De Dhakka 2: "दे धक्का 2" येणार 1 जानेवारीला प्रेक्षकांच्या भेटीला
"दे धक्का 2" येत्या 1 जानेवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. "दे धक्का 2" हा सिनेमा महेश मांजरेकर दिग्दर्शित करत आहेत.
De Dhakka 2: "दे धक्का 2" येत्या 1 जानेवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. राज्य सरकारने 22 ऑक्टोबरपासून सिनेमागृहे उघडण्याची परवानगी दिली आहे. त्यानंतर बॉलिवूडच्या जवळजवळ अनेक निर्मात्यांनी त्यांच्या सिनेमाच्या तारखा जाहीर केल्या आहेत. जवळजवळ 22 सिनेमांनी त्यांच्या प्रदर्शनाच्या तारखा जाहीर केल्या आहेत. बॉलिवूडचा दबदबा कायम ठेवत मराठीतील बिग बजेट सिने-निर्मात्यांनी त्यांच्या सिनेमा प्रदर्शित होणाऱ्या तारखा जाहीर केल्या आहेत. यात 'झिम्मा', 'गोदावरी', 'दे धक्का2'
अशा सिनेमांचा उल्लेख होईल.
"दे धक्का 2" हा सिनेमा महेश मांजरेकर दिग्दर्शित करत आहेत. या चित्रपटाची निर्मिती महाराष्ट्र चित्रपट सेनेच्या अमेय खोपकर यांनी केली आहे. 'वेल्कम टू लंडन' म्हणत सिनेमाचे पहिले पोस्टर समोर आले आहे. "दे धक्का 2" चे कथानक दे धक्काचा दुसरा भाग असू शकतो. दे धक्का हा सिनेमा 2008 साली चित्रपटगृहात प्रदर्शित झाला होता. त्याला प्रेक्षकांचा भरघोस प्रतिसाद मिळाला होता. अनेकदा सिनेमागृहाबाहेर हाऊसफुलचे बोर्ड लागलेले दिसून आले होते.
"दे धक्का" मध्ये शिवाजी साटम, मकरंद अनासपुरे, सिद्धार्थ जाधव, मेधा मांजरेकर, गौरी वैद्य, सचित पाटील या कलाकारांच्या मुख्य भूमिका होत्या. पहिला भाग त्यावेळी अतुल काळे आणि सुदेश मांजरेकरांनी दिग्दर्शित केला होता. तर महेश मांजरेकरांनी या सिनेमाचे लेखन केले होते. त्यामुळे आता "दे धक्का 2" महेश मांजरेकर कसा दिग्दर्शित करणार याकडे प्रेक्षकांचे लक्ष लागून राहिले आहे.
"दे धक्का 2" च्या पोस्टरमध्ये मकरंद अनासपुरे, शिवाजी साटम, महेश मांजरेकर दिसून येत आहेत. ते कारमधून उतरत आहेत. तर परदेशी पाहूणी त्यांचे स्वागत करताना दिसून येत आहे. तर परदेशी हमाल त्यांचे सामान कारमधून खाली उतरवत आहे. अशापद्धतीने अॅक्शन लूकमधील या पोस्टरने चाहत्यांचे चांगलेच लक्ष वेधले आहे. त्यावर चाहते उत्तम प्रतिसाद देताना दिसून येत आहेत. चाहतेदेखील आता थांबायचं नाही अशी प्रतिक्रिया देत आहेत.
सर्वांच्या लाडक्या सिद्धार्थ जाधवने सिनेमाचे पोस्टर शेअर करत हटके कॅप्शन लिहिली आहे. "दे धमाल हसवणूकीचा दुसरा डोस..थांबायचं नाय, गड्या थांबायचं नाय, घाबरायचं नाय.., गड्या घाबरायचं नाय". त्यावर बड्या कलाकारांसह अनेक प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया येत आहेत. अशाच कोणत्या तरी गोष्टीची आम्ही वाटबघत होतो. अशी प्रतिक्रिया प्रेक्षक करताना दिसून येत आहेत.