एक्स्प्लोर

Jab We Met चा सिक्वेल येतोय? इम्तियाज अलींनी गीत आणि आदित्य म्हणून सांगितली 'या' एक्टर्सची नावं

दिग्दर्शकाने आपल्या नव्या चित्रपटाची घोषणा देखील केली आहे. या चित्रपटाला ए. आर. रहमान यांचं संगीत लाभणार असून मुख्य भूमिकेत दिलजीत दोसांझ दिसणार आहे.

Jab We Met Sequel: 2007 मध्ये प्रदर्शित झालेला 'जब वी मेट' हा चित्रपट आजही प्रेक्षकांच्या मनात ताजा आहे. दिग्दर्शक इम्तियाज अली यांच्या या रोमँटिक फिल्ममध्ये करीना कपूर आणि शाहिद कपूर यांनी साकारलेले गीत-आदित्य हे पात्र प्रचंड गाजले होते. चित्रपटातील गाणीही तितकीच लोकप्रिय ठरली. त्यामुळे या चित्रपटाच्या सिक्वेलबाबत चर्चा रंगणे स्वाभाविक मानले जात आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत इम्तियाज अली यांनी जब वी मेटच्या आधुनिक आवृत्तीत गीत आणि आदित्य कोण असतील असा प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर इम्तियाज अली यांनी उत्तर दिलं आहे. 

'जब वी मेट'मध्ये कोण असतील गीत आणि आदित्य?

अलीकडे एका मुलाखतीदरम्यान इम्तियाज अली यांना ‘जब वी मेट’च्या आधुनिक आवृत्तीत कोणती स्टारकास्ट पाहायला आवडेल, असा प्रश्न विचारण्यात आला. यावर त्यांनी आश्चर्यचकित करणारे उत्तर दिले. ते म्हणाले की, “आजच्या काळात मला वाटतं शरवरी वाघ आणि वेदांग रैना हे हे रोल उत्तमरीत्या साकारू शकतात. ते तरुण आहेत आणि या भूमिकांसाठी योग्य प्रतिभा त्यांच्यात आहे.” विशेष म्हणजे शरवरी आणि वेदांग हे दोघेही त्यांच्या आगामी प्रोजेक्टचा भाग आहेत. पण याबाबत कोणतही अधिकृत वक्तव्य केलेले नाही. पण जब वी मेट या चित्रपटाचा सिक्वल यावा अशी चाहत्यांची इच्छा आहे. यापूर्वीही इम्तियाज यांनी गीत-आदित्यच्या भविष्याबाबत विनोदी प्रतिक्रिया दिली होती. एका कार्यक्रमात त्यांनी मिश्कीलपणे म्हटलं होतं की, “दोघे कदाचित घटस्फोटासाठी वकिलांच्या ऑफिसमध्ये असतील.”

दरम्यान, दिग्दर्शकाने आपल्या नव्या चित्रपटाची घोषणा देखील केली आहे. या चित्रपटाला ए. आर. रहमान यांचं संगीत लाभणार असून मुख्य भूमिकेत दिलजीत दोसांझ दिसणार आहे. तसेच नसीरुद्दीन शाह, वेदांग रैना आणि शरवरी वाघही या प्रोजेक्टमध्ये झळकणार आहेत. मात्र चित्रपटाचे शीर्षक अद्याप जाहीर करण्यात आलेले नाही.

‘जब वी मेट’चा तमिळ-तेलुगू अवतारही

इम्तियाज अली दिग्दर्शित ‘जब वी मेट’ हा चित्रपट 2007 मधील सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांपैकी एक ठरला होता. प्रेक्षकांच्या प्रचंड प्रतिसादानंतर या चित्रपटाचे तमिळ आणि तेलुगू भाषांमध्येही रूपांतर करण्यात आले होते. आजही ‘गीत’ आणि ‘आदित्य’ची प्रेमकहाणी चाहत्यांच्या मनात ताजी आहे.

या चित्रपटादरम्यान अभिनेता शाहिद कपूर आणि करीना कपूर यांच्या नात्याची ही चर्चा झाली. शाहिद आणि करीना यांच्या नात्याबद्दल बोलायचे झाल्यास, दोघांनी 2004 मध्ये एकमेकांना डेट करायला सुरुवात केली होती. मात्र, 2007 मध्ये त्यांचे अचानक ब्रेकअप झाले. तरीही आज दोघेही व्यावसायिक आयुष्यात पुढे जात आपापल्या कामात व्यस्त आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

4000 कोटींच्या 'रामायण'मध्ये इतकी मॉर्डन 'शूर्पणखा'! ट्रोलिंगदरम्यान रकुल प्रीत सिंहचं उत्तर; म्हणाली..
4000 कोटींच्या 'रामायण'मध्ये इतकी मॉर्डन 'शूर्पणखा'! ट्रोलिंगदरम्यान रकुल प्रीत सिंहचं उत्तर; म्हणाली..
Salman Khan on Jail Days: सलमान खानने कैद्यांसोबत कसे दिवस घालवले? 50-70 लोक, एकच बाथरुम अन् कमोडमध्ये पाल, तुरुंगातील किस्सा
सलमान खानने कैद्यांसोबत कसे दिवस घालवले? 50-70 लोक, एकच बाथरुम अन् कमोडमध्ये पाल, तुरुंगातील किस्सा
Sonalee Kulkarni brother Marriage: अभिनेत्री सोनाली कुलकर्णीच्या घरात सनई चौघड्याचे सूर घुमले; अतुल कुलकर्णी विवाहबंधनात अडकला
अभिनेत्री सोनाली कुलकर्णीच्या घरात सनई चौघड्याचे सूर घुमले; अतुल कुलकर्णी विवाहबंधनात अडकला
हिंदू मुली मुस्लिमांच्या संपर्कात आल्या की कट्टर डाव्या होतात... कंगना रनौतचा video व्हायरल; नेमकं काय म्हणाली?
हिंदू मुली मुस्लिमांच्या संपर्कात आल्या की कट्टर डाव्या होतात... कंगना रनौतचा video व्हायरल; नेमकं काय म्हणाली?

व्हिडीओ

Abhijeet Dipke On Narendra Modi : मोदींची डिग्री खरी असावी.. अभिजीत दिपके थेटच बोलले..
Sanjay Raut PC : संघामध्ये मोदी-शाहांनी आपले चमचे पेरले आहेत,संजय राऊतांचा हल्लाबोल
Balasaheb Fadnavis On Devendra Fadnavis: माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; देवेंद्र फडणवीसांच्या काकांना विश्वास, नेमकं काय म्हणाले?
Special Report on Palghar : खड्ड्यांत महामार्ग, धोक्यात प्रवास, मनोर-भिवंडी मार्ग मृत्यूचा प्रवास | ABP Majha
Maharashtra Freedom Conversion Act : धर्मांतरावर बंधन, कायद्याचं संरक्षण, विरोधकांचं आक्षेप का?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rahul Gandhi : जॉब नहीं मिलेगा, तो सिंहासन हिलेगा। प्रशांत किशोरांचा भाजपवर विजय, राहुल गांधींचे ट्विट चर्चेत
जॉब नहीं मिलेगा, तो सिंहासन हिलेगा। प्रशांत किशोरांचा भाजपवर विजय, राहुल गांधींचे ट्विट चर्चेत
पुण्यातील चाकण MIDC मध्ये रस्त्यांचा आणखी एक बळी, चिखलात दुचाकी फसली; अपघातात महिला जागीच ठार
पुण्यातील चाकण MIDC मध्ये रस्त्यांचा आणखी एक बळी, चिखलात दुचाकी फसली; अपघातात महिला जागीच ठार
बिहारमध्ये भाजपचा राष्ट्रीय अध्यक्षांच्या मतदारसंघात दारुण पराभव; पृथ्वीराज चव्हाणांनी सांगितलं राज'कारण', पहिली प्रतिक्रिया
बिहारमध्ये भाजपचा राष्ट्रीय अध्यक्षांच्या मतदारसंघात दारुण पराभव; पृथ्वीराज चव्हाणांनी सांगितलं राज'कारण', पहिली प्रतिक्रिया
Nifty 50 : निफ्टी 50 पाच महिन्यांच्या उच्चांकावर पोहोचला, सेन्सेक्स वधारला, शेअर बाजारातील तेजीचं कारण काय?
निफ्टी 50 पाच महिन्यांच्या उच्चांकावर पोहोचला, सेन्सेक्स वधारला, शेअर बाजारातील तेजीचं कारण काय?
Prashant Kishor : बांकीपूरमध्ये प्रशांत किशोर जिंकत आहेत म्हणजेच भाजप जिंकतंय, लालू प्रसाद यादव यांची लेक मीसा भारती यांचा दावा
जनतेला सत्य माहिती नाही, प्रशांत किशोर हेच भाजपचे उमेदवार, लालू प्रसाद यादव यांची कन्या मीसा भारतींचा दावा
'फक्त आमदारकीची नाही, तर भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाला संदेश देणारी निवडणूक..' थेट भाजप अध्यक्षांच्या बालेकिल्ल्याला भगदाड पाडताच बांकीपूरचे बाॅस प्रशांत किशोर काय काय म्हणाले?
'फक्त आमदारकीची नाही, तर भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाला संदेश देणारी निवडणूक..' थेट भाजप अध्यक्षांच्या बालेकिल्ल्याला भगदाड पाडताच बांकीपूरचे बाॅस प्रशांत किशोर काय काय म्हणाले?
दोन वर्षांपूर्वी लग्न, 2 जुळ्या मुली; ठाण्यातील मृत TDRF जवानाच्या कुटुंबीयांचा आक्रोश, ठाणे महापौरांकडून आश्वासन
दोन वर्षांपूर्वी लग्न, 2 जुळ्या मुली; ठाण्यातील मृत TDRF जवानाच्या कुटुंबीयांचा आक्रोश, ठाणे महापौरांकडून आश्वासन
मुंबईच्या SRA कार्यालयातील भेटीनंतर रोहित पवार ब्रीच कँडी रुग्णालयात; त्रास जाणवू लागल्याने उपचारासाठी दाखल
मुंबईच्या SRA कार्यालयातील भेटीनंतर रोहित पवार ब्रीच कँडी रुग्णालयात; त्रास जाणवू लागल्याने उपचारासाठी दाखल
Embed widget