एक्स्प्लोर
Advertisement
65 वर्षांवरील कलाकार व क्रू सदस्यांना चित्रीकरणास परवानगी : अमित देशमुख
आवश्यक काळजी घेऊन 65 वर्षांवरील कलाकार व क्रू सदस्यांना चित्रीकरणास परवानगी देण्यात आल्याची माहिती सांस्कृतिक कार्य मंत्री अमित विलासराव देशमुख यांनी दिली.
मुंबई : ज्येष्ठ कलाकार आणि त्यांच्या चाहत्यासांठी आनंदाची बातमी आहे. चित्रपट, दूरचित्रवाणी मालिका, ओटीटी उद्योग यांच्याशी संलग्न असलेल्या 65 वर्षांवरील कलाकार/क्रू सदस्यांना कोवीड-19 च्या पार्श्वभूमीवर आवश्यक ती पूर्ण काळजी घेऊन चित्रीकरण करण्यास परवानगी देण्यात येत असल्याची माहिती सांस्कृतिक कार्य मंत्री अमित विलासराव देशमुख यांनी दिली.
'राजा गणपती'.. शंकर महादेवन, हेमा मालिनी, तनिष्क बागची यांची गणेश भक्तांसाठी भेट
कोविड-19 पार्श्वभूमीवर बंद असलेली चित्रपट, दूरचित्रवाणी मालिका/ओटीटी यांच्या चित्रिकरणाची कामे, नियंत्रित स्वरुपात पुन्हा सुरु करण्याकरीता; मार्गदर्शक सूचना, शासन निर्णय 30 मे 2020 व दिनांक 23 जून 2020 अन्वये निर्गमित करण्यात आलेल्या होत्या. या सूचनांमध्ये, 65 वर्षावरील कोणत्याही कलाकार/क्रू सदस्यांना चित्रीकरण स्थळावर परवानगी दिली जाणार नाही, अशी अट ठेवण्यात आली होती.
CBI Investigation in SSR Death Case: सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर सुशांतच्या कुटुबियांची पहिली प्रतिक्रिया...
उच्च न्यायालाने सदरील अट रद्द करण्याचा निर्णय दिल्याने, आता 65 वर्षांवरील कलाकार व क्रू सदस्यांना चित्रीकरणात सहभागी होण्याची मुभा राहील अशी माहितीही देशमुख यांनी दिली आहे. या निर्णयामुळे चित्रपट, दूरचित्रवाणी मालिका/ओटीटी उद्योग या क्षेत्रातील ज्येष्ठ कलाकार व तंत्रज्ञ यांना प्रोत्साहन मिळेल अशी अपेक्षा, सांस्कृतिक कार्य विभागाचे मंत्री अमित देशमुख यांनी व्यक्त केली आहे.
उच्च न्यायालयाचा हिरवा कंदिल
ज्येष्ठ कलाकारांना टिव्ही मालिका आणि इतर शूटसाठी सेटवर येण्यावर घातलेली बंदी रद्द करत हायकोर्टानं यासकलाकारांना मोठा दिलासा दिला. अनलॉक 3 साठी जेव्हा नवी नियमावली जाहीर होईल तेव्हा कदाचित हे चित्र बदलेल अशी ग्वाही राज्य सरकारनं दिली होती. मात्र, प्रत्यक्षात तसं काही झालं नाही. त्यामुळे शुक्रवारी मुंबई उच्च न्यायालयानं यासंदर्भात आपला राखून ठेवलेला निकाल जाहीर करत राज्य सरकारचा आदेश अखेर रद्द केला. जेष्ठ नागरीकांसाठीचे नियम हे सध्याच्या परिस्थितीत त्यांच्या हितासाठीच तयार केलेले आहेत. कोरोनाच्या काळात जर ही मंडळी थोडे दिवस सक्तीनं घरी बसले तर ते त्यांच्या आरोग्यसाठी लाभदायक आहे, असं स्पष्टीकरण राज्य सरकारच्यावतीनं हायकोर्टात देण्यात आलं होतं. मात्र राज्य सरकारचे हे नियम जाचक असल्याचा दावा याचिकाकर्त्यांच्यावतीनं करण्यात आला. हायकोर्टानं दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर याचिकाकर्त्यांच्याबाजूनं आपला निकाल जाहीर केला.
CBI Probe in SSR Case | सुशांत सिंह राजपूत प्रकरणाचा तपास सीबीआय करणार
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
सांगली
निवडणूक
Advertisement