Malegaon Namaz Pathan | मालेगाव महापालिकेच्या विद्युत विभागात नमाज पठण,भाजप आक्रमक Special Report
Malegaon Namaz Pathan | मालेगाव महापालिकेच्या विद्युत विभागात नमाज पठण,भाजप आक्रमक Special Report
रमजानचा महिना... ठिकाण, मालेगाव महापालिकेच्या विद्युत विभागाचं कार्यालय... काही स्थानिक मुस्लिम विद्युत विभागाच्या कार्यालयात नमाज पठण करतात... व्हिडीओ व्हायरल होतो... आणि मग सुरू होतं राजकारण... पण हे राजकारण करणारे नेते , मूळ प्रश्नाला हात घालताना दिसत नाही.. कोणता आहे तो मूळ प्रश्न? नमाज पठणाच्या व्हायरल व्हिडीओमागचं नेमकं सत्य काय आहे? पाहुयात मालेगाववरून आमचे प्रतिनिधी संदीप जेजुरकर यांचा हा स्पेशल रिपोर्ट...
मालेगावमधील नमाज पठणाचा व्हायरल झालेला हा व्हिडीओ, कदाचित तुमच्या मोबाईलपर्यंतही पोहोचला असेल...
या व्हिडीओमुळे नव्या वादाला तोंड फुटलंय..
आक्षेप घेणाऱ्यांचा नमाज पठणाला विरोध नाहीय,
तर ज्या ठिकाणी नमाज अदा करण्यात आलाय, त्यावरून जोरदार राजकारण सुरू झालंय..
मालेगाव महापालिकेच्या विद्युत विभागात हा नमाज अदा करण्यात आलाय..
सरकारी कार्यालयात नमाज पठण करण योग्य की अयोग्य? यावरून सुरू झालेल्या राजकीय वादविवाद स्पर्धेकडे वळण्यापूर्वी...
या मंडळींना महापालिकेच्या विद्युत विभागात नमाज अदा का करावा लागला? हे जाणून घेऊयात


































