Vijay Babu Case : अभिनेता विजय बाबूवर लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल; महिलेने केला गंभीर आरोप
एका महिलेने विजय बाबू(Vijay Babu)च्या विरोधात पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे.
Vijay Babu Case : मल्याळम चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता आणि चित्रपट निर्माता असलेल्या विजय बाबूवर (Vijay Babu) बलात्काराचा गुन्हा दाखल झाला आहे. विजय बाबूवर असा आरोप करण्यात आला आहे की, त्यानं एका महिलेला चित्रपटामध्ये काम देण्याचे आमिष दाखवले आणि तिच्याबरोबर शारीरिक संबंध ठेवले. एका वृत्तसंस्थेनं दिलेल्या माहितीनुसार, कोझिकोड (Kozhikode) येथील रहिवासी असलेल्या एका महिलेने विजय बाबूच्या विरोधात पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे.
विजय बाबूविरोधात तक्रार करणाऱ्या महिलेनं दिलेल्या माहितीनुसार, विजय बाबूनं तिला चित्रपटामध्ये काम देण्याचे आमिष दाखवले आणि त्यानंतर एका फ्लॅटमध्ये बोलवून तिचे शारीरिक शोषण केले. या माहिलेने 22 एप्रिल रोजी विजय बाबूच्या विरोधात तक्रार दाखल केली. तक्रार नोंदवून पाच दिवस झाले तरी पोलिसांनी अजून विजय बाबूची चौकशी केली नसल्याचाही आरोप त्या महिलेनं केला आहे.
अनेक हिट चित्रपटांमध्ये विजय बाबूनं केलं काम
विजय बाबूनं मल्याळम भाषेतील अनेक हिट चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्याचा चाहता वर्ग देखील मोठा आहे. त्याच्या चित्रपटांना प्रेक्षकांची पसंती मिळते. त्याची फ्रायडे (Friday Film House) फिल्म नावाचे प्रोडक्शन हाऊस देखील आहे. या प्रोडक्शन हाऊसचा महेश बाबू हा संस्थापक आहे. काही दिवसांपूर्वी विजय बाबूनं या प्रोडक्शन हाऊसच्या नव्या चित्रपटाची घोषणा देखील केली होती.
महत्वाच्या बातम्या :
- Siddhant Chaurvedi : सिद्धांत चतुर्वेदीनं शेअर केला शर्टलेस फोटो; बिग बींच्या नातीच्या रिअॅक्शननं वेधलं लक्ष
- Soorarai Pottru Remake : ‘सुरराई पोटरू’ रिमेकच्या चित्रीकरणाला सुरुवात, अक्षय कुमारने शेअर केला खास व्हिडीओ
- Bhool Bhulaiyaa 2 Trailer : 'मोंजोलिका परत आलीये...'; 'भूल भुलैया 2' चा धमाकेदार ट्रेलर रिलीज
- Deepika Padukone : 75 व्या कान्स फिल्म फेस्टिव्हलच्या ज्युरी मेंबर्सच्या यादीत दीपिकाचं नाव; पोस्ट शेअर करत चाहत्यांना दिली माहिती