एक्स्प्लोर

'राजा गणपती'.. शंकर महादेवन, हेमा मालिनी, तनिष्क बागची यांची गणेश भक्तांसाठी भेट

लालबागचा राजा यांच्या सहकार्याने टाइम्स म्युझिकने आपला 'राजा गणपती' हा नवीन अल्बम सादर केला आहे. यामध्ये शंकर महादेवन, हेमा मालिनी, तनिष्क बागची यांच्यासह अनेक प्रसिद्ध गायकांचा समावेश आहे.

मुंबई : गणेशभक्तांसाठी एक आनंदाची बातमी आली आहे. लालबागचा राजा यांच्या सहकार्याने टाइम्स म्युझिकने आपला 'राजा गणपती' हा नवीन अल्बम सादर केला आहे. भारतातील लोकप्रिय कलाकार, गायक आणि संगीतकारांद्वारे 10 ट्रॅकचा हा एक खजिना आहे. 'सुखकर्ता दुःखहर्ता, शेंदूर लाल चढायो, जय गणेश देवा, दुर्गे दुर्घट भारी, घालीन लोटांगण, पायी हळू हळू चाला, बाप्पा मोरया रे, प्राणम्य शिरसा देवं, वक्रतुंड महाकाय, वातापी गणपती', अशा लोकप्रिय आणि पारंपारिक आरत्या, भजन, श्लोक आणि स्तोत्रे ह्या अल्बममधे आहेत. दिपेश वर्मा यांनी ह्या अल्बम मधील गाण्यांना संगिताने सजविले आहे. अमित पाध्ये यांनी हेमा मालिनी यांनी गायलेल्या स्तोत्राचे संगीत दिले आहे. लालबागच्या राजाला समर्पित राजा गणपती हे गाणे तनिष्क बागची यांनी संगीतबद्ध केले आहे. टाइम्स म्युझिकने दाक्षिणात्य भक्तांसाठीसुद्धा भव्य ऑनलाईन सेलिब्रेशनची निर्मिती केली आहे. ज्यात के विजय प्रकाश, बॉम्बे जयश्री, सुधा रघुनाथन, श्रीनिवास अशा प्रतिथयश गायकांनी आपली कला सादर केली आहे. "यावर्षी, गणेश चतुर्थीसाठी, टाइम्स म्युझिकने लालबागचा राजा गणेशोत्सव मंडळासमवेत आरती, स्तोत्रे, मंत्र आणि गाण्यांसह हा उत्सव ऑनलाईन केला आहे. पारंपरिक आणि नव्याची सांगड घालून घरोघरी हा उत्सव दिमाखात साजरा व्हावा ह्यासाठी बॉलीवूडचे गायक आरत्यांसह आपल्या भेटीस आणण्याचे टाईम्स म्युझिकचे उद्दीष्ट आहे. 10 दिवसांचा हा सोहळा लक्षात घेऊन 10 गाण्यांची निर्मिती करण्यात आली आहे " असे टाइम्स म्युझिकचे मंदार ठाकूर म्हणाले. "अशा नामांकित गायकांसह आरती, प्रार्थना आणि स्तोत्रे यांचा अल्बम तयार करण्याचा अनुभव अद्भुत होता." असे संगीतकार आणि संगीत निर्माता दिपेश वर्मा म्हणाले. आपल्या 'जय गणेश देव आरती' या ट्रॅकबद्दल बोलताना गायक अंकित तिवारी म्हणाले की, "मी प्रथमच आरती गात आहे. लोकांना ती आवडेल अशी अशा करतो ." "यावर्षी गणपती उत्सव घरच्याघरी साजरा करणार आहोत आणि आम्ही गायलेल्या व दिपेश वर्मा यांनी संगीतबद्ध केलेल्या या आरत्या आणि गाणी यावर्षी आपण सर्व आपापल्या घरी गाऊयात. " असे विशाल आणि शेखर या जोडीने सांगितले. "यावर्षी सर्व सण वेगळ्या पद्धतीने साजरे केले जातील, बाप्पा माझ्या घरी दरवर्षी येतात, मी माझ्या कुटुंबासमवेत हा उत्सव साजरा करतो. लालबाग राजासाठी गाताना मी स्वतःला खूप भाग्यवान समजतो. सिद्धार्थ आणि शिवम ह्या माझ्या मुलांसमवेत गाण्याची मजा काही औरच होती. ," असे गायक, संगीतकार आणि कलाकार शंकर महादेवन म्हणाले. मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यावर भाष्य करण्याची रियाची लायकी नाही : बिहारचे पोलीस महासंचालक "सुखकर्ता आणि शेंदूर लाल चढायो' या गाण्यावर काम करणे हा एक अविस्मरणीय अनुभव होता. यावर्षी गणेश चतुर्थी साजरी करणे खूप वेगळे असेल. परंतु, ह्या आरत्या श्रोत्यांना भक्तीतून ऊर्जा देईल अशी आशा आहे. , "असे गायिका नीती मोहन म्हणाली. त्यांच्या 'सुखकर्ता दुखार्ता' या ट्रॅकबद्दल बोलताना मीत ब्रॉस म्हणाले, "सुखकर्ता दुःखहर्ता ही आरती मराठीत म्हटली जाते. हिंदीभाषिकही मराठीतच ही आरती गातात पण त्याचा अर्थ त्यांना कळत नाही म्हणून प्रथमच ही आरती हिंदी मध्ये येत आहे आणि ती गाण्याची संधी आम्हाला मिळाली ह्या बद्दल आम्ही कृतज्ञ आहोत. " पहिल्यांदा आपल्या मुली ईशा आणि अहानाबरोबर गाण्याविषयी ज्येष्ठ अभिनेत्री हेमा मालिनी म्हणाल्या, "तिघींनी मिळून आम्ही नृत्याचे कार्यक्रम केले आहेत. परंतु, पहिल्यांदाच आम्ही तिघी एकत्र गात आहोत, प्प्रणम्य शिरसा देवं हे सुंदर स्तोत्रम मी गायले आहे. ईशा आणि अहाना यांनी वक्रतुंड महाकाय ही प्रार्थना सुंदर गायली आहे. आशा आहे की आपणा सर्वांना ती आवडेल आणि गणेश उत्सवाच्या वेळी आणि इतर वेळीही हे स्तोत्र व प्रार्थना तुम्ही ऐकाल" असीस कौर, दीदार कौर, आणि देव नेगी यांच्याबरोबर काम करण्याबद्दल संगीतकार तनिष्क बागची म्हणाले, "आम्ही एकत्र एका अद्भुत सेलिब्रेशन ट्रॅकवर काम केले. असीस आणि दीदार एक प्रतिभावान गायक बहिणी आहेत आणि देव नेगी यांचा आवाज गाण्याचे सार आहे. या वर्षी आपण आणूया बाप्पाला घरी जा आणि त्याचे आशीर्वाद मिळवा. जेव्हा तुम्हाला राजा गणपती आठवेल तेव्हा ते वाजवा.” बिहार पोलिसांना मिळालेल्या वागणुकीनंतर सीबीआय सावध; मुंबई उपविभागीय कार्यालयात कोरोना चाचणी सुरु
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

कारमध्ये गॅस भरताना भीषण स्फोट, ओमिनी जळून खाक; 4 जण जखमी, रुग्णालयात दाखल
कारमध्ये गॅस भरताना भीषण स्फोट, ओमिनी जळून खाक; 4 जण जखमी, रुग्णालयात दाखल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 नोव्हेंबर 2024 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 नोव्हेंबर 2024 | मंगळवार
मिलिंद देवरांचा अर्ज भरताना शोभायात्रेतील सहभागी लोकांना 500 रुपये देऊन आणल्याचा आरोप, ठाकरेंच्या शिवसेनेची निवडणूक आयोगाकडे तक्रार 
मनसेनंतर ठाकरेंच्या शिवसेनेच्या निशाण्यावर मिलिंद देवरा, निवडणूक आयोगाकडे आचारसंहिता भंगाची तक्रार, काय घडलं?
''कोणत्या वस्तीवर कोणतं कुत्र भुंकतं अन् कोणतं गप्प बसतं हे सुद्धा सांगू शकतो''; शहाजी बापूंविरुद्ध ठोकला शड्डू
''कोणत्या वस्तीवर कोणतं कुत्र भुंकतं अन् कोणतं गप्प बसतं हे सुद्धा सांगू शकतो''; शहाजी बापूंविरुद्ध ठोकला शड्डू
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Bhau Kadam : अभिनेते भाऊ कदम राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे स्टार प्रचारकABP Majha Headlines :  3 PM : 05 November 2024 : एबीपी माझा हेडलाईन्स : ABP MajhaABP Majha Marathi News Headlines 2PM TOP Headlines 2 PM 05 November 2024Uddhav Thackeray Radhanagri Speech : शिवरायांचं मंदिर ते मुलांना मोफत शिक्षण; ठाकरेंची मोठी आश्वासनं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
कारमध्ये गॅस भरताना भीषण स्फोट, ओमिनी जळून खाक; 4 जण जखमी, रुग्णालयात दाखल
कारमध्ये गॅस भरताना भीषण स्फोट, ओमिनी जळून खाक; 4 जण जखमी, रुग्णालयात दाखल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 नोव्हेंबर 2024 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 नोव्हेंबर 2024 | मंगळवार
मिलिंद देवरांचा अर्ज भरताना शोभायात्रेतील सहभागी लोकांना 500 रुपये देऊन आणल्याचा आरोप, ठाकरेंच्या शिवसेनेची निवडणूक आयोगाकडे तक्रार 
मनसेनंतर ठाकरेंच्या शिवसेनेच्या निशाण्यावर मिलिंद देवरा, निवडणूक आयोगाकडे आचारसंहिता भंगाची तक्रार, काय घडलं?
''कोणत्या वस्तीवर कोणतं कुत्र भुंकतं अन् कोणतं गप्प बसतं हे सुद्धा सांगू शकतो''; शहाजी बापूंविरुद्ध ठोकला शड्डू
''कोणत्या वस्तीवर कोणतं कुत्र भुंकतं अन् कोणतं गप्प बसतं हे सुद्धा सांगू शकतो''; शहाजी बापूंविरुद्ध ठोकला शड्डू
Nashik Assembly Election : नाशिक जिल्ह्यातील विधानसभा लढती, कोण-कोण भिडणार? 15 विधानसभा मतदारसंघातील चित्र स्पष्ट!
नाशिक जिल्ह्यातील विधानसभा लढती, कोण-कोण भिडणार? 15 विधानसभा मतदारसंघातील चित्र स्पष्ट!
पुण्यात आरपीआय आठवले गटाला खिंडार! राजीनामा दिलेल्या माजी उपमहापौरांची महायुतीविरोधी भूमिका, मतदान न करण्याची दिली शपथ
पुण्यात आरपीआय आठवले गटाला खिंडार! राजीनामा दिलेल्या माजी उपमहापौरांची महायुतीविरोधी भूमिका, मतदान न करण्याची दिली शपथ
विधानसभेतही 'सांगली पॅटर्न',  अपक्ष उमेदवार जयश्री पाटलांना निवडून देण्याचं विशाल पाटलांचं आवाहन
विधानसभेतही 'सांगली पॅटर्न',  अपक्ष उमेदवार जयश्री पाटलांना निवडून देण्याचं विशाल पाटलांचं आवाहन
Solapur Assembly Election : सोलापूर जिल्ह्यातील विधानसभा लढती, कोण-कोण भिडणार? 11 विधानसभा मतदारसंघातील चित्र स्पष्ट!
Solapur Assembly Election : सोलापूर जिल्ह्यातील विधानसभा लढती, कोण-कोण भिडणार? 11 विधानसभा मतदारसंघातील चित्र स्पष्ट!
Embed widget