एक्स्प्लोर

बड्या अभिनेत्याच्या लेकीने गोळी झाडून स्वतःला संपवलं, राहत्या घरात मृतदेह दिसला अन्...मनोरंजनसृष्टीत खळबळ

विशेष म्हणजे काही आठवड्यांपूर्वीच त्यांची जवळची मैत्रीण कॅथरीन हिचे निधन झाल्याची बातमी समोर आली होती.

Hollywood: हॉलिवूडमधून धक्कादायक बातमी समोर आली आहे. प्रसिद्ध विनोदी अभिनेते मार्टिन शॉर्ट यांची मोठी मुलगी कॅथरीन शॉर्ट हिचा वयाच्या 42व्या वर्षी मृत्यू झाला आहे. प्राथमिक माहितीनुसार, कॅथरीनने स्वतःवर गोळी झाडून आयुष्य संपवल्याचं बोललं जात आहे. या घटनेनंतर शॉर्ट कुटुंबावर शोककळा पसरली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी सायंकाळी लॉस एंजलिस पोलीस डिपार्टमेंटला कॉल आला होता. पोलिस आणि आपत्कालीन सेवा सायंकाळी सुमारे 6.40 वाजता कॅथरीनच्या हॉलीवूड हिल्स येथील घरी पोहोचले. तेथे ती मृत अवस्थेत आढळली. मृत्यूचे कारण स्वतःवर झाडलेली गोळी असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. अधिकृत चौकशी सुरू आहे.

कुटुंबावर दुहेरी आघात

कॅथरीनच्या निधनामुळे मार्टिन शॉर्ट यांना मोठा धक्का बसला आहे. विशेष म्हणजे काही आठवड्यांपूर्वीच त्यांची जवळची मैत्रीण कॅथरीन हिचे निधन झाल्याची बातमी समोर आली होती. शॉर्ट कुटुुंबाच्या प्रतिनिधींनी एक निवेदन जारी करत कॅथरींचा निधनाची दुःखद बातमी दिली. कॅथरीनच्या निधनाने आम्हाला खूप दुःख होत आहे. शॉर्ट कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे. कॅथरीन सर्वांना प्रिय होती आणि तिने या जगात आणलेल्या आनंदी भावनेसाठी ती नेहमीच लक्षात ठेवली जाईल. या कठीण काळात तुम्ही सर्वांनी गोपनीयता राखावी, कुटुंबाला सावरण्यासाठी वेळ द्यावा अशी विनंती केलीये.

कॅथरीन शॉर्ट कोण होती?

कॅथरीन ही मार्टिन शॉर्ट आणि त्यांच्या दिवंगत पत्नी नॅन्सी डोलमन यांची मोठी मुलगी होती. नॅन्सी यांचे 2010 मध्ये अंडाशयाच्या कर्करोगाने निधन झाले होते. कॅथरीन नेहमीच लाइमलाइटपासून दूर राहिली. ती क्वचितच वडिलांसोबत सार्वजनिक कार्यक्रमांना  दिसायची.

कॅथरीनने वडिलांसारखी मनोरंजनसृष्टीची वाट न निवडता समाजसेवेचं क्षेत्र गाठलं होतं. ती मानसिक आरोग्याशी संबंधित काम करत होती. तिच्या नावाने एक स्वतंत्र क्लिनिक सुरू होतं, तसेच तज्ज्ञ मानसोपचारतज्ज्ञांच्या टीमसोबतही ती अर्धवेळ काम करत होती. लोकांना मानसिक स्वास्थ्याबद्दल मार्गदर्शन करणारी कॅथरीननेच आयुष्य संपवल्याची बातमी समोर आल्यानं अनेकांना धक्का बसला आहे. मात्र तिनं असा निर्णय का घेतला, याबाबत अजून कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

मार्टिन शॉर्टच्या कार्यक्रमांबाबत अनिश्चितता

कॅथरीन शॉर्टचे वडील मार्टिन शॉर्ट हे हॉलिवूडमधील प्रसिद्ध विनोदी अभिनेते, लेखक आणि होस्ट आहेत. आपल्या खास कॉमिक टायमिंगमुळे त्यांनी अनेक दशकं प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. मार्टिन शॉर्ट यांनी अनेक गाजलेल्या चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्यात Three Amigos, Father of the Bride, Mars Attacks! यासारख्या चित्रपटांचा समावेश आहे. तसेच सध्या ते लोकप्रिय मालिका ओन्ली मर्डर इन द बिल्डींगमधील भूमिकेमुळेही चर्चेत आहेत.

मार्टिन शॉर्ट सध्या  स्टीव मार्टिन यांच्यासोबत मिलवॉकी आणि मिनियापोलिस येथे लाईव्ह शोसाठी जाणार होते. मात्र या दुर्दैवी घटनेनंतर हे कार्यक्रम होणार की नाही, याबाबत अद्याप स्पष्टता नाही.दरम्यान, कुटुंबाने गोपनीयतेची विनंती केली असून चाहत्यांकडून शोकसंदेशांचा ओघ सुरू आहे.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Charak Fair of Faith Review: चरक ‘कांतारा’ची डुप्लिकेट नव्हे तर पायरेटेड कॉपी? पूर्ण चित्रपट पाहणंही ठरेल कठीण
चरक ‘कांतारा’ची डुप्लिकेट नव्हे तर पायरेटेड कॉपी? पूर्ण चित्रपट पाहणंही ठरेल कठीण
सोलो ट्रिप ते मैत्रीचा खास प्रवास; 'सखे गं साजणी'चा धम्माल टीझर रिलीज, पहिल्यांदाच 3 कलाकार एकत्र स्क्रीन शेअर करणार
सोलो ट्रिप ते मैत्रीचा खास प्रवास; 'सखे गं साजणी'चा धम्माल टीझर रिलीज, पहिल्यांदाच 3 कलाकार एकत्र स्क्रीन शेअर करणार
ठरलं! 'या' तारखेला रिलीज होणार 'धुरंधर 2'चा ट्रेलर; रणवीर सिंहनं दिली मोठी अपडेट
ठरलं! 'या' तारखेला रिलीज होणार 'धुरंधर 2'चा ट्रेलर; रणवीर सिंहनं दिली मोठी अपडेट
Irani Films: युद्ध, बंदी आणि अभिव्यक्तीची गळचेपी… तरीही जगभर गाजला इराणी सिनेमा; नेमकं काय आहे रहस्य?
युद्ध, बंदी आणि अभिव्यक्तीची गळचेपी… तरीही जगभर गाजला इराणी सिनेमा; नेमकं काय आहे रहस्य?
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Uddhav Thackeray Eknath Shinde Vidhabhavan :उद्धव ठाकरे - एकनाथ शिंदे आमनेसामने;विधानभवनात काय घडलं?
Devendra Fadnavis Budget 2026 : 2 लाखांपर्यंत कर्ज थकीत असलेल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी, मोठी घोषणा
Sanjay Raut PC : मोदींनी इस्रायल-इराणचं युद्ध थांबवावं, युद्धाचे परिणाम भारताला भोगावे लागणार - राऊत
Gold Silver Rate Update : अमेरिका इजरायल आणि इराणमधील युद्धामुळे सोनं आणि चांदीच्या दरात मोठी घसरण
Amol Mitkari On Ajit Pawar : अजितदादांशिवाय अर्थसंकल्प ही कल्पनाच असह्य, मिटकरींच्या डोळ्यात अश्रू

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
'सात बारा कोरा, कोरा ,कोरा म्हणत टाहो फोडून मते घेतली, मात्र दोन लाखांपर्यंतची तकलादू कर्जमाफी देत शेतकऱ्यांचा विश्वासघात केला, अटी आणि शर्तींमुळे..' ; राजू शेट्टींचा सीएम फडणवीसांवर हल्लाबोल
'सात बारा कोरा, कोरा ,कोरा म्हणत टाहो फोडून मते घेतली, मात्र दोन लाखांपर्यंतची तकलादू कर्जमाफी देत शेतकऱ्यांचा विश्वासघात केला, अटी आणि शर्तींमुळे..' ; राजू शेट्टींचा सीएम फडणवीसांवर हल्लाबोल
Eknath Shinde : लाडक्या बहिणींना 2100 रुपये कधी मिळणार? देवेंद्र फडणवीसांसमोरचं एकनाथ शिंदे म्हणाले...
लाडक्या बहिणींना 2100 रुपये कधी मिळणार? देवेंद्र फडणवीसांसमोरचं एकनाथ शिंदे म्हणाले...
Maharashtra Budget 2026:कोणतीही चालू योजना बंद केली जाणार नाही; देशातील पहिली 1 ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था बनण्याचे उद्दिष्ट महाराष्ट्र लवकरच पूर्ण करेल; मुख्यमंत्र्यांची ग्वाही
कोणतीही चालू योजना बंद केली जाणार नाही; देशातील पहिली 1 ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था बनण्याचे उद्दिष्ट महाराष्ट्र लवकरच पूर्ण करेल; मुख्यमंत्र्यांची ग्वाही
BMC : मनसेच्या यशवंत किल्लेदारांसाठी ठाकरेंच्या उमेदवाराची माघार, सहा प्रभाग समित्यांच्या निवडणुका बिनविरोध 
मनसेच्या यशवंत किल्लेदारांसाठी ठाकरेंच्या उमेदवाराची माघार, सहा प्रभाग समित्यांच्या निवडणुका बिनविरोध 
Maharashtra Budget 2026: लाडकी बहीण योजनेबाबत अर्थसंकल्पात महत्त्वाची घोषणा, 2100 रुपयांबाबत देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
लाडकी बहीण योजनेबाबत अर्थसंकल्पात महत्त्वाची घोषणा, 2100 रुपयांबाबत देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Loan Waiver : शेतकऱ्यांसाठी दोन लाखांपर्यंत कर्जमाफी जाहीर; कोणते शेतकरी पात्र? 
शेतकऱ्यांसाठी दोन लाखांपर्यंत कर्जमाफी जाहीर; कोणते शेतकरी पात्र? 
मोठी बातमी: जेसीबीच्या बाजूला जेवायला बसले, कामगारांना ट्रकने उडवलं, छत्रपती संभाजीनगर समृद्धी महामार्गावर दोघांचा जागीच मृत्यू, 3 जखमी
मोठी बातमी: जेसीबीच्या बाजूला जेवायला बसले, कामगारांना ट्रकने उडवलं, छत्रपती संभाजीनगर समृद्धी महामार्गावर दोघांचा जागीच मृत्यू, 3 जखमी
Maharashtra Budget 2026: देवेंद्र फडणवीसांच्या अर्थसंकल्पातील सर्वात मोठी घोषणा, शेतकऱ्यांना कर्जमाफी जाहीर, कोणाला लाभ मिळणार?
देवेंद्र फडणवीसांच्या अर्थसंकल्पातील सर्वात मोठी घोषणा, शेतकऱ्यांना कर्जमाफी जाहीर, कोणाला लाभ मिळणार?
Embed widget