video) झाल्यानंतर हा सर्व प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी आता कारवाई करत फळांना 'रॅट किलर' औषध लावणाऱ्या दोघांना अटक केली आहे.

Malad Fruit Seller : सर्रासपणे मुंबईकरांच्या जीवाशी खेळ, व्हिडिओ व्हायरल 

दरम्यान, या व्हायरल व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसत आहे कि, फळ विक्रेता कच्च्या फळांना पिकवण्यासाठी थेट विषारी क्रीम लावून पकवत आहे. फळविक्रेताजे Ratol सारखे विषारी पदार्थ वापरात आहे ते वापरल्याने उलटी, पोटदुखी, विषबाधा, लिव्हर नुकसान आणि जीवाला धोका निर्माण होऊ शकतो. मात्र, या फळविक्रेताकडून मुंबईकरांची आरोग्याची चिंता नसून तो सर्रासपणे मुंबईकरांच्या जीवाशी खेळ करत आहे. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर नागरिकांकडून फळविक्रेत्यावर कारवाई करण्याची मागणी पालिका आणि पोलिसांकडे केली. त्यांनतर पोलिसांनी प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता तात्काळ कारवाई केली आहे. यात उंदीर मारण्याचे औषध फळांवर लावणाऱ्या दोघांना मालाड पोलिसांनी अटक केली असून मनोजकुमार केसरवाणी, बिपीन केसरवाणी अशी या आरोपींची नावे आहेत.

खरंतर मुंबई शहरात मोठ्या प्रमाणात रस्त्यावर अनधिकृत फळवाले स्टॉल लावून फळ विकतात. कच्चे फळ लवकर पिकण्यासाठी चक्क विषारी पदार्थ लावून फळ लवकर पिकवून मग विकतात. मात्र, अशामध्ये मुंबई महानगरपालिका आणि पोलिसांकडून याकडे दुर्लक्ष केल्यामुळे ही घटना घडत असल्याचे देखील नागरिकांचा आरोप आहे. त्यामुळे मुंबईकरांचा जीवाशी खेळणारे असे फळविक्रेतांवर तात्काळ पोलिसांनी आणि मुंबई महानगरपालिका कर्मचाऱ्यांनी कारवाई करावी, अशी मागणी सुरू आहे.

Mumbai News : उंदीर फळे खातात, म्हणून...., फळविक्रेत्याचा अजब दावा

तर दुसरीकडे या प्रकरणात पोलिसांनी चौकशी केली असता उंदरांपासून बचावासाठी प्रयोग केल्याचा अजब दावा फळविक्रेत्याने केला आहे. 'उंदीर फळे खातात, म्हणून आम्ही त्यावर औषध लावत होतो' अशी कबुली फळविक्रेत्याने दिल्याची माहिती पोलिसांना दिली. त्यानंतर त्यांना अटक करण्यात आली. फॉरेन्सिक पथकाने घटनास्थळी भेट देऊन फळांचे नमुने घेत जप्त केले आहेत.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Nashik Crime News: कायद्याचा बालेकिल्ला म्हणणाऱ्या नाशिक पोलिसांना रोडरोमिओंचं चॅलेंज, रनिंगला गेलेल्या तरुणीची टवाळखोराने काढली छेड, सोशल मिडियावर सांगितली आपबिती
कायद्याचा बालेकिल्ला म्हणणाऱ्या नाशिक पोलिसांना रोडरोमिओंचं चॅलेंज, रनिंगला गेलेल्या तरुणीची टवाळखोराने काढली छेड, सोशल मिडियावर सांगितली आपबिती
Pune Crime News: दारूच्या नशेत तरुण-तरुणीचा पोलीस ठाण्यात धिंगाणा, महिला पोलीस उपनिरीक्षकाच्या हाताचा घेतला चावा, धमकी देत म्हणाली जीव देईन अन्... पुण्यातील धक्कादायक घटना
दारूच्या नशेत तरुण-तरुणीचा पोलीस ठाण्यात धिंगाणा, महिला पोलीस उपनिरीक्षकाच्या हाताचा घेतला चावा, धमकी देत म्हणाली जीव देईन अन्... पुण्यातील धक्कादायक घटना
Santosh Deshmukh Case: आम्हाला कागदपत्र देत नाहीत, सरकारी पक्षाकडूनच दिरंगाई; उज्वल निकम अन् आरोपींच्या वकिलामध्ये खडाजंगी, कोर्टात नेमकं काय घडलं?
आम्हाला कागदपत्र देत नाहीत, सरकारी पक्षाकडूनच दिरंगाई; सरपंच संतोष देशमुख प्रकरणात उज्वल निकम अन् आरोपींच्या वकिलामध्ये खडाजंगी, कोर्टात नेमकं काय घडलं?
Nashik Crime News: घरी पाहुणा आला, पती नाईट शिफ्टला गेला, विवाहितेचे हात बांधून अत्याचार, नराधमाला पाठलाग करुन डोंगरात पकडलं
घरी पाहुणा आला, पती नाईट शिफ्टला गेला, विवाहितेचे हात बांधून अत्याचार, नराधमाला पाठलाग करुन डोंगरात पकडलं
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Gold Silver Rate Update : अमेरिका इजरायल आणि इराणमधील युद्धामुळे सोनं आणि चांदीच्या दरात मोठी घसरण
Amol Mitkari On Ajit Pawar : अजितदादांशिवाय अर्थसंकल्प ही कल्पनाच असह्य, मिटकरींच्या डोळ्यात अश्रू
Arjun Tendulkar Marriage : अर्जुनची नवी इनिंग, सेलिब्रिटी वऱ्हाडी Special Report
Nitish Kumar Rajyasabha Bihar : राज्यसभेत नितीशकुमार, भाजपसाठी मोकळं बिहार Special Report
Jyoti Waghmare Rajysabha : राज्यसभेत वाघमारे आणि नाराजीचे नगारे Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
अमेरिकेची रशियन तेल घेण्यास 30 दिवसांची परवानगी; राहुल गांधींचा ससंदेतील शब्द खरा ठरल्याची चर्चा; म्हणाले, 'हे देशाचं 'धोरण' नाही, ते तडजोड करणाऱ्या व्यक्तीच्या शोषणाचा परिणाम'
अमेरिकेची रशियन तेल घेण्यास 30 दिवसांची परवानगी; राहुल गांधींचा ससंदेतील शब्द खरा ठरल्याची चर्चा; म्हणाले, 'हे देशाचं 'धोरण' नाही, ते तडजोड करणाऱ्या व्यक्तीच्या शोषणाचा परिणाम'
Karnataka Social Media Ban : 16 वर्षाखालील मुलांच्या सोशल मीडिया वापरावर बंदीचा प्रस्ताव, कर्नाटक सरकारचा मोठा निर्णय
16 वर्षाखालील मुलांच्या सोशल मीडिया वापरावर बंदीचा प्रस्ताव, कर्नाटकचं मोठं पाऊल
Maharashtra Budget 2026 Live Updates : अर्थसंकल्पाला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी, लाईव्ह अपडेटस एका क्लिकवर
Maharashtra Budget 2026 Live Updates : अर्थसंकल्पाला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी, लाईव्ह अपडेटस एका क्लिकवर
Share Market Fall : शेअर बाजार एका दिवसाच्या तेजीनंतर पुन्हा घसरला, सेन्सेक्स 500 अंकांनी कोसळला,निफ्टीत घसरण
शेअर बाजार एका दिवसाच्या तेजीनंतर पुन्हा घसरला, सेन्सेक्स 500 अंकांनी कोसळला,निफ्टीत घसरण
नेतृत्व संपूनही इराणकडून 9 देशातील 14 अमेरिकन एअरबेस उद्ध्वस्त, दुबईसकट मित्र देश सुद्धा होरपळले; आता ट्रम्प इराणी लष्कराला मरणाची 'भीती' दाखवत काय म्हणाले?
नेतृत्व संपूनही इराणकडून 9 देशातील 14 अमेरिकन एअरबेस उद्ध्वस्त, दुबईसकट मित्र देश सुद्धा होरपळले; आता ट्रम्प इराणी लष्कराला मरणाची 'भीती' दाखवत काय म्हणाले?
Vasant More: सोशल मीडियावर व्हायरल वक्तव्य महागात; वसंत मोरे यांच्यावर गुन्हा दाखल, नेमकं प्रकरण काय?
सोशल मीडियावर व्हायरल वक्तव्य महागात; वसंत मोरे यांच्यावर गुन्हा दाखल, नेमकं प्रकरण काय?
Rohit Pawar and Eknath Shinde: होय, त्यावेळी इराणने माझं विमान पाडण्याचा इशारा दिला होता; एकनाथ शिंदेंनी कबुली दिल्याचा रोहित पवारांचा दावा
होय, त्यावेळी इराणने माझं विमान पाडण्याचा इशारा दिला होता; एकनाथ शिंदेंनी कबुली दिल्याचा रोहित पवारांचा दावा
Maharashtra Budget 2026 : महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पात कोणत्या योजना जाहीर होणार? मत्स्यसंपदा योजना ते नवीकरणीय ऊर्जा धोरण, जाणून घ्या सविस्तर
महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पात कोणत्या योजना जाहीर होणार? मत्स्यसंपदा योजना ते नवीकरणीय ऊर्जा धोरण, जाणून घ्या सविस्तर
Embed widget