एक्स्प्लोर

Chinmay Mandlekar Recive Fraud Call: 'पैसे भरा नाहीतर...', प्रसिद्ध मराठी अभिनेता चिन्मय मांडलेकरला फ्रॉड कॉल; माणसं घरी पाठवू असं म्हणत थेट धमकी

Chinmay Mandlekar Recive Fraud Call: मराठी अभिनेता, दिग्दर्शक, लेखक चिन्मय मांडलेकरला स्कॅम कॉल आलेला. अभिनेत्यानं यासंदर्भात पोस्ट करुन आपल्यासोबत घडलेला प्रकार सांगितला आहे. तसेच, सर्वांना जागरुक राहण्याचं आवाहनही केलंय. 

Chinmay Mandlekar Recive Fraud Call: सध्याचं युग डिजिटल युग आहे, असं म्हटलं जातं. वेगवान, जलद सारं काही एका क्लिकवर... पण, ही डिजिटल क्रांती जेवढी सोपी आणि सोयीस्कर वाटते. तेवढीच ती धोकादायक आहे. याची अनेक उदाहरणं आपण ऐकली आहे. सोशल मीडिया फ्रॉड, फेक कॉल, डिजिटल अरेस्ट यांसारख्या अनेक धक्कादायक गोष्टी आपण ऐकल्यात. फक्त सर्वसामान्यच नाहीतर अनेक सेलिब्रिटीही या डिजिटल फसवणुकीच्या विळख्यात अडकले आहेत. याबाबत सरकारनंही मोहीम हाती घेतली आहे. सरकारकडून यासंदर्भात जनजागृती करणाऱ्या अनेक जाहिरातीही प्रसिद्ध करण्यात आल्यात. असं असलं तरीसुद्धा अनेकजण या फ्रॉडच्या विळख्यात अडकतात, पण काहीजण अत्यंत जागृक असतात. अशा फ्रॉड कॉल्स करुन पैसे हडपण्याच्या प्रयत्नात असलेल्या स्कॅमर्सना असे जागरुक नागरिक धडा शिकवतात. असाच काहीसा प्रकार मराठी अभिनेता, दिग्दर्शक, लेखक चिन्मय मांडलेकर (Chinmay Mandlekar) याच्यासोबत घडलाय. अभिनेत्यानं यासंदर्भात पोस्ट करुन आपल्यासोबत घडलेला प्रकार सांगितला आहे. तसेच, सर्वांना जागरुक राहण्याचं आवाहनही केलंय. 

अभिनेता चिन्मय मांडलेकरनं सोशल मीडियावर पोस्ट करुन सांगितलं की, एक दिवस त्याला गॅस कनेक्शन बिल भरलं नसल्याचा मेसेज आला. त्यानं पोस्टमध्ये फोनची व्हॉइस रेकॉर्डींगही ऐकवलीय. त्यात फोन करणारी व्यक्ती म्हणतेय की, जानेवारी महिन्याचं 1068 रुपये बिल भरलेलं नाही. तुमचं बिल अपडेट दिसत नाही. व्हॉटस् अॅपला पाठवलेली फाइल डाऊनलोड करा. जर वेळेत पैसे भरले नाही तर पुढच्या 30 मिनिटांत आमची माणसं येऊन तुमचं कनेक्शन कट करतील, असं सांगितलं. पण, जागरुक असल्यामुळे हा फोन म्हणजे, स्कॅमचा प्रकार असल्याचं चिन्मय मांडलेकरच्या पत्नीच्या लक्षात आलं. त्यामुळे तिनं फोन न ठेवता त्याच्याशी बोलायला सुरुवात केली. 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Chinmay Deepak Mandlekar (@chinmay_d_mandlekar)

चिन्मयच्या पत्नीनं स्कॅमरशी बोलताना सांगितलं की, तुम्ही म्हणताय तसा मला कोणताच मेसेज आलेला नाही. याशिवाय कनेक्शन कट करायला जी माणसं येणार आहेत, त्यांनी पहिलं मला भेटलं पाहिजे, असंही ठामपणे सांगितलं. चिन्मयच्या पत्नीनं घेतलेल्या ठाम भूमिकेमुळे स्कॅमर गोंधळला आणि घाबरला. त्यामुळे चिन्मयच्या पत्नीच्या खरं खोटं तात्काळ लक्षात आलं. चिन्मयनं त्याच्या चाहत्यांच्या सतर्कतेसाठी पोस्ट केली असून सर्वांना जागरुक राहण्याचं आवाहनही केलं आहे. चिन्मय मांडलेकरनं पोस्टमध्ये कॉल रेकॉर्डिंगसह व्हॉट्सअॅपवर आलेल्या मेसेजचा स्क्रिनशॉर्टही शेअर केला आहे. 

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

Smita Shewale On Her Divorce: 'मला वाटायचं माझं आयुष्य आता इथे संपलं...'; मराठी अभिनेत्रीनं स्वतःच्या घटस्फोटाबाबत 'ते' सारं सांगितलं

महत्त्वाच्या बातम्या

Bollywood Actress:'झोपेतच निधन झालं...'; 35 वर्षीय अभिनेत्रीचा मृत्यू, कुटुंबियांनी गुपचूप उरकलं अंत्यसंस्कार, महिनाभरानंतर पोस्ट शेअर करत दिली माहिती
'झोपेतच निधन झालं...'; 35 वर्षीय अभिनेत्रीचा मृत्यू, कुटुंबियांनी गुपचूप उरकलं अंत्यसंस्कार, महिनाभरानंतर पोस्ट शेअर करत दिली माहिती
Sohail Khan Weight Loss: सलमान खाननंतर त्याच्या भावाची चर्चा, सोहेल खानला झालं तरी काय? वेट लॉसवर सोडलं मौन, म्हणाला...
सलमान खाननंतर त्याच्या भावाची चर्चा, सोहेल खानला झालं तरी काय? वेट लॉसवर सोडलं मौन, म्हणाला...
Bengali Filmmaker Raja Sen: सिनेसृष्टीवर शोककळा! प्रसिद्ध दिग्दर्शकाचं निधन, गंभीर आजाराशी सुरु होती झुंज; रुग्णालयातच घेतला अखेरचा श्वास
सिनेसृष्टीवर शोककळा! प्रसिद्ध दिग्दर्शकाचं निधन, गंभीर आजाराशी सुरु होती झुंज; रुग्णालयातच घेतला अखेरचा श्वास
Box Office Collection: चित्रपटाने किती कमाई केली हे ठरतं तरी कसं? थिएटरपासून ट्रेड ॲनालिस्टपर्यंत 'असा' होतो बॉक्स ऑफिस कलेक्शनचा हिशोब
चित्रपटाने किती कमाई केली हे ठरतं तरी कसं? थिएटरपासून ट्रेड ॲनालिस्टपर्यंत 'असा' होतो बॉक्स ऑफिस कलेक्शनचा हिशोब

व्हिडीओ

Nandurbar electricity issue : स्वातंत्र्यदिनाचा लखलखाट मनीबेली आजही अंधारात Special Report
Abhijeet Dipke Hingoli PC : नवीन पीएम हाऊस बांधण्यापेक्षा शाळा बांधा; अभिजीत दीपके आक्रमक!
Dhananjay Munde Speech : बहिणीचे आभार मानू कसे, पंकजा मुंडेंसाठी धनूभाऊंचे भाषण
Sunil Kendrekar Majha Katta : आएएस अधिकारी सुनील केंद्रेकर शेतीकडे कसे वळवले?
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
FPI : गुड न्यूज, विदेशी गुंतवणूकदारांनी ऑगस्टमध्ये ट्रेंड सुरुच ठेवला, भारतीय शेअर बाजारात 16621 कोटींची गुंतवणूक, जोरदार खरेदी
गुड न्यूज, विदेशी गुंतवणूकदारांनी ऑगस्टमध्ये ट्रेंड कायम ठेवला, भारतीय शेअर बाजारात 16621 कोटींची गुंतवणूक
वीजचोरांना महावितरणचा दणका! 30 कोटी 36 लाख रुपयांची चोरी उघड, कोणत्या विभागात किती वीजचोऱ्या?
वीजचोरांना महावितरणचा दणका! 30 कोटी 36 लाख रुपयांची चोरी उघड, कोणत्या विभागात किती वीजचोऱ्या?
रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा
रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा
Rohit Pawar : उद्योजकांनी प्रेस घेतल्यावर गडबड झाली, उद्योगमंत्री रविवारी चाकणमध्ये गेलेत, एवढ्या दिवसात काय गोट्या खेळत होते का? : रोहित पवार
उदय सामंतांची चाकण एमआयडीसीत रविवारी बैठक, एवढ्या दिवसात काय गोट्या खेळत होते का? : रोहित पवार
Prashant Kishor : आता सरकारनं कायदा केलाय, ...तर भाजपनं भाषणबाजी करण्याऐवजी सोनिया गांधी यांच्यावर केस करावी, प्रशांत किशोर यांची वंदे मातरमच्या वादावर भूमिका  
सरकारनं कायदा केलाय, ...तर भाजपनं भाषणबाजी करण्याऐवजी सोनिया गांधी यांच्या केस करावी : प्रशांत किशोर
अमित ठाकरेंच्या भेटीनंतर मुंबईतील फ्लॅट एजंट भावेश कावरेची माफी; म्हणाला, मला शब्दाला शब्द वाढवायचा नाही
अमित ठाकरेंच्या भेटीनंतर मुंबईतील फ्लॅट एजंट भावेश कावरेची माफी; म्हणाला, मला शब्दाला शब्द वाढवायचा नाही
चार वर्षांपासून गर्लफ्रेंड, घरात लग्नाची बोलणी सुरु असतानाच दोस्ताच्या कारमध्ये दिसली; बाॅयफ्रेंड थांबवण्यासाठी धावत्या कारच्या बोनेटवर चढला अन् 200 मीटरवर चिरडून जीवानिशी गेला
चार वर्षांपासून गर्लफ्रेंड, घरात लग्नाची बोलणी सुरु असतानाच दोस्ताच्या कारमध्ये दिसली; बाॅयफ्रेंड थांबवण्यासाठी धावत्या कारच्या बोनेटवर चढला अन् 200 मीटरवर चिरडून जीवानिशी गेला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 ऑगस्ट 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 ऑगस्ट 2026 | रविवार
Embed widget