(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Remembering Bappi Lahiri : बप्पी लाहिरी यांचं निधन; मुंबईत घेतला अखेरचा श्वास
जुहू येथील क्रिटी केअर हॉस्पिटमध्ये बप्पी लाहिरी यांनी अखेरचा श्वास घेतला.
LIVE
Background
Remembering Bappi Lahiri: जवळपास पाच दशके आपल्या संगीत आणि आवाजाने बॉलिवूडवर छाप सोडणारे ज्येष्ठ संगीतकार बप्पी लाहिरी (वय 70) यांचे निधन झाले. मागील काही दिवसांपासून मुंबईतील रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. आलोकेश लाहिरी असे बप्पी यांचे मूळ नाव होते. बाप्पी यांनी संगीतबद्ध केलेली अनेक गाणी लोकप्रिय ठरली आहेत. त्यांच्या निधनाने चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे.
जुहू येथील क्रिटी केअर हॉस्पिटमध्ये बप्पी लाहिरी यांनी अखेरचा श्वास घेतला. तम्मा तम्मा लोगे, डिस्को डान्सर, याद आ रहा है तेरा प्यार ही सुपर हिट गाणी बप्पी लाहरी यांनी गायली आहेत. त्यांचा जन्म 27 नोव्हेंबर 1952 रोजी पश्चिम बंगालमधील जलपाईगुडी येथे झाला. तरुणाईला डिस्को डान्सवर थिरकायला लावणारे बप्पी लाहिरी हे आपल्या वेगळ्या शैलीसाठी प्रसिद्ध होते. आपल्या हटक्या शैलीनं त्यांनी बॉलीवूड आणि संगीत क्षेत्रात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. 1973 साली त्यांनी नन्हा शिकारी या चित्रपटापासून बॉलिवुडमधील करीअरला सुरुवात केली.
1973 मध्ये 'नन्हा शिकारी' या चित्रपटातून संगीतकार म्हणून पदापर्ण केलेल्या बप्पी लाहिरी यांनी हिंदी चित्रपटसृष्टीत आपल्या हटक्या संगीताने छाप सोडली. ऐंशी-नव्वदीच्या दशकात त्यांनी संगीतबद्ध केलेल्या गीतांना तरुणाईला वेड लावले होते. त्यांचा चाहता वर्ग मोठा आहे. बप्पी लाहिरी यांच्या गाण्यांना त्यांच्या चाहत्यांची पसंती मिळत होती.
Obstructive Sleep Apnea (OSA) आणि चेस्ट कंजेशन या आजारामुळे बप्पी लेहरी यांचे निधन झाले. OSA या आजारामुळे श्वास घेण्यास त्रास होतो. गेली 29 दिवस बप्पी लाहिरी हे हॉस्पिटलमध्ये उपचार घेत होते. सोमवारी त्यांना डिस्चार्ज देखील देण्यात आला होता. पण घरी आल्यानंतर त्यांनी प्रकृती पुन्हा बिघडली. त्यामुळे त्यांना पुन्हा रूग्णालयात दाखल करावं लागलं. बप्पी लाहिरी यांनी डिस्को डान्सर, हिम्मतवाला, शराबी, अॅडव्हेंचर्स ऑफ टारझन, डान्स डान्स, सत्यमेव जयते शोला और शबनम यासारख्या चित्रपटांमधी गाणी संगीतबद्ध केली आहेत.
ज्येष्ठ संगीतकार, गायक बप्पी लहरी यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांची श्रद्धांजली
मुंबई, :- ज्येष्ठ संगीतकार, गायक बप्पी लहरी यांच्या निधनाबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दु:ख व्यक्त केले असून भारतीय शास्त्रीय संगीताचा समृद्ध वारसा लाभलेला, भारतीय चित्रपटांना ‘डिस्को’ संगीताची ओळख करुन देणारा, उडत्या चालीच्या गाण्यांनी तरुणाईला मंत्रमुग्ध करणारा, चार दशकांहून अधिक काळ चित्रपट रसिकांच्या मनावर अधिराज्य करणारा लोकप्रिय कलावंत आज काळाच्या पडद्याआड गेला आहे. भारतीय चित्रपट व संगीत रसिकांना त्यांची उणीव जाणवत राहील, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बप्पी लहरी यांना श्रद्धांजली वाहिली आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार आपल्या शोकसंदेशात म्हणतात की, शास्त्रीय संगीताचा कौटुंबिक वारसा लाभलेल्या बप्पी लहरींचं संपूर्ण जीवन संगीतमय होतं. नया कदम, वारदात, डिस्को डांसर, हथकड़ी, नमक हलाल, मास्टरजी, डांस डांस, हिम्मतवाला, जस्टिस चौधरी, तोहफा, मकसद, सैलाब, द डर्टी पिक्चर सारख्या चित्रपटांच्या यशात बप्पी लहरींच्या संगीताचं मोठं योगदान आहे. बप्पी लहरींनी गायलेली गाणी आणि दिलेल्या संगीतांनं तरुण पिढीला कायम मनमुराद आनंद दिला. त्यांचं संगीत हा भारतीय चित्रपटविश्वाचा अमूल्य ठेवा आहे. त्यांचं निधन ही भारतीय चित्रपट व संगीत क्षेत्राची मोठी हानी आहे. बप्पी लहरींची गाणी, त्यांचं संगीत, ‘सोनेरी’ अस्तित्वं कायम चित्रपटरसिकांच्या स्मरणात राहील, अशा शब्दात उपमुख्यमंत्र्यांनी त्यांचं स्मरण करुन श्रद्धांजली वाहिली.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची ज्येष्ठ गायक, संगीतकार बप्पी लहरी यांना श्रद्धांजली
मुंबई सहज सोप्या, उडत्या चालींच्या गाण्यांनी रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारा मनस्वी, निखळ असा गायक, संगीतकार बप्पी लहरी यांच्या निधनाने काळाने हिरावून नेला आहे. ते संगीत क्षेत्रातील आपल्या वैशिष्ट्यपूर्ण शैलीमुळे अजरामर राहतील अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ज्येष्ठ गायक, संगीतकार बप्पी लहरी यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.
मुख्यमंत्री शोकसंदेशात म्हणतात, बप्पी लहरी यांनी तरुणाईच्या ओठांवर सहज रुळतील अशा गाण्यांनी आपली वेगळी शैली रूढ केली. त्यांच्यामध्ये गायक आणि संगीतकार असा उत्कृष्ट मिलाफ होता. त्यामुळे त्यांचा असा एक चाहतावर्ग निर्माण झाला. त्यांनी काही धीरगंभीर संगीतरचनाही दिल्या. संगीत क्षेत्रातील जुन्या-नव्या प्रवाहातही त्यांनी अलिकडपर्यंत आपली शैली जपत संगीत दिले. चित्रपट सृष्टीला या अष्टपैलू व्यक्तिमत्वाची उणीव जाणवत राहील. ते आपल्या विशिष्ट शैलीमुळे आणि गाणी, संगीतामुळे अजरामर राहतील. ज्येष्ठ गायक, संगीतकार बप्पी लहरी यांना भावपूर्ण श्रद्धांजली.
देवेंद्र फडणवीस यांनी वाहिली श्रद्धांजली
देवेंद्र फडणवीस यांनी ट्वीट शेअर करून बप्पी लाहिरी यांना श्रद्धांजली वाहिली आहे.
Pained to know about the demise of noted singer-composer Bappi Lahiri ji.
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) February 16, 2022
He will be remembered for his great musical journey for generations.
My deepest condolences to his family & admirers.
ॐ शान्ति 🙏🏽#BappiDa #BappiLahiri pic.twitter.com/iBYXpy3m32
बप्पी लाहिरी यांच्यावर उद्या होणार अंत्यसंस्कार ; महेंद्र वर्मा यांची माहिती
Bappi Lahiri : ज्येष्ठ संगीतकार आणि गायक बप्पी लाहिरी यांचे काल रात्री निधन झाले. महेंद्र वर्मा यांनी सांगितलं की, 'बप्पी लाहिरी यांच्यावर आज नाही तर उद्या अंत्यसंस्कार होणार आहेत. त्यांचा मुलगा अमेरिकेहून आज रात्री दोन वाजता येणार आहे. उद्या पवनहंस जवळील एका स्मशानभूमीमध्ये त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येतील.'
Bappi Lahiri : 'जिंदादिल बप्पी लाहिरींच्या निधनानं दु:खी झालोय'; आठवण शेअर करत पंतप्रधान मोदींच्या भावना
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील बप्पी लाहिरी यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. त्यांनी एक खास फोटो शेअर करत आपल्या भावनांना वाट मोकळी करुन दिली आहे. पंतप्रधान मोदी यांनी म्हटलं आहे की, बप्पी लाहिरी यांचे संगीत सर्वसमावेशक, विविध भावना सुंदरपणे व्यक्त करणारे होते. पिढ्यानपिढ्या लोक त्यांच्या संगीताचे चाहते राहिले आहेत. त्यांचा जिंदादिल स्वभाव सर्वांच्या लक्षात राहणारा आहे. त्यांच्या निधनाने मला खूप दु:ख झाले आहे. त्यांच्या कुटुंबियांना आणि चाहत्यां प्रति संवेदना. ओम शांती, असं पंतप्रधान मोदी यांनी म्हटलं आहे.
Shri Bappi Lahiri Ji’s music was all encompassing, beautifully expressing diverse emotions. People across generations could relate to his works. His lively nature will be missed by everyone. Saddened by his demise. Condolences to his family and admirers. Om Shanti. pic.twitter.com/fLjjrTZ8Jq
— Narendra Modi (@narendramodi) February 16, 2022