(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Vijay Babu Case : लैंगिक अत्याचार प्रकरणी मल्याळम अभिनेता विजय बाबूला अटक; तीन जुलैपर्यंत होणार कसून चौकशी
विजय बाबूला (Vijay Babu) लैंगिक अत्याचाराच्या आरोपात अटक करण्यात आली आहे.
Vijay Babu Case : मल्याळम अभिनेता विजय बाबूला (Vijay Babu) लैंगिक अत्याचाराच्या आरोपात अटक करण्यात आली आहे. त्याला एर्नाकुलम दक्षिण पोलिस ठाण्यात चौकशीसाठी हजर केले असता त्याला अटक करण्यात आली. 22 जून रोजी केरळ उच्च न्यायालयाने त्यांना अटकपूर्व जामीन मंजूर केला होता. विजय बाबूवर लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. एका महिलेने त्याच्यावर चित्रपटातील भूमिकांसाठी लैंगिक शोषण केल्याचा आरोप केला होता. अटकपूर्व जामीन अर्ज मंजूर करताना केरळ हायकोर्टाने त्याला राज्य सोडू नये आणि पासपोर्ट जमा करण्यास सांगितले.
तपास पथकाला सोमवार 3 जुलैपर्यंत सकाळी 9 ते संध्याकाळी 6 पर्यंत चौकशी करण्याची परवानगी देण्यात आली होती. काल, असोसिएशन फॉर मल्याळम मूव्ही आर्टिस्ट्स (एएमएएमए) ने त्याला पाठिंबा दर्शविला आणि म्हटले की, न्यायालयाच्या निकालानंतरच कोणतीही कारवाई केली जाईल. तक्रारदार, तरुण अभिनेत्याची ओळख सोशल मीडियाच्या माध्यमातून उघड केल्याचा आरोपही त्याच्यावर आहे.
विजय बाबू एप्रिलच्या अखेरीस दुबईला रवाना झाला होता, त्याच सुमारास एका महिलेने त्याच्यावर लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल केला होता. कोची पोलिसांनी त्याच्यावर गुन्हा दाखल केल्यानंतर अभिनेता देश सोडून पळून गेला. 39 दिवस देशाबाहेर राहिल्यानंतर विजय बाबू 1 जून रोजी कोचीला परतला.
विजय बाबूविरोधात तक्रार करणाऱ्या महिलेनं दिलेल्या माहितीनुसार, विजय बाबूनं तिला चित्रपटामध्ये काम देण्याचे आमिष दाखवले आणि त्यानंतर एका फ्लॅटमध्ये बोलवून तिचे शारीरिक शोषण केले.
अनेक हिट चित्रपटांमध्ये विजय बाबूनं केलं काम
विजय बाबूनं मल्याळम भाषेतील अनेक हिट चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्याचा चाहता वर्ग देखील मोठा आहे. त्याच्या चित्रपटांना प्रेक्षकांची पसंती मिळते. त्याची फ्रायडे (Friday Film House) फिल्म नावाचे प्रोडक्शन हाऊस देखील आहे. या प्रोडक्शन हाऊसचा महेश बाबू हा संस्थापक आहे. काही दिवसांपूर्वी विजय बाबूनं या प्रोडक्शन हाऊसच्या नव्या चित्रपटाची घोषणा देखील केली होती.
हेही वाचा:
Vijay Babu Case : अभिनेता विजय बाबूवर लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल; महिलेने केला गंभीर आरोप