Sanjay Raut Acquitted In Mira Bhayandar Toilet Scam Case: मेधा सोमय्या मानहानी प्रकरणात संजय राऊत निर्दोष, सत्र न्यायालयाचा मोठा निर्णय
Sanjay Raut Acquitted In Mira Bhayandar Toilet Scam Case: मेधा सोमय्या यांनी संजय राऊत यांच्याविरुद्ध अब्रुनुकसानीचा खटला दाखल केला होता . या प्रकरणी माझगांव दंडाधिकारी न्यायालयाने राऊत यांना दोषी ठरवत 15 दिवसांची कोठडी आणि 25 हजारांचा दंड देखील ठोठावला होता.

Sanjay Raut Acquitted In Mira Bhayandar Toilet Scam Case: मुंबई : भाजपचे (BJP)) माजी खासदार किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांची पत्नी मेधा सोमय्या (Medha Somaiya) यांच्या मानहानी खटल्यात मुंबई सत्र न्यायालयाने मोठा निर्णय दिला आहे. याप्रकरणात ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. किरीट सोमय्या आणि त्यांच्या पत्नी मेधा यांनी 100 कोटींचा शौचालय घोटाळा केल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला होता. मिरा भाईंदर शहरात 2022 साली 154 सार्वजनिक शौचालयं बांधण्याचे कंत्राट निघालं होतं. त्यातील 16 शौचालयांचे काम मेधा सोमय्यांच्या युवा प्रतिष्ठानला मिळालं होतं. यात सीआरझेडचे उल्लंघन करण्यात आलं, कामात बनावट कागदपत्रे सादर करण्यात आली आणि मिरा भाईंदर पालिकेची फसवणूक करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला होता. यावर मेधा किरीट सोमय्या यांनी संजय राऊतांच्या विरोधात न्यायलयात अब्रुनुकसानीचा दावा दाखल केला होता. याप्रकरणी आता संजय राऊत यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे.
मेधा सोमय्या यांनी संजय राऊत यांच्याविरुद्ध अब्रुनुकसानीचा खटला दाखल केला होता . या प्रकरणी माझगांव दंडाधिकारी न्यायालयाने राऊत यांना दोषी ठरवत 15 दिवसांची कोठडी आणि 25 हजारांचा दंड देखील ठोठावला होता. या शिक्षेला संजय राऊत यांनी सत्र न्यायालयात आव्हान दिलं होतं. मिरा भाईंदर शहरात 2022 साली सार्वजनिक शौचालयं बांधण्याचे कंत्राट निघालं होतं. त्यातील 16 शौचालयांचे काम मेधा सोमय्या यांच्या युवा प्रतिष्ठानला मिळालं होतं. यात सीआरझेडचे उल्लंघन केलं आणि कामात बनावट कागदपत्रे सादर करत मिरा भाईंदर पालिकेची फसवणूक केल्याचा आरोप सामनात करण्यात आले होते. यावर मेधा सोमय्या यांनी संजय राऊत यांच्या विरोधात न्यायालयात अब्रुनुकसानीचा दावा दाखल केला होता.
मीरा-भाईंदर शौचालय घोटाळा नेमका काय?
साल 2022 मध्ये मीरा-भाईंदर शहरात 154 सार्वजनिक शौचालयं बांधण्यात आली असून त्यातील 16 शौचालयं बांधण्याचे कंत्राट मेधा सोमय्यांच्या युवक प्रतिष्ठानला मिळालेलं. या कामात बनावट कागदपत्र सादर करून मीरा-भाईंदर महापालिकेच्या अधिकाऱ्यांची फसवणूक केल्याचा आरोप सोमय्यांवर संजय राऊत यांनी केलेला. पर्यावरणाचा ऱ्हास झाल्याची कारणं दाखवून हा घोटाळा झालेला आहे. तसेच 'घाण करून ठेवणारे म्हणतील पुरावे कुठे आहेत?, पुरावे कुठे आहेत?, हेही माहिती आहे. युवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून मेधा सोमय्या आणि त्यांच्या कुटुंबानंच केलेला हा घोटाळा' असल्याचं संजय राऊत म्हणालेले.
रेकॉर्डवरील कागदपत्रं, चित्रफिती पाहता प्रदर्शनी राऊत यांनी 15 आणि 16 एप्रिल रोजी मेधा सोमय्यांविरोधात बदनामीकारक वक्तव्य केल्याचं स्पष्ट होत आहे. त्यांनी केलेलं विधान मोठ्या प्रमाणात लोकांनी ऐकलं आणि वर्तमानपत्रातूनही वाचलेआहे. राऊत यांच्या वक्तव्यामुळे याचिकाकर्त्यांच्या प्रतिष्ठेला हानी पोहोचल्याचंहा त्यांनी पुराव्यातून म्हटलेलं आहे. त्यामुळे याचिकेतील कलम 499 (मानहानी) 500 (गुन्ह्याची शिक्षा) शिक्षा स्पष्ट करत असल्याचेही न्यायालयाने याआधी दिलेल्या आदेशात म्हटलेलं. आता सत्र न्यायालयानं याप्रकरणी संजय राऊतांची निर्दोष मुक्तता केली आहे.
























