Bappi Lahiri : 'या' आजारामुळे बप्पी लाहिरी यांचे निधन, तुम्हालाही 'ही' लक्षणे असतील तर सावधान!
Bappi Lahiri : बप्पी लाहिरी यांचा मृत्यू ऑब्स्ट्रक्टिव्ह स्लीप एपनिया (Obstructive Sleep Apnea) नावाच्या आजाराने झाला. ते गेल्या बऱ्याच दिवसांपासून या आजाराचा सामना करत होते.
![Bappi Lahiri : 'या' आजारामुळे बप्पी लाहिरी यांचे निधन, तुम्हालाही 'ही' लक्षणे असतील तर सावधान! Know about Obstructive Sleep Apnea which cause death of Bappi Lahiri Bappi Lahiri : 'या' आजारामुळे बप्पी लाहिरी यांचे निधन, तुम्हालाही 'ही' लक्षणे असतील तर सावधान!](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/02/16/1432a86d504f49e2ac04e786d5185609_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Bappi Lahiri Passes Away: प्रसिद्ध संगीत दिग्दर्शक बप्पी लाहिरी (Bappi Lahiri) यांचे मंगळवारी रात्री निधन झाले. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार त्यांचा मृत्यू ऑब्स्ट्रक्टिव्ह स्लीप एपनिया (Obstructive Sleep Apnea) नावाच्या आजाराने झाला. ते गेल्या बऱ्याच दिवसांपासून या आजाराचा सामना करत होते. कदाचित तुमच्यापैकी अनेकांनी या आजाराचे नाव पहिल्यांदाच ऐकले असेल. हा आजार काय आहे, त्याची लक्षणे काय आहेत आणि तो कसा टाळावा, हे जाणून घेऊया.
‘ऑब्स्ट्रक्टिव्ह स्लीप एपनिया’ म्हणजे काय?
तज्ज्ञांच्या मते, ‘ऑब्स्ट्रक्टिव्ह स्लीप एपनिया’ हा किरकोळ, परंतु अत्यंत गंभीर आजार आहे. याचा त्रास होत असलेल्या रुग्णाला, रात्री झोपताना नाकातील हवेचा प्रवाह कमी होतो. त्यामागील कारण म्हणजे यामध्ये तोंड आणि नाकाच्या वरच्या भागात हवा भरते. यामुळे तुमची श्वासनलिका लहान होते किंवा ती बंद होते. यामुळे श्वास घेण्यास त्रास होतो. या समस्येने त्रस्त रुग्णाचा श्वास झोपेत असताना अचानक थांबतो आणि त्याला कळतही नाही. काही लोकांना अधूनमधून श्वसनाचा त्रास देखील होतो.
का होतो ‘हा’ आजार?
तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, झोपेत आणि श्वसनात अडथळा आणणारा स्लीप एपनिया होण्याचे सर्वात मोठे कारण म्हणजे खराब दिनचर्या. आजच्या काळात लोक कोणतेही आणि केव्हाही अन्न खातात. ते त्यांच्या जीवनशैलीकडेही लक्ष देत नाहीत. या सर्वांमुळेच ही समस्या उद्भवते आहे. याशिवाय अतिरिक्त लठ्ठपणा हे देखील या आजाराचे कारण बनू शकते.
‘या’ लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका!
जर, तुम्हाला हा आजार टाळायचा असेल तर, त्याच्या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका. तुम्ही आधीच सावध राहून हा आजार टाळू शकता.
* तुम्हाला वारंवार घोरण्याची समस्या असेल, तर तुम्ही काळजी घेणे आवश्यक आहे. यासाठी एकदा चेकअप करून घ्या.
* रात्री अस्वस्थ वाटणे किंवा श्वास घेण्यास त्रास होणे.
* दिवसा जास्त झोप येणे आणि आळस-सुस्ती जाणवणे.
कसा कराल स्वतःचा बचाव?
जर तुम्हाला या आजारापासून स्वतःला सुरक्षित ठेवायचे असेल, तर तुम्ही काही गोष्टींकडे काटेकोरपणे लक्ष दिले पाहिजे.
* आपल्या आहाराकडे लक्ष द्या. बाहेरील खाद्यपदार्थ जास्त खाऊ नका.
* दिनचर्या सुधारा.
* वजन जास्त असल्यास त्यावर नियंत्रण ठेवा.
* स्वतःला सक्रिय ठेवा, अधिकाधिक योगासने करा
* सकाळी व्यायाम करा.
हेही वाचा :
- PM Modi on Bappi Lahiri : 'जिंदादिल बप्पी लाहिरींच्या निधनानं दु:खी झालोय'; आठवण शेअर करत पंतप्रधान मोदींच्या भावना
- PHOTO : 'सोन्या'सारखा माणूस गेला! अलोकेश लाहिरी ते लाडके 'बप्पीदा'; जीवनप्रवास कसा होता?
- Remembering Bappi Lahiri : बप्पी लाहिरी यांचं निधन; मुंबईत घेतला अखेरचा श्वास
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha
Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)