एक्स्प्लोर

Smita Shewale On Her Divorce: 'मला वाटायचं माझं आयुष्य आता इथे संपलं...'; मराठी अभिनेत्रीनं स्वतःच्या घटस्फोटाबाबत 'ते' सारं सांगितलं

Smita Shewale On Her Divorce: मराठी अभिनेत्री स्मिता शेवाळेनं सांगितलं की, घटस्फोटाच्या धक्क्यातून बाहेर पडले नसते, तर माझ्यातला कलाकार हरवला असता, असंही स्मिता शेवाळेनं एका मुलाखतीत बोलताना सांगितलं. 

Smita Shewale On Her Divorce: सध्या मनोरंजन विश्वात (Entertainment News) जणू संसार मोडण्याचा ट्रेंड सुरू आहे, असं वाटतंय. एकीकडे अनेक सेलिब्रिटी आयुष्यभराचा जोडीदार निवडून आपली लग्नगाठ बांधत आहेत. तर, दुसरीकडे अनेक सेलिब्रिटींचा काडीमोड होत आहे. अशातच नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत बोलताना एक मराठी अभिनेत्रीनं आपल्या घटस्फोटावर भाष्य केलं आहे. मराठी इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री स्मिता शेवाळे (Marathi Actress Smita Shewale) हिचा काही वर्षांपूर्वी घटस्फोट झालेला. स्मितानं मुलाखतीत बोलताना त्यावेळच्या तिच्या अवस्थेबाबत सांगितलं आहे. ज्यावेळी घटस्फोट झालेला, त्यावेळी माझं आयुष्य आता इथे संपलं, असं स्मिताला वाटलेलं, असं तिनं सांगितलं. तसेच, घटस्फोटाच्या धक्क्यातून बाहेर पडले नसते, तर माझ्यातला कलाकार हरवला असता, असंही स्मिता शेवाळेनं एका मुलाखतीत बोलताना सांगितलं. 

मराठी अभिनेत्री स्मिता शेवाळेनं (Smita Shewale) नुकतीच 'अभिजात मराठी'ला मुलाखत दिली. या मुलाखती बोलताना स्मिता शेवाळेनं आपल्या घटस्फोटाबाबत सर्व सांगितलं. तसेच, देवावरच्या विश्वासामुळे या धक्क्यातून बाहेर पडणं सोपं झालं असंही ती म्हणाली. 

मराठी अभिनेत्री स्मिता शेवाळे नेमकं काय म्हणाली? 

मराठी अभिनेत्री स्मिता शेवाळे म्हणाली की, "माझ्या आयुष्यातला सगळा अवघड काळ आणि त्यावेळी मला असं वाटलेलं की, माझं आयुष्य आता इथे संपलं, जेव्हा माझा डिव्होर्स झाला. एखादी व्यक्ती आपल्याशी चुकीची वागली ना, तरी 100 चांगली माणसं देव आपल्यासाठी उभी करतो. आपण आपल्या स्वतःला बघतो, तसे दिसलो नाही तर आपल्याला त्रास होतो. माझ्या आयुष्यातला सगळ्यात कठीण काळ म्हणजे माझ्या घटस्फोटाचा काळ..."

"मला असं वाटतं की, आपल्यासोबत जर काही वाईट घडतंय, ज्या गोष्टी आपल्यासोबत घडायला नको, त्या घडत आहे. आपण त्या गोष्टींसाठी पात्र नाहीये, हे आपल्याला माहित आहे. पण, तरीही आपल्या बाबतीत ते घडतं. तेव्हा देवाने आपल्यासाठी सपोर्ट ठेवलेले असतात...", असं स्मिता शेवाळे म्हणाली. 

माझा स्वामींवर खूप विश्वास आहे, ते कायम... : स्मिता शेवाळे

"मला स्वतःला आश्चर्य वाटायचं की, माझ्या डिव्होर्सला तीन वर्ष झाली तरी त्याची कुठे वाच्यता का नाही? माझा स्वामींवर खूप विश्वास आहे, ते कायम माझ्या पाठीशी आहेत. मी युट्युब चॅनल सुरू करून चार वर्ष झाले. पण मला कोणीच नाही विचारलं. एका फक्त चाहत्याने विचारलेलं, त्यावर मी व्हिडीओ शेअर करत सगळं सांगितलेलं. त्यानंतर नाही मला कोणी विचारलं. एक वाईट वागला म्हणून बाकीच्या चांगल्या गोष्टी कशा इग्नोर करू मी? आणि जर मी त्यातून बाहेर पडले नसते ना, माझ्यातला कलाकार हरवला असता, मी काम करू शकले नसते, मी चांगली आई होऊ शकले नसते, मी स्वतंत्र स्त्री होऊ शकले नसते. त्यावेळी मी खूप शांत राहिले. हे घडल्यामुळे मी पुन्हा उभी राहिले. त्यानंतरचा माझा हा प्रवास खूप महत्वाचा होता.' असं स्मितानं सांगितलं.

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Prasikaofficial Instagram Account Now Active: इन्फ्लुएंसर कपल 'प्रसिका'ला दिलासा; सस्पेंड झालेल्या चार अकाउंट्सपैकी एक अकाउंट सुरू; इंस्टाग्रामनं माफीही मागितली

महत्त्वाच्या बातम्या

नितीन देसाईंच्या N.D स्टुडिओची मालकी आता शासनाकडे; आशिष शेलारांकडे पदभार, शूटिंगमध्ये 50 टक्क्यांची सवलत
नितीन देसाईंच्या N.D स्टुडिओची मालकी आता शासनाकडे; आशिष शेलारांकडे पदभार, शूटिंगमध्ये 50 टक्क्यांची सवलत
बॉलिवूड नाही, टीव्ही मालिकेचं हे कल्ट गाणं 17 वर्षांपासून आजही ठरतंय राजस्थानच्या लग्नांची शान
बॉलिवूड नाही, टीव्ही मालिकेचं हे कल्ट गाणं 17 वर्षांपासून आजही ठरतंय राजस्थानच्या लग्नांची शान
मंत्रालयात सुनेत्रा पवारांसमोर जमली पूजा सावंतच्या सिनेमाची टीम; पोस्टर पाहिलंत?
मंत्रालयात सुनेत्रा पवारांसमोर जमली पूजा सावंतच्या सिनेमाची टीम; पोस्टर पाहिलंत?
Marathi Thriller Film MrutyuChakra: 'प्रत्येक मृत्यूमागे आहे एक अदृश्य सावली'; 'मृत्यूचक्र' चा थ्रिलर पोस्टर रिलीज; शशांक शेंडेंची मुख्य भूमिका
'प्रत्येक मृत्यूमागे आहे एक अदृश्य सावली'; 'मृत्यूचक्र' चा थ्रिलर पोस्टर रिलीज; शशांक शेंडेंची मुख्य भूमिका

व्हिडीओ

Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Laxman Hake PC : ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले
Anand Dave Pune : श्रीमंत दगडूशेठ गणपतीची मूर्ती थेट शनिवार वाड्यात बसवा सगळे प्रश्न सुटतील
Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dhruv Jurel Catch Controversy : OUT की OUT Not? ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
Beed : सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
El Nino : अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
Abhijeet Dipke: चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
मोठी बातमी, राज्यातील महत्त्वाच्या एमआयडीसींमध्ये इंडस्ट्रिलअल टाऊनशिप ॲक्ट लागू होणार, उद्योजकांच्या अडचणी दूर करण्यासाठी सरकारचं मोठं पाऊल
मोठी बातमी, राज्यातील महत्त्वाच्या एमआयडीसींमध्ये इंडस्ट्रिलअल टाऊनशिप ॲक्ट लागू होणार
Twisha Sharma Death Case: ट्विशा शर्मा मृत्यूचं गूढ उकललं! सीबीआय चार्जशीटमधून सत्य समोर, वहिनीला केलेला शेवट मेसेज अन् काही मिनिटात...
ट्विशा शर्मा मृत्यूचं गूढ उकललं! सीबीआय चार्जशीटमधून सत्य समोर, वहिनीला केलेला शेवट मेसेज अन् काही मिनिटात...
Buldhana Crime News: वरिष्ठांचा दबाव अन् कामाचा ताण असह्य झाला, झेंडावंदन होताच डॉक्टर घरच्या शेतात गेले अन् आयुष्यच संपवलं, बुलढाण्यातली खळबळजनक घटना
वरिष्ठांचा दबाव अन् कामाचा ताण असह्य झाला, झेंडावंदन होताच डॉक्टर घरच्या शेतात गेले अन् आयुष्यच संपवलं, बुलढाण्यातली खळबळजनक घटना
Embed widget