एक्स्प्लोर

Ajit Pawar: मेलो तरी न्याय देत नाहीत, न्याय मागायचा तरी कुणाकडं? अजितदादांनी शेवटच्या श्वासापर्यंत जीवापाड जपलेल्या बारामतीकरांचा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यासाठी आक्रोश

पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेण्यास विलंब करत असल्याने बारामतीकरांचा आक्रोश पोलिस ठाण्यात दिसून आला. मेलो तरी न्याय देत नाहीत, न्याय मागायचा तरी कुणाकडं? अशी प्रतिक्रिया समर्थकांनी बोलताना दिली. 

Ajit Pawar: उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या बारामती विमानतळावरील भीषण विमान अपघातामधील निधनानंतर आमदार रोहित पवार यांनी व्हीएसआर (VSR) व्हेंचर्स आणि नागरी विमान वाहतूक महासंचालनालय (DGCA) विरुद्ध मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात गुन्हा (FIR) दाखल करण्याचा प्रयत्न केला. मात्र, मरीन ड्राईव्ह पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यास नकार दिला. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, या अपघाताबाबत बारामती तालुका पोलीस ठाण्यात 28 जानेवारी रोजी आधीच अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या प्रकरणाचा सखोल तपास सध्या राज्य गुन्हे अन्वेषण विभाग (CID), पुणे यांच्यामार्फत केला जात आहे. त्यामुळे रोहित पवार यांचा तक्रार अर्ज पुढील कार्यवाहीसाठी राज्य सीआयडीकडे पाठवण्यात आला आहे.

मेलो तरी न्याय देत नाहीत, न्याय मागायचा तरी कुणाकडं? 

दुसरीकडे, मुंबईत मरीन ड्राईव्ह पोलिसांनी गुन्हा नोंदवण्यास नकार दिल्यानंतर आज (26 फेब्रुवारी) बारामती पोलिस ठाण्यास हजारो समर्थकांसह रोहित पवार पोहोचले आहेत. सोबत वकिलांची सुद्धा फौज आहे. रोहित पवार यांचे वडिल राजेंद्र पवार तसेच युगेंद्र पवार सुद्धा रोहित यांच्यासमवेत आहेत. पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेण्यास विलंब करत असल्याने बारामतीकरांचा आक्रोश पोलिस ठाण्यात दिसून आला. मेलो तरी न्याय देत नाहीत, न्याय मागायचा तरी कुणाकडं? अशी हताश प्रतिक्रिया समर्थकांनी एबीपी माझाशी बोलताना दिली. 

गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा

दरम्यान, गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली. राज्यातील कायदा सुव्यवस्था बिघडल्याची नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा, अशीही मागणी केली. राजकारण इतकं खराब केलंय की माणसात माणूस ठेवला नाही मुख्यमंत्र्यांनी अशा शब्दात समर्थकांनी आपला राग व्यक्त केला. अजितदाादंना न्याय मिळाला पाहिजे, देहातला आत्मा निघून गेलाय, आमच्या देवाला न्याय मिळाला पाहिजे, सरकारने लक्ष घातले पाहिजे, अशीही मागणी समर्थकांनी केली. 

कंपनीला 'क्लिन चिट' देण्याचा प्रयत्न 

दरम्यान, रोहित पवार यांनी आरोप केला की, DGCA व्हीएसआर कंपनीला 'क्लिन चिट' देण्याचा प्रयत्न करत आहे. विमानाची उड्डाणयोग्यता तपासणे ही DGCA ची जबाबदारी असून, या प्रकरणाच्या तपासात गुंतलेल्या DGCA अधिकाऱ्यांवरही कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे. DGCA ने व्हीएसआरच्या पाच विमानांना उड्डाणबंदी घातली होती, ज्याचा अर्थ असा होतो की ही कंपनी अपघातास जबाबदार होती, असा दावा रोहित पवार यांनी केला.

या अपघातांमुळे अनेक कुटुंबे उद्ध्वस्त 

खासदार सुप्रिया सुळे यांनी मागणी केली की, पुढील आठवड्यात संसदेचे अधिवेशन सुरू झाल्यावर केंद्र सरकारने अजित पवार यांचा अपघात आणि झारखंडमधील एअर ॲम्ब्युलन्स अपघात या दोन्ही घटनांवर अधिकृत विधान करावे. या अपघातांमुळे अनेक कुटुंबे उद्ध्वस्त झाली असून, भविष्यात अपघातमुक्त हवाई प्रवास सुनिश्चित करण्यासाठी सखोल तपास आणि प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.

DGCA ने व्हीएसआर व्हेंचर्सची विमाने जमिनीवर उतरवण्याच्या निर्णयाचे त्यांनी स्वागत केले. मात्र, ज्या अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे किंवा प्रक्रियेचे उल्लंघन केल्यामुळे ही परिस्थिती ओढवली, त्यांच्यावर कडक कारवाई करण्याची मागणी सुळे यांनी केली आहे.

इतर महत्वाच्या बातम्या

जून 2022 पासून एबीपी माझा डिजिटल टीममध्ये असून गेल्या चार वर्षांपासून डिजिटल मीडियामध्ये कार्यरत. यापूर्वी दैनिक पुढारी, सकाळ, ईटीव्ही मराठी अशा संस्थामध्ये कामाचा अनुभव. समाजकारण, राजकारण तसेच मध्य पूर्वेतील विविध विषयांवर गेल्या आठ वर्षांपासून सातत्याने लिखाण.  
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

2019 च्या मिस इंडिया स्पर्धेतील सुंदरीचं शुद्धीकरण, पुण्यातील सायलीची हिंदू धर्मात वापसी; खासदार-आमदारांची उपस्थिती
2019 च्या मिस इंडिया स्पर्धेतील सुंदरीचं शुद्धीकरण, पुण्यातील सायलीची हिंदू धर्मात वापसी; खासदार-आमदारांची उपस्थिती
Pune News : अजितदादांना आज खूप मिस करतोय, शहरातल्या पहिल्या उद्घाटन सोहळ्याला ते नाहीयेत; डबल डेकर पुलाला अजित पवारांचे नाव द्यावं, मुरलीधर मोहोळ यांची मागणी
अजितदादांना आज खूप मिस करतोय, शहरातल्या पहिल्या उद्घाटन सोहळ्याला ते नाहीयेत; पुण्यातील डबल डेकर पुलाला अजित पवारांचे नाव द्यावं, मुरलीधर मोहोळ यांची मागणी
Pune Crime News : पुण्यातील शिक्षण क्षेत्रात खळबळ! नामंकित कॉलेजच्या विभागप्रमुखाने संपवलं जीवन; धक्कादायक कारण समोर
पुण्यातील शिक्षण क्षेत्रात खळबळ! नामंकित कॉलेजच्या विभागप्रमुखाने संपवलं जीवन; धक्कादायक कारण समोर
Pune Crime: जुन्या वादातून पुण्यात गोळीबाराचा थरार! विदेशी बनावटीच्या पिस्तूल अन् जिवंत काडतुसांसह दोघांना अटक
जुन्या वादातून पुण्यात गोळीबाराचा थरार! विदेशी बनावटीच्या पिस्तूल अन् जिवंत काडतुसांसह दोघांना अटक
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Amol Mitkari On V K Singh :व्ही.के. सिंह यांचे अंडरवर्ल्ड कनेक्शन शोधा, 'ठोक दिया' याचा अर्थ काय?
Eknath Shinde Vidhan Parishad : T 20 World Cup मध्ये टीम इंडियाचा विजय, शिंदेंकडून अभिनंदन प्रस्ताव
Vijay Wadettiwar on Budget : महाराष्ट्र कंगाल झालाय,केवळ रस्ते बांधण्यासाठी बजेट आहे का?
Gold Silver Price Drop Iran Israel War : सोनं-चांदीच्या दरात मोठी घसरण;इराण-इस्रायल युद्धाचा परिणाम
Nashik Crime : Dr. Manisha Jejurkar प्रकरणी पतीचे विवाहबाह्य संबंध होते, माहेरच्यांचे गंभीर आरोप

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
युद्धकाळ.. गुंतवणुकीची गुरुकिल्ली ‘तिच्या’ हाती; महिलांसाठी आर्थिक नियोजनाचा प्रवास, स्वावलंबनाकडून सुरक्षिततेकडे
युद्धकाळ.. गुंतवणुकीची गुरुकिल्ली ‘तिच्या’ हाती; महिलांसाठी आर्थिक नियोजनाचा प्रवास, स्वावलंबनाकडून सुरक्षिततेकडे
Video : युद्धाचा भडका, संभाजीनगरमध्ये 5 मोठे उद्योग बंद; लघुउद्योगावरही गॅस तुटवड्याचा परिणाम
Video : युद्धाचा भडका, संभाजीनगरमध्ये 5 मोठे उद्योग बंद; लघुउद्योगावरही गॅस तुटवड्याचा परिणाम
Share Market Crash : युद्धामुळे शेअर बाजारात हाहाकार! Sensex  1, 352 अंकांनी गडगडला, शेअर बाजारात गुंतवणूकदारांचे 8.5 लाख कोटी पाण्यात
युद्धामुळे शेअर बाजारात हाहाकार! Sensex  1, 352 अंकांनी गडगडला, शेअर बाजारात गुंतवणूकदारांचे 8.5 लाख कोटी पाण्यात
राज ठाकरेंना वर्धापनदिनी लातूरकरांचे गिफ्ट; पंचायत समितीवर मनसे-भाजपची सत्ता, सभापती बिनविरोध
राज ठाकरेंना वर्धापनदिनी लातूरकरांचे गिफ्ट; पंचायत समितीवर मनसे-भाजपची सत्ता, सभापती बिनविरोध
कथित दिल्ली मद्य धोरण घोटाळा प्रकरणात हायकोर्टाची सर्व 23 आरोपींना नोटीस; सीबीआय तपास अधिकाऱ्याविरुद्ध विभागीय कारवाईलाही स्थगिती, मनी लाँड्रिंग प्रकरणात सुनावणी न करण्याचे आदेश
कथित दिल्ली मद्य धोरण घोटाळा प्रकरणात हायकोर्टाची सर्व 23 आरोपींना नोटीस; सीबीआय तपास अधिकाऱ्याविरुद्ध विभागीय कारवाईलाही स्थगिती, मनी लाँड्रिंग प्रकरणात सुनावणी न करण्याचे आदेश
इस्रायलच्या तेल साठ्यांवरील हल्ल्यानंतर इराणमध्ये तेलमिश्रीत काळाकुट्ट पाऊस, सर्वसामान्यांचे आरोग्य धोक्यात; लेबनॉनमध्ये महिला लेकरा बाळांनी रस्त्यावर रात्र काढली
इस्रायलच्या तेल साठ्यांवरील हल्ल्यानंतर इराणमध्ये तेलमिश्रीत काळाकुट्ट पाऊस, सर्वसामान्यांचे आरोग्य धोक्यात; लेबनॉनमध्ये महिला लेकरा बाळांनी रस्त्यावर रात्र काढली
हायवेवर भीषण अपघात, रिक्षाचा चेंदामेंदा; भिवंडीतील दोन ऑटोचालकांचा मृत्यू
हायवेवर भीषण अपघात, रिक्षाचा चेंदामेंदा; भिवंडीतील दोन ऑटोचालकांचा मृत्यू
Mumbai Bike Taxi : मुंबईत अवैध पेट्रोल बाईक टॅक्सीवर कडक कारवाई; रॅपिडो-ओला-उबरचा परवाना तात्पुरता रद्द
मुंबईत अवैध पेट्रोल बाईक टॅक्सीवर कडक कारवाई; रॅपिडो-ओला-उबरचा परवाना तात्पुरता रद्द
Embed widget