Pankaj Tripathi: 'तिच्यामुळे मला कधीच रेल्वे स्टेशनवर झोपायची वेळ आली नाही'; पंकज त्रिपाठी भावुक
'गॅंग्स ऑफ वासेपूर' या चित्रपटामधील पंकज यांच्या अभिनयाला प्रेक्षकंची पसंती मिळाली. पण त्या आधी पंकज यांना अनेक वर्ष बॉलिवूडमध्ये काम मिळवण्यासाठी स्ट्रगल करावा लागला.
छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध शो 'कौन बनेगा करोडपती' गेली कित्येक वर्ष प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. बॉलिवूडचे महानायक म्हणजेच अमिताभ बच्चन या शोचे सुत्रसंचालन करतात. नुकतीच या शोमध्ये अभिनेता पंकज त्रिपाठी आणि प्रतिक गांधी यांनी हजेरी लावली होती. यावेळी पंकज यांनी त्यांच्या स्ट्रगलबद्दल सांगितले. या एपिसोडमधील पंकज यांचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
अनुराग कश्यपच्या 'गॅंग्स ऑफ वासेपूर' या चित्रपटामधील पंकज यांच्या अभिनयाला प्रेक्षकंची पसंती मिळाली. पण त्या आधी पंकज यांना अनेक वर्ष बॉलिवूडमध्ये काम मिळवण्यासाठी स्ट्रगल करावा लागला. कौन बनेगा करोडपतीमध्ये त्यांनी स्ट्रगलबद्दल अमिताभ यांना सांगितले की, 'मी 2004 मध्ये मुंबईमध्ये आलो. मला 2012 मध्ये 'गॅंग्स ऑफ वासेपुर' या चित्रपटामध्ये काम करण्याची संधी मिळाली. जेव्हा लोक मला विचारतात की, 'तुमचे स्ट्रगलचे दिवस कसे होते?' तर मला नेहमी प्रश्न पडतो, की ते खरच माझे स्ट्रगलचे दिवस होते का? कारण त्या काळात माझ्या पत्नीने मला खूप साथ दिली. माझी पत्नी लहान मुलांना शिकवत होती. त्यावेळी आमच्या गरजा देखील कमी होत्या. आम्ही लहान घरात राहात होतो. माझी पत्नी कमवत होती. तिच्यामुळे माझ्यावर अंधेरी स्टेशनला झोपायची वेळ आली नाही. '
De Dhakka 2: "दे धक्का 2" येणार 1 जानेवारीला प्रेक्षकांच्या भेटीला
एका मुलाखतीमध्ये पंकज यांनी सांगितले, 'खरं सांगायचं तर मी 2004 ते 2010 या काळात मी काहीच कमवत नव्हतो. माझी पत्नी मृदुलाने सर्व खर्च केला. मी अंधेरीला लोकांना काम मागत फिरतच होतो. पण आता मी जेव्हा घरी जातो तेव्हा पार्किंगमध्ये चित्रपटाच्या ऑफर देतात.'
पंकज आणि मृदुला यांची लव्ह स्टोरी
2004 साली पंकज आणि मृदुला यांचे लग्न झाले. एका मुलाखतीमध्ये पंकज यांनी त्यांच्या लव्हस्टोरीबद्दल सांगितले होते. लग्नाच्या आधी पंकज आणि मृदुला एकमेकांना पत्र लिहीत असत. पंकज हे शिक्षणासाठी दिल्ली येथे आले होते. तेव्हा त्यांना असे वाटले की मृदुला यांचे लग्न झाले असेल, पण त्यांनी पंकज यांची प्रतिक्षा केली. मृदुला आणि पंकज यांना आशी नावाची मुलगी आहे.
पंकज यांच्या मिमी, स्त्री, लूडो, बरेली की बर्फी आणि कागज या चित्रपटाला प्रेक्षकांची पसंती मिळाली. तसेच त्यांच्या मिर्झापूर आणि सेक्रेड गेम्स या वेब सीरिजमधील अभिनयाचे अनेकांनी कौतुक केले. लवकरच पंकज हे बच्चन पांडे, 83 आणि लाल सिंग चड्ढा या चित्रपटांमधून प्रेक्षकांच्या भेटीस येतील अशी चर्चा आहे.